राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 21 ते 25 प्रश्नांची उत्तरे द्या :
             ध्वनी तरंग हे कणांच्या कंपनामुळे तयार होतात आणि भौतिक माध्यमातून अनुतरंग स्वरूपात प्रसरण पावतात. 20 Hz पेक्षा कमी वारंवारता असणा-या ध्वनी तरंगांना अवश्रव्य तरंग म्हणतात. मानवी कान 20 Hz ते 20000 kHz या वारंवारते मधील ध्वनी तरंग ऐकू शकतात. ही श्रवण मर्यादा होय. श्रवण मर्यादेपेक्षा जास्त वारंवारता असणारे ध्वनी तरंग विशिष्ट प्राण्यांनाच ऐकू येतात उदा. मांजर, कुत्रा, वटवाघूळ ई. या तरंगांना श्रव्यातीत तरंग म्हणतात. वटवाघूळ उडत असताना श्रव्यातीत तरंग निर्माण करते. हे तरंग त्यांच्या मार्गातील अडथळ्यावर आदळून परावर्तित होतात. वटवाघूळाला हा प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे त्याला अडथळ्याचे ज्ञान होते. त्यामुळे वटवाघूळ अंधारात सुद्धा त्यांचा मार्ग शोधू शकतो.                   पिझोइलेक्ट्रीक ऑसिलेटर आणि मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर या पद्धतींचा वापर करून श्रव्यातीत तरंग निर्माण केले जातात. तसेच कुंडस् ट्युब, क्वॉर्टझ क्रिस्टल आणि थर्मल डिटेक्टर या पद्धतींचा वापर करून श्रव्यातीत तरंग शोधले जातात,
           ज्या तरंगांची वारंवारता जास्त असते, त्यांच्या अंगी जास्त ऊर्जा असते. म्हणूनच श्रव्यातीत तरंगांच्या अंगी जास्त ऊर्जा असते. ध्वनी तरंगाप्रमाणेच श्रव्यातीत तरंग परावर्तित होतात, आपवर्तित होतात व ग्रहण केले जातात. वारंवारतेच्या प्रमाणात त्यांचा वेग वाढतो.
           श्रव्यातीत तरंगांचा, औद्योगिक, वैज्ञानिक व वैद्यकीय शास्त्रामध्ये अनेक प्रकारे वापर केला जातो. साऊंड नेव्हिगेशन अॅण्ड रेंजींग (SONAR) हे असे उपकरण आहे की ते श्रव्यातीत लहरी निर्माण करते, वितरित करते व ग्रहण करते. यात पाण्याखालील वस्तूंचे अंतर व दिशा ठरवण्यासाठी श्रव्यातीत तरंगांचा वापर करतात उदा. पाणबुडी, आईसबर्ग, ई. या तंत्राचा वापर समुद्राची खोली काढण्यासाठी होतो. यात जहाजावर प्रक्षेपक व शोधक बसवलेले असतात. श्रव्यातीत तरंगांचा जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी, प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यासाठी, दुधासारख्या द्रव्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी व त्यायोगे ते द्रव अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी, हृदयांच्या ठोक्यांचे तंत्रज्ञान, मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी, कारखान्यांमध्ये यंत्राचे भाग स्वच्छ करण्यासाठी, धातूच्या ठोकळ्यातील तडे व भेगी दर्शवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो.

21.

श्रव्यातीत तरंग _____________ या स्वरूपाचे असतात.

22.

श्रव्यातीत तरंग असे तरंग आहेत की ते

23.

हृदयांच्या ठोक्यांचे तंत्रज्ञान यावर आधारित आहे

24.

समुद्राची खोली काढण्यासाठी या तंत्राचा वापर करतात :

25.

वारंवारता ___________ असलेल्या तरंगांचा दुधासारख्या द्रवातील जीवाणू मारून टाकण्यासाठी वापर होतो. 

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 26 ते 30 प्रश्नांची उत्तरे द्या :
           वनस्पती सुप्रजाननशास्त्र हा विषय जरी मेन्डल यांच्या शोधा नंतर आधुनिक वैज्ञानिक पातळीवर अलिकडच्या काळात विकसित झाला असला तरी मिस्र आणि अश्शुरी यांना सुरूवाती पासुन त्याची जाणीव होती. नंतर 18 व्या आणि 19 व्या शतकामध्ये/दरम्यान अनेक कार्यकर्तानी कृत्रिम संयोग करून नवीन वाण विकसित केले. शास्त्रीय उपायांनी वनस्पतीत सुधारणा घडवून आणण्याचा पहिला सफल प्रयत्न ग्रेगर मेंडल यांनी केला व वर्णाचे वारसाचे नियम तयार केले.
           दोन भिन्न वर्गीय वनस्पतीत परागसिंचन घडवुन आवश्यक गुणधर्म मिळविणे याला संकर असे म्हणतात, त्यापासुन तयार होणा-या वनस्पतीस संकरीत वनस्पती असे म्हणतात. थॉमस फेअरचाईल्ड (1717) हे पहिले गृहस्थ ज्यांनी स्वीट विलीयम आणि गुलाबी रंग यांचा संयोग करून संकर निर्माण केले. मेन्डल यांच्या वैज्ञानिक सिद्धांतांचे ज्ञान वापरून एक प्रकारची वनस्पती प्रजननान विश्वसनीयता प्राप्त झाली. उभयलिंगी वनस्पती मध्ये महिला पाळका मधून पुंकेसर काढुन टाकतात जेणे करून स्वपराग सिंचन टाळले जाते. एकलिंग फुलामध्ये खच्चीकरण करण्याची गरज नाही कारण यामध्ये पुरुष वंध्यत्व असते उदा. मका, गहु, ज्वारी, जव, काकडी, टोमॅटो, कांदे आणि सूर्यफूल इत्यादी.
             संकर करून आवश्यक गुणांचा विकास करण्यासाठी पुरुष वंधत्वाचा खूप उपयोग होतो. वनस्पतीच्या सुरूवातीचा काळामध्येच स्त्रिलींगी फुलामध्ये कुक्षी ला मेणकापडी पिशावी बांधुन अवांछित वनस्पतीच्या परागकणा द्वारे परागसिंचन टाकता येते. इष्ट परागकणाचा वापर करून चांगले वाण निपजता येतात ह्या क्रियेला बँगिंग म्हणतात.
              दोन भिन्न वर्गीय वनस्पतीत संकर होवू शकते दोन परंतु त्यामध्ये वंध्यत्व येते. प्राण्यामध्ये सुद्धा दोन भिन्न वर्गीय प्राण्याच्या संयोगाने नवीन वर्ग निर्माण करता येतो उदा. घोडा व गाढव यांच्या संयोगाने खेचर हा नवीन प्राणी निर्मित होतो. खेचर हा प्राणी संकरण आहे. ट्रिटीकेल नावांची नवीन वनस्पती गहू आणि रे यांच्या संयोगाने तयार झाली आहे. अश्या संकरणामध्ये योग्य व सारख्या आनुवंशिक गुणसुत्राचा अभाव असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये वंध्यत्व येते. साधारणतः एक संकरीत फक्त एक जनुक किंवा अनेक जनुक गुणाव गुण ठरविणारे असतात.
             संकराचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संकरित मका हे आहे. दोन समान अनुवंशिक गुणसूत्र अमलेल्या वाणाची ओळीमध्ये लागवड करून किंवा दोन वर्गाचा संकर करून संकरित मका प्राप्त होतो.
           जन्मजात खरे प्रजनन हे एकसमान असते. संकरीत वनस्पती मध्ये अनेक गुण व श्रेष्ठत्व हे पालका पेक्षा जास्त असते. ज्यामध्ये जोम आणि रोग प्रतिकारक शक्ती जास्त असते. मका या पिकामध्ये 25% उत्पादकता जास्त मिळते. मका व्यतिरिक्त दुसरे पिके उदा. ज्वारी, तांदूळ, बाजरी, चुकंदर, पेटुनिया, कोबी, काकडी इत्यादी पिकांमध्ये जास्त जोम दिसतो. अश्या रितीने दोन भिन्न शुद्ध जाती पासुन तयार झालेल्या वनस्पतीत परागसिंचन घडवुन आणले, तर उत्पादकता वाढते व बीज एकाच आकाराचे निपजतात हे प्रयोजाने सिद्ध केले आहे. 

              संकरीत वाणामध्ये प्राप्त झालेले गुणधर्म/जोम, जर त्यांची वनस्पतीय पद्धतीने लागवड केली तर नष्ट होत नाही उदा. आंबा, सफरचंद, पेरू, डेलिया, शेवंती, गुलाब इ. 
संकरीत वाणामध्ये प्राप्त झालेले गुणधर्म/जोम, जर त्यांची वनस्पतीय पद्धतीने लागवड केली तर नष्ट होत नाही उदा. आंबा, सफरचंद, पेरू, डेलिया, शेवंती, गुलाब इ.

26.

भिन्नाश्रय म्हणजे

27.

खालीलपैकी कोणत्या कारणासाठी पिशव्यांचा वापर करतात ?

28.

शुद्ध जातीच्या वाण म्हणजे

29.

नवीन वनस्पतीचे वाण तयार करताना कोणती प्रक्रिया वापरतात ?

30.

सारख्या भिन्नश्रयामुळे प्रजोत्पती गमावण्याला म्हणतात

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 31 ते 35 प्रश्नांची उत्तरे द्या :
             इयत्ता 6 वी च्या वर्गातील विद्यार्थीशी गप्पा मारताना डॉ. सर्वेश यांनी भौतिक बदल उदा. बाष्पन (द्रव ते वायु), द्रवण (घन ते द्रव), संप्लवन (घन ते वायु) आणि रासायनिक बदल उदा. उदासीनीकरण (आम्ल आणि अल्कलि यांच्यातील अभिक्रिया), अवक्षेपण (अमोनियम क्लोराईड/पोटॅशियम क्लोराईड आणि सिल्वर नाईट्रेट यांच्यातील अभिक्रिया) अशा काही प्रयोगांचे प्रात्याक्षित दाखविले.
               ह्या गप्पांमध्ये विद्याथ्र्यांना खूप मजा येत होती, पण त्यांना दिलेल्या द्रावणातील कटायन आणि अनायन हे कसे शोधून काढायचे, हे जाणून घ्यायचे होते. विद्यार्थ्यांचा उत्साह बघून डॉ. सर्वेश यांनी दिलेल्या द्रावणातील कटायन आणि अनायन हे कसे शोधून काढायचे हे जाणून घेण्याच्या 3 प्रयोगांची (एकात् कागदांच्या रंगांतील बदल आणि दुस-यात प्रयोगादरम्यान बदल) योजना केली.
             डॉ. सर्वेश यांनी थोडेसे (अंदाजे 0-100 ग्रॅ.) घनरूप अमोनियम क्लोराईड आणि घनरूप पोटॅशियम क्लोराईड प्रत्येकी 2 वेगळया परीक्षा नळयांत 2-0 घन सेमी निरायनित पाण्यात विरघळवले आणि त्या परीक्षा नळयांना अनुक्रमे '1' आणि '2' क्रमांक दिले. वरील प्रत्येक परीक्षा नळीतील 2 थेंब 2 संचातील प्रत्येकी 3 वेगळया कोरड्या परीक्षा नळयांमध्ये स्वतंत्रपणे घेतले आणि अनुक्रमे त्या परीक्षानळयांचा एक संच अगदी डाव्या बाजूला आणि दुसरा संच अगदी उजव्या बाजूला ठेवला. ह्या दोन्ही संचातील परीक्षांनळयांमध्ये, स्वतंत्रपणे, प्रत्येकी 6 थेंब 2 N सोडीयम हायड्रॉक्साईड (अल्कलि) टाकून ह्या परीक्षांनळ्या संथपणे तापविल्या, आणि बाहेर पडलेल्या वायूंच्या संपर्कात, स्वतंत्रपणे, एक ओला लाल लिटमस कागद, एक ओला हळदीचा कागद आणि विरल हायड्रोक्लोरीक आम्लामधील बुडविलेली काचेची कांडी आणले.
               पहिल्या प्रयोगात, डाव्या बाजूच्या परीक्षानळीवरचा अगोदरचा कागद निळा झाला (हे निरीक्षण आम्ल वायुंच्या बाबतीत अगदीच विरुद्ध होते. त्यात ओला निळा लिटमस लाल होतो) आणि नंतरचा कागद तपकिरी झाला आणि शेवटच्या प्रयोगात दाट सफेद अमोनियम क्लोराईडच्या वाफा निदर्शनास आल्या. पण असा कोणताही बदल उजव्या बाजूच्या परीक्षानळयांवर आढळून आला नाही. डॉ. सर्वेश यांनी असे नमूद केले की, डाव्या बाजूच्या परीक्षांनळयांतील अभिकारकांमध्ये अभिक्रिया होऊन, अल्कधर्मी अमोनिया वायु निर्माण झाला आणि असा निष्कर्ष काढला की, डाव्या बाजूचा परीक्षानळयांच्या संचात जे द्रावण आहे, त्यात अमोनियम मुलक आहे आणि उजवीकडील परीक्षानळयांच्या संचात असलेल्या द्रावणांमध्ये अमोनियम मुलक नाही.
               नंतर, डॉ. सर्वेश यांनी विद्याथ्र्यांना हेच प्रयोग करून बघायला सांगितले. कु. रियाच्या बाबतीत, अगोदरच्या बदलाव्यतिरिक्त, उजवीकडच्या संचातील परीक्षानळीमध्ये ओला लाल लिटमस कागद निळा झालेला आढळला आणि श्री. रवीला डावीकडच्या संचातील परीक्षानळीत हळदीच्या कागदाच्या रंगात अपेक्षित बदल आढळला नाही. डॉ. सर्वेश यांनी विद्यार्थ्यांना हे प्रयोग अचूक कसे करावेत, हे परत सांगितले. जेव्हा विद्यार्थ्यांनी डॉ सर्वेशांच्या सुचनांचे अचूक पालन करून, हे प्रयोग केले, तेव्हा त्यांना अपेक्षित परिणाम मिळाले.

31.

वरील उता-यावरून खालील निष्कर्ष काढता येतो :

32.

अमोनियम मुलकाच्या अस्तित्वामुळे खालील निरीक्षणे आढळतात. 

33.

कु. रियाला अपेक्षित निरीक्षण मिळाले नाही, कारण तिने

34.

श्री रवीला अपेक्षित निरीक्षण मिळाले नाही, कारण त्याने

35.

दाट सफेद वाफा तयार झाल्या, कारण

अ. रासायनिक अभिक्रियेमुळे

ब. उदासीनीकरण अभिक्रियेमुळे

क. अमोनियम क्लोराईड संप्लवनशील आहे म्हणून

खालीलपैकी कोणते पर्याय अचुक (बरोबर) आहेत ?

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 36 ते 40 प्रश्नांची उत्तरे द्या :
               वादविवादामध्ये जो स्वत:ची बाजू घेऊ शकत नाही तो उदारमतवादी, अशी उदारमतवाद्यांची व्याख्या एकदा रॉबर्ट फ्रॉस्टने केली होती. पण अलिकडच्या व्याख्यांमध्ये अगदी उलटे चित्र दिसते. आत्मसंतुष्ट आणि विचारांची विविधता न मानणारे अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. उदारमतवादाच्या संकल्पनेची अधिमान्यता नष्ट करण्यासाठी उदारमतवाद्यांची राजकीय दांभिकता उघडी पाडणे ही अलंकारिक चाल खेळली जाते. आणि दुर्दैवाने असे म्हणावे लागते की अशा चालींचा उपयोग जे करतात त्यांच्याकडे हल्ला करण्यासाठी खूप दारूगोळा आहे. इतरही काही काळजी करण्यासारखे स्रोत आहेत. अमेरिकेतील विद्यापीठे प्राध्यापकांना नोक-या देताना सनातनी लोकांबद्दल पूर्वग्रहदूषित मत बाळगून असतात असे विधान निकोलस क्रिस्टॉफ यांनी न्यूयॉर्क टाईम्स मधील आपल्या बहुचर्चित स्तंभामध्ये केले. उदारमतवादी संस्थांनी विविध विचारांना आणि ख-याखु-या वादविवादांना आश्रय दिला पाहिजे पण तसे न होता त्या एकसुरी आणि राजकीय दृष्ट्या अचूक होत आहेत. उदारमतवादी प्रचलित विचारांपलिकडे चिंतन करू शकले पाहिजेत पण ते स्वत:ला काही खोक्यांमध्ये बंदीस्त करून घेत आहेत. अगदी अलिकडे गुरुचरण दास यांनी अशाच प्रकारचे आरोप केले होते.
                असे आरोप बहुतेक वेळा राजकीय चाली असतात. उदारमतवादी सनातन्यांना वगळतात आणि वाळीत टाकतात या प्रकारचे आरोप अनेक पद्धतीने केले जातात. या आरोपांपैकी एक प्रकारच्या आरोपांबाबत उदारमतवाद्यांना बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही. एखाद्या जुन्या व्यवस्थेसंबंधी पुराणमतवादयांचे ग्रह। साधारणपणे एखाद्या पदसोपानाशी-उतरंडीशी जोडलेले असतात; त्याला नेहमीच स्त्री-पुरुष भेदाचा, वंशवादाचा, समलिंगीना असलेल्या विरोधाचा, जातीयवादाचा आणि अल्पसंख्याकांबद्दलच्या वैराचा दर्प येत असतो. काही वेळा उदारमतवादी बौद्धीक वातावरणाचे कृत्रिम पद्धतीने शुद्धीकरण करतात आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु संस्थांच्या अवकाशामध्ये स्त्री-पुरुष भेद, वंशवाद, जातीयवाद, परकीयांचा द्वेष या प्रकारांना अधिमान्यता मिळता कामा नये हा प्रत्येक सभ्य समाजाने पुरस्कार करावा असा विचार आहे.
               पुराणमतवादी काही विशिष्ट गटांना लक्ष करून शिताफीने किंवा उघडपणे काही मांडणी करतात. बौद्धीक वादविवादांशी काहीही संबंध नसलेल्या मार्गांनी ते लोकांना अस्वस्थ करतात. या मांडणीबद्दल साशंक असणे हे उदारमतवादयांच्या दृष्टीने बरोबर आहे. तशी शंका न व्यक्त करणे म्हणजे मानवी प्रतिष्ठेच्या प्रति असलेली बांधिलकी सोडून देण्या सारखे होईल.

36.

उताच्यावरून तुम्ही असा निश्चित निष्कर्ष काढू शकता की रॉबर्ट फ्रॉस्ट हे एक ______ आहे.

37.

उताच्यामध्ये

38.

अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या भरतीसाठीच्या प्रथा _______________ विरोधी आहेत.

39.

निकोलस क्रिस्टॉफ हे ________________ आहे.

40.

उता-याचा लेखक ______________ आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.