UNCTAD: कोरोना विषाणूमुळे भारताचा १५ आर्थिकदृष्ट्या प्रभावित देशांमध्ये समावेश

Updated On : Mar 17, 2020 12:06 PM | Category : आर्थिकUNCTAD: कोरोना विषाणूमुळे भारताचा १५ आर्थिकदृष्ट्या प्रभावित देशांमध्ये समावेश
UNCTAD: कोरोना विषाणूमुळे भारताचा १५ आर्थिकदृष्ट्या प्रभावित देशांमध्ये समावेश Img Src (The News Chronicle)

UNCTAD: कोरोना विषाणूमुळे भारताचा १५ आर्थिकदृष्ट्या प्रभावित देशांमध्ये समावेश

 • भारताचा कोरोना विषाणूमुळे १५ आर्थिकदृष्ट्या प्रभावित देशांमध्ये UNCTAD द्वारे समावेश

वेचक मुद्दे

 • संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेकडून जागतिक अर्थव्यवस्थेवर कोविड -१९ च्या परिणामाबाबतचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे

 • अहवालातील क्रमवारीनुसार भारत १० व्या स्थानी स्थित आहे

अहवाल: मुख्य निष्कर्ष

 • विषाणूमुळे उद्भवलेल्या चीनमधील उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे जगात ५० अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर परिणाम होईल

 • युरोपियन युनियनमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे

 • १५.६ अब्ज डॉलर्स इतका परिणाम अनुभवास येत आहे

 • त्यानंतर अमेरिकेचे ५.८ अब्ज डॉलर्स इतके नुकसान झाले आहे

 • जपानमध्ये ५.२ अब्ज डॉलर्स आणि दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममध्ये अनुक्रमे ३.८ अब्ज डॉलर्स आणि २.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान आहे

भारत अहवाल: मुख्य निष्कर्ष

 • जगात भारत १० वा असा देश ज्याला मोठा आर्थिक धक्का बसला आहे

 • भारताची आर्थिक अधोगती कमी असून इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत कमी आहे

 • भारतात रासायनिक क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे

 • त्यापाठोपाठ वस्त्रोद्योग, ऑटोमोटिव्ह क्षेत्र, विद्युत यंत्रणा, चामड्याचे उत्पादन आणि धातू उत्पादने या क्षेत्रांमध्ये फटका बसेल अशी संभावना आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)