मेघालय उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती मुहम्मद रफिक यांचा शपथविधी

Date : Nov 14, 2019 04:28 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
मेघालय उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती मुहम्मद रफिक यांचा शपथविधी
मेघालय उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती मुहम्मद रफिक यांचा शपथविधी

मेघालय उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती मुहम्मद रफिक

  • मेघालय उच्च न्यायालयात ८ व्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ

  • शिलॉँग येथील राजभवनात मेघालय राज्यपाल तथागत रॉय यांच्या हस्ते पद आणि गोपनीयतेची शपथ

  • न्यायमूर्ती अजय कुमार मित्तल यांच्यानंतर कार्यभार

  • अजय कुमार मित्तल सध्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

न्यायमूर्ती मोहम्मद रफीक यांचा अल्प परिचय

  • १९८४ मध्ये कायदा प्रॅक्टिस सुरू

  • राजस्थान उच्च न्यायालयात कायद्याच्या जवळपास सर्व शाखांमध्ये विशेष सराव

  • वकिली कार्यकाल: १९९९ ते २००६

  • २००८: राजस्थान उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक

  • कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून राजस्थान उच्च न्यायालयात दोनदा काम

  • भारतीय संविधानात कर, भूसंपादन आणि कंपनी कायदा प्रकरणातील तज्ञ म्हणून मान्यता

उच्च न्यायालये

संविधानिक तरतूद

  • भारतीय राज्यघटनेच्या कलम २१४ नुसार, भारतातील प्रत्येक घटक राज्याला एक उच्च न्यायालय किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय

  • सध्या देशात २५ उच्च न्यायालये

महाराष्ट्र राज्य स्थिती 

१ उच्च न्यायालय (मुंबई) आणि ३ खंडपीठे (नागपूर, औरंगाबाद, पणजी)

उच्च न्यायालय रचना 

  • एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश

  • राज्यातील परिस्थितीनुसार संख्या लवचिक

न्यायाधीश नेमणूक

  • मुख्य न्यायाधीश नेमणूक अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना 

  • मुख्य न्यायाधीश नेमणूकीवेळी राष्ट्रपतींकडून सर न्यायाधीश आणि घटकराज्याच्या राज्यपालांचा सल्ला व मार्गदर्शन 

  • इतर न्यायाधीश नेमणूकीवेळी भारताच्या सर न्यायाधीशांकडून त्या राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला व मार्गदर्शन

न्यायाधीश पात्रता

  • भारताचा नागरिक

  • कमीत कमी दहा वर्षे कोणत्याही न्यायालयात न्यायाधीश पदाचा अनुभव

  • एक किंवा जास्त न्यायालयात कमीत कमी दहा वर्षापर्यंत वकिलीचा अनुभव

कार्यकाल

  • वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर

  • तत्पूर्वी स्वेच्छेने राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्ती शक्य

शपथविधी

  • संबंधित राज्याच्या राज्यपालांकडून

उच्च न्यायालय अधिकारक्षेत्र

  • प्रारंभिक

  • प्रादेशिक

  • पुनर्विलोकन

  • न्यायालयांवर देखरेख

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.