ASO 2013 - Main Paper 1

ASO 2013 - Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा - ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली'.

42.

कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण ________.

43.

 जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना ________ म्हणतात.

44.

‘बिन भाड्याचे घर' कशास म्हटले जाते ?

45.

'श्', 'ष् ', 'स्' यांना ______  म्हणतात.

46.

'उभयान्वयी अव्ययाचा विचार करताना पुढील बाबींचा विचार करावा लागेल -
(a) दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाच्या विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.

(b) प्रधानसूचक व गौणत्वसूचक असे दोन मुख्य प्रकार उभयान्वयी अव्ययात आहेत.

(c) 'अन्', 'आणखी', 'अणि' ही समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत.

(d) 'विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.

य वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे - 

47.

खालील पर्यायी उत्तरांतून 'पररूप संधी' ओळखा -

48.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवितात ?
आज त्याजपाशी संपत्ती आहे.'

49.

खालील पर्यायी उत्तरांतील विसंगत शब्द कोणता? 

50.

खालील वाक्य हे कोणत्या स्थानिक क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे?
‘ती काय माती गाते!' 

51.

विरामचिन्हांचा वापर करताना 'संयोगचिन्हांचा वापर करण्यात येतो तो असा -  

(A) विधाने - (a) '!' या चिन्हाचा वापर करतात

(b) संबोधन दर्शविताना
(c) दोन शब्द जोडताना

(d) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास

(B) वरील विधानातील योग्य उत्तर पर्यायी उत्तरांत शोधा - 

52.

मराठी ‘प्रयोग व्यवस्थेत' कर्मणी प्रयोगाविषयी पुढील काही मते मांडली आहेत, ती अशी -
(a) कर्ता प्रथमांत असतो.

(b) कर्माप्रमाणे क्रियापदे असते.

(c) कर्म प्रथमांत असते.

(d) 'नवीन कर्मणी प्रयोगात' कर्याला 'कडून' हा शब्दयोगी अव्यय लावत नाहीत.

पर्यायी उत्तरे : 

53.

खालील चारी जोड्या योग्य रीतीने जुळवून त्यातील विसंगत जोडी कोणती ते सांगा?

54.

खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे?
(a) मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली.

(b) आम्ही उद्या सहलीला जाऊ.

(c) जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

(d) तुम्ही आता सर्वजण घरी जा.

पर्यायी उत्तरे : 

55.

खालील विधानांतील योग्य उत्तर शोधा

‘आपले भाषाशिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते'

(a) ऐकणे

(b) बोलणे

(c) वाचणे
(d) फिरणे

खालील उतारा वाचून प्र.क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा.
           जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचं हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथांनी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून 'यत्न तो देव' का जाणावा, याचं मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या 'लीळा चरित्रा'तून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला, ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषदं, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचं विवरण केलं आहे. त्याचे आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोणही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानती आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती?
          ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, पुरातत्त्व संस्कृती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचं विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात.
        ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या 'आभाळ', 'भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या 'कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं.

56.

धर्मग्रंथांच्या वाचनाने जीवनदर्शनाचे विवरण कळते, ते असे -

(a) प्रेम
(b) परस्पर सामंजस्य

(c) जगाविषयी घृणा

(d) एकात्मता  

(e) हिंसाव्रत
(f) संकुचित जीवनदृष्टिकोण

वरील विवरणातील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?

57.

खालील काही विधाने पहा -
(a) शंकर पाटलांच्या 'धिंड' सारख्या कथा म्हणजे करुणरसाचे डोहच होत.

(b) गावाकडच्या गोष्टी' तून ग्रामीण जीवन कळते.

(c) 'वळीव' या कथेतून शंकर पाटलांनी पुरते हसवून हसवून सोडले आहे.

(d) ग्रामीण संवादाची कोल्हापुरी फेक ना.स. इनामदारांच्यात आहे.

पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा -

58.

वैज्ञानिकांच्या परिश्रमामुळे पुढील गोष्टी समजून आल्या, त्या अशा -

(a) पुरातत्त्व संस्कृती

(b) धर्मकारण 
(c) राज्यशास्त्र

(d) अवकाश झेप

(e) मानसशास्त्र
(f) ग्रहगोल शास्त्र

वरील विधानांच्या पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर सांगा -

59.

ललित वाङ्मयाच्या वाचनाने पुढील बाबींची कल्पना येते, त्या पुढील प्रमाणे -
(a) वेगवेगळ्या औषधांची शास्त्रोक्त पद्धतीने माहिती मिळते.

(b) आपलं मनोरंजन होतं.

(c) वेगवेगळ्या लेखकांचं भावविश्वाचं दर्शन घडते.

(d) मन भांबावून जाते.

वरील विधानातून योग्य ते उत्तर पर्यायी उत्तरांतून शोधा -

60.

पुढील विधाने वाचून त्या खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा -
विधाने -

(a) साहित्यिकांनी साहित्याचे विश्व किती विचित्र करुन टाकले आहे.

(b) ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' तून जीवनविषयक चिंतन प्रकट केले आहे.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2013 - Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.