'UNEP उत्सर्जन गॅप अहवाल', २०१९

Date : Dec 03, 2019 12:28 PM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
'UNEP उत्सर्जन गॅप अहवाल', २०१९
'UNEP उत्सर्जन गॅप अहवाल', २०१९

'UNEP उत्सर्जन गॅप अहवाल', २०१९

 • संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत (United Nations Environment Programme - UNEP) उत्सर्जन गॅप अहवाल-२०१९ जाहीर

वेचक मुद्दे

 • २०२१ पर्यंत पृथ्वीच्या सरासरी तापमानात ३.२ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा इशारा

 • वैज्ञानिक इशारे आणि राजकीय वचनबद्धता सारखे उपाय करूनही हरितगृह वायूंचे उत्सर्जन (Green House Gases - GHG) जागतिक पातळीवर कमी नाही

 • अहवाल COP-२५ च्या अगोदर जारी

 • २ डिसेंबर २०१९ पासून स्पेनमध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषद (Climate Conference COP-२५) आयोजित

परिषद निष्कर्ष

 • गेल्या दशकापासून हरितगृह वायू उत्सर्जनात १.५ % नी वाढ

 • कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जन पातळी आतापर्यंतच्या उत्सर्जनातील सर्वाधिक क्षमतेची

 • ५५.३ गिगाटन्स इतक्या उच्च पातळीवर उत्सर्जन

अहवाल मुख्य निष्कर्ष

 • चार प्रमुख हरितगृह वायू उत्सर्जक देश

  • चीन

  • अमेरिका

  • युरोपियन युनियन

  • भारत

भारताबाबत निरीक्षणे

 • कार्बन उत्सर्जनावर अंकुश ठेवण्यात आणि लक्ष्य साध्य करण्यात भारत सकारात्मक

 • भारतातील दरडोई उत्सर्जन जी -२० देशांच्या गटात सर्वात कमी

 • इलेक्ट्रिक वाहन विकासाच्या मार्गावर असलेल्या अग्रगण्य देशांपैकी भारत एक

जागतिक पातळी निरीक्षणे

 • जागतिक तापमान कमी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी २०२० ते २०३० या काळात हरितगृह वायू उत्सर्जन दर वर्षी ७.६ टक्क्यांनी कमी करणे गरजेचे

सर्वात मोठे योगदान

 • ऊर्जा क्षेत्र आणि त्याचे जीवाश्म इंधन उत्सर्जन

सर्व देशांकडून सहकार्य अपेक्षा

 • जागतिक तापमान वाढ १.५ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी, हरितगृह वायू उत्सर्जन ५ पटीने कमी करणे आवश्यक

जागतिक तापमान वाढीचे परिणाम

 • तापमान १.५ डिग्रीच्या पातळीवर पोहोचले तर प्रवाळ (coral reefs) ७०-९०% ने कमी होण्याची संभावना

 • २१०० पर्यंत जग पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा ३.२ डिग्री ने अधिक उष्ण होण्याची चिन्हे

उत्सर्जन गॅप अहवाल: मुख्य शिफारसी

 • नैसर्गिक संसाधने आणि जीवनाचे संरक्षण करण्यासाठी, रोजगारासाठी प्रत्येक देशाकडे स्वत: च्या खास संधी उपलब्ध

 • ऊर्जा क्षेत्राचे संपूर्ण डी-कार्बोनिझेशन (de-carbonization) करणे शक्य आणि आवश्यक

 • नूतनीकरणयोग्य ऊर्जा वीजनिर्मितीमुळे उत्सर्जन कपात २०५० पर्यंत १२.१ गिगाटन्स करण्याचे लक्ष्य गाठणे शक्य

 • वाहतुकीचे विद्युतीकरण केल्याने २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन ७२% पर्यंत कमी करण्यास मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.