राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 41 ते 45 प्रश्नांची उत्तरे द्या :
             इंग्रजी शिक्षणामधून आलेल्या नव्या जाणिवांचे लोग वेगवेगळ्या थरांतील सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन पोचविण्याचे काम महात्मा फुले यांनी प्रथम हाती घेतले. स्त्रियांच्या व अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळा काढल्या. विद्येच्या क्षेत्रातील ब्राह्मणांची मक्तेदारी आणि धार्मिक क्षेत्रातील त्यांचे वर्चस्व या गोष्टी बहुजनसमाजाच्या उन्नतीच्या आड येत होत्या. फुले यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला; आणि स्वत:च्या नैसर्गिक मानवी हक्कांसाठी झगडण्यास शूद्रातिशूद्रांना प्रवृत्त केले. मात्र महात्मा फुले यांच्या या बंडखोर भूमिकेचा विपर्यास झाल्याखेरीज राहिला नाही. ते ख्रिस्ताळलेले होते, ब्राह्मणद्वेष्टे होते, इंग्रजधार्जिणे होते, असे आरोप त्यांच्यावर केले गेले. रानडेप्रभृती काही अगदी थोडे सुधारक वगळल्यास त्यांच्या चळवळीला उच्चवर्णीय नेत्यांकडून विरोधच झाला. बहुजनसमाजात शिक्षणाचा प्रसार झाला नसल्याने फुले यांचे विचार त्यांच्या पचनी पडले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक चळवळीला ओहोटी लागली. इ.स. 1895 मध्ये
आगरकर कालवश झाले. सन 1901 मध्ये रानडे यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर सामाजिक चळवळीला कोणी धुरंधर नेता राहिला नाही. अशा स्थितीत शाहूमहाराजांनी फुले आणि रानडे यांचे सामाजिक सुधारणेचे कार्य हिरिरीने पुढे चालू ठेवले. “मागासलेल्या लोकांच्या उन्नतिकरिता माझे कैलासवासी मित्र न्यायमूर्ती रानडे व गोपाळराव गोखले यांनी पुष्कळ श्रम केले. मागासलेल्या लोकांत विद्येचा प्रसार होण्याकरिता विशेष प्रयत्न केले पाहिजेत, ही मूळ कल्पना मला त्यांच्यापासूनच आली.” रानडे, आगरकर, गोखले यांची दृष्टी उदार व सर्वसंग्राहक होती. त्यांचा येथे जय झाला असता तर वेगळया ब्राह्मणेतर चळवळीची गरजच पडली नसती, असे खुद्द शाहूछत्रपतींचे मत होते. मात्र रानडे यांच्या कार्यपद्धतीतील नेमस्तपणा महाराजांच्या प्रकृतीला मानवण्यासारखा नव्हता. तसेच पूर्वपरपरेच्या मुळावरच घाव घालून सामाजिक जीवनातील सातत्य नष्ट करणारा फुले यांचा मर्मभेदी सर्वेकष बंडखोरपणाही त्यांना ग्राह्य वाटला नाही. म्हणून महात्मा फुले यांचा संघर्षवाद
आणि न्यायमूर्ती रानडे यांची परंपरानिष्ठ समन्वयशील वास्तवाभिमुख दृष्टी यांची सांगड घालून शाहूमहाराजांनी महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
              महाराज प्रत्यक्ष कारभार पाहू लागले, तेव्हा कोल्हापूर संस्थानच्या शासनयंत्रणेतही उच्चवर्णीयांचाच भरणा होता. हे ज्येष्ठ अधिकारी गादीचे एकनिष्ठ सेवक असले, तरी त्यांचे सनातनी आचारविचार आणि पूर्वग्रह आपल्या सुधारणावादी धोरणास बाधक ठरण्याचा संभव आहे, याची शाहूछत्रपतींना जाणीव होती. म्हणून त्यांनी यथावकाश आपल्या विश्वासातील माणसांच्या वेगवेगळया अधिकारपदांवर नेमणुका करून शासनावरील आपली पकड़ दृढ केली. आधीच्या काळात निरंकुशपणे हुकमत गाजविण्याचा सराव झालेले इंग्रज अधिकारी त्यांच्या लहरीपणाला लगाम घातला जाणार, असे दिसू लागताच लवकरात लवकर नोकरी सोडून निघून गेले. त्यामुळे आपल्या धोरणाशी इमान राखणाच्या सेवकांचा नवा संच सिद्ध करण्याची योजना महाराजांना तडीस नेता आली. त्यानंतर बहुजनसमाजाच्या उन्नतीसाठी नि:शंकपणे पावले टाकण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्या राज्यातील निरनिराळ्या भागांत दौरे काढून सर्व थरांतील लोकांशी त्यांनी समरसतेने संपर्क साधला; आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी शक्य ती उपाययोजना केली. त्यामुळे त्यांना आपल्या प्रजाजनांचा विश्वास संपादन करता आला. गरिबांचा कैवारी म्हणून सर्व जण त्यांना ओळखू लागले. त्यांच्या सामाजिक सुधारणेच्या व दलितोद्वाराच्या कार्याला लोकांचा विरोध झाला नाही, याचे खरे कारण हेच होय.

41.

महात्मा फुले यांनी प्रथम कोणते काम हाती घेतले ?

अ. इंग्रजी शिक्षणातून आलेल्या नव्या जाणिवांचे लोग वेगवेगळया थरांतील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविले.

ब. राज्यातील विविध भागात दौरे काढले.

क. आपल्या धोरणाशी इमान राखणाच्या सेवकांचा संच तयार केला.

ड. स्त्रियांच्या व अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी शाळा काढल्या.

42.

महात्मा फुले यांच्या बंडखोर भूमिकेचा परिणाम काय झाला ? 

अ. विद्येच्या आणि धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मणांची मक्तेदारी व वर्चस्वाला धक्का पोहचू लागला.

ब. वेगळया ब्राह्मणेतर चळवळीची गरज पडली नाही.

क. महात्मा फुले हे इंग्रजधार्जिणे, ब्राह्मणद्वेष्टे, ख्रिस्ताळलेले आहेत, असे आरोप त्यांच्यावर होऊ लागले. 

ड. सत्यशोधक चळवळीला ओहोटी लागली.

43.

महात्मा फुले यांचे विचार बहुजनसमाजाच्या पचनी पडले नाहीत, कारण

अ. महात्मा फुले यांच्या विचारांना उच्चवर्णीय नेत्यांकडून विरोध झाला.

ब. स्त्रियांच्या शिक्षणासाठीच महात्मा फुले यांनी शाळा काढल्या.

क. स्वत:च्या नैसर्गिक मानवी हक्कासाठी झगडण्यास शुद्रातिशुद्रांना महात्मा फुले यांनी प्रवृत्त केले.

ड. बहुजनसमाजात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता.

44.

शाहूमहाराजांना महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवाविशी का वाटली ?

अ. सनातन्यांचा आचारविचार आणि पूर्वग्रह सुधारणावादी धोरणास बाधक ठरण्याचा संभव होता.

ब. शासनयंत्रणेत उच्चवर्णीयांचाच भरणा होता. 

क. पूर्वपरंपरांच्या मूळावर घाव घालून सामाजिक जीवनातील सातत्य नष्ट करणारा महात्मा फुले यांचा सर्वेकष बंडखोरपणा त्यांना योग्य वाटला नाही.

ड. रानडे, आगरकर, गोखले यांचे विचार समाजाच्या पचनी पडले नाहीत.

45.

शाहूमहाराजांच्या सामाजिक सुधारणेच्या वे दलितोद्धाराच्या कार्याला लोकांचा विरोध का झाला नाही ? 

अ. शासनयंत्रणेत उच्चवर्णीयांचाच भरणी केला.

ब. समाजातील सर्व थरांतील लोकांशी समरसतेने संपर्क साधून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी उपाययोजना केली. 

क. महात्मा फुले यांचा संघर्षवाद आणि न्या. रानडे यांची परंपरानिष्ठ समन्वयशील वास्तवाभिमुख दृष्टी यांची सांगड घातली. 

ड. इंग्रज अधिका-यांच्या लहरी पणाला लगाम घातला.

46.

प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा. 

47.

X या पारदर्शक कागदाच्यी घडी दिलेल्या पर्यायांतून निवडा. 

48.

दिलेली माहिती व नातेसंबंध अभ्यासा व तो दर्शविणारा पर्याय निवडा.

x / y निर्देशित करते की x ही y ची आई आहे.

x / y निर्देशित करते की x हा y चा भाऊ आहे. 

x + y निर्देशित करते की x ही y ची बहीण आहे.

x x y निर्देशित करते की x ही y ची मुलगी आहे.

m + 1-0 x p / q

49.

रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत पर्याय निवडा.

50.

सुमा, बानो आणि जॅक या प्रत्येकाने स्वत:ची इंग्रजी वर्णाक्षरे, अंक आणि इतर चिन्हांची पुढीलप्रमाणे मालिका तयार केली आहे : 

त्यांनी तीन घटकांचा गट करण्याचा एक खेळ पुढील नियम निश्चित करून रचला आहे. कोणत्याही घटकाची पुनरावृत्ती होणार नाही. बानोने तिच्या मालिकेतील वर्णाक्षर घटक हलवण्याची सुरुवात डाव्या टोकाकडून करायची आहे. जॅकने त्याच्या मालिकेतील अंक घटक डावीकडून हलवायला सुरुवात शेवटच्या व्यक्तीने तिच्या मालिकेतील इतर घटक उजव्या टोकाकडून हलवायला सुरुवात करायची आहे. त्यांनी प्रत्येक वेळी : मालिकेतील क्रमाने घटक हलवले. त्यांचा खेळ संपवणारा गट निवडा.

51.

सोबतच्या आकृतीत दाखवलेला A, B, C, D व E या वसाहतींना जोडणा-या रस्त्यांचा नकाशा अभ्यासा. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून प्रत्येकी सात मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालता येईल अशा मार्गाची रचना करा. ती करताना तुम्ही ज्या वसाहतीपासून सुरुवात केली त्या वसाहतीत परतलेच पाहिजे असे नाही. या बंधनांची पूर्ति करणारे विधान दिलेल्या यादीतून निवडा.

52.

एका खेळात खेळाडूला एका पाळीत गुण मिळवण्याच्या तीन संधी आहेत. प्रत्येक सलग जय खेळाडूला आधीच्या जयापेक्षा अधिक गुण मिळवून देतो. दुसरा जय पहिल्यापेक्षा 100 जादा गुण बहाल करतो. आणि तिसरा जय हा दुसन्या जयामुळे मिळणा-या जयाच्या दुप्पट गुण बहाल करतो. लच्छीने तिच्या पाळीदरम्यान सर्वाधिक गुण जिंकले आणि तिला एकूण 700 गुण मिळाले. पहिल्या जयासाठी किती गुण बहाल केले गेले ?

53.

'X' व 'Y' हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1-5 किमी गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?

54.

गाळलेली जागा असलेले प्रसंग आणि शब्द यादी अभ्यासा. वर्णनातील रिकाम्या जागी प्रत्येक शब्द ठेवला जाईल तेव्हा तो पूर्ण वर्णनाच्या अर्थासंदर्भात नेमका असेल व तयार होणारी दोन्ही वर्णने समानार्थी होतील अशी शब्द जोडी निवडा.

ज्वालामुखीमुळे ओसाड पडलेल्या जमिनीवर नैसर्गिकरीत्या उत्क्रांत झालेले विविध __________जीव हा दूरच्या भविष्यात तेथे मानवही वसती करू शकेल याचा समर्थ पुरावा आहे.

अ. मलूल 

ब. नवजात

क. क्षीण

ड. उमलते

इ. साचलेले

55.

तीन विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. सर्व B हे J आहेत. काही C हे J आहेत. सर्व P हे C आहेत.

निष्कर्ष :

अ. काही c हे B आहेत.

ब. एकही P हा J नाही.

क. काही B हे C आहेत. 

 

56.

एका वर्गामध्ये 15 मुले आणि 10 मुली आहेत. तीन मुलांची यादृच्छिकपणे (random) निवड करावयाची आहे. एक मुलगी आणि दोन मुलगे यांची निवड होण्याची शक्यता _____________ आहे.

57.

तुम्हाला तुमच्या दुस-या घरासाठी कष्टाळू माळी नेमायचा आहे. तुमच्या मित्राने तुम्हाला तीन व्यक्तींची जेडा, मुटा आणि हाका ही नावे देऊन यातील एकजण नेहमीच खरे बोलतो, एकजण एकदा खरे व एकदा खोटे बोलतो आणि एकजण नेहमीच खोटे बोलतो, अशी माहिती दिली. त्यांना भेटल्यानंतर तुम्ही विचारले, “तुमच्यापैकी माळी कोण आहे ?” प्रत्येकाने पुढीलप्रमाणे उत्तरे दिली.

जेडा : मी माळी आहे. मुटा खोटे बोलतो.

मुटा : मी माळी आहे. हाका खोटे बोलतो.

हाका : मुटा माळी आहे. जेडा खोटे बोलतो.

माळी कोण आहे/आहेत ?

58.

पुढील परिच्छेदातील शेवटच्या विधानाच्या भूमिकेच्या संदर्भात विसंगत पर्याय निवडा :

कदाचित प्लुटोचा चंद्र, शॉरौं कवच तयार करून वे ब-याचशा सौरवाऱ्याला पुनर्दिशा देऊन त्या ग्रहाच्या बर्फाळ वातावरणाचा म्हास लक्षणीय प्रमाणात कमी करत असावा. चंद्राच्या आकारामुळे व जवळिकीमुळे प्लुटोचा चंद्राबरोबरचा सहसंबंध ही सूर्यमालेतील एक असामान्य अशी अन्योन्यक्रिया आहे. या चंद्राचा व्यास प्लुटोच्या निम्म्याने थोडा जास्त आहे व तो त्याच्यापासून फक्त 19,310 किमी अंतरावर असलेल्या कक्षेतून भ्रमण करतो.तुम्हाला माहीत आहेच की आपला चंद्र याच्या तिपटीने पृथ्वीच्या जवळ आहे व तो मंगळाइतका मोठा आहे. 

59.

पुढे X व Y ही दोन प्रतिपादने दिली आहेत व नंतर त्यासंबंधीचे काही युक्तिवाद दिले आहेत. प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा विचारात घेऊन लागू पडणारे सर्व युक्तिवाद निवडा. 

X. लिओनार्दो दा व्हिन्चीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रयोजी हा अवयव दाखवते.

Y. जानेवारी 2017 साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा नवा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले आहे.

युक्तिवाद :

अ. ती तार्किक दृष्ट्या विसंगत म्हणून विचारात घेता येतील, कारण लोकांना 16 व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि व्हिन्चीचे रेखाटन त्याचा पुरावा देते.

ब. ती परस्परविरोधी म्हणून विचारात घेता येतील, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती असूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले आहे.

क. संशोधकांनी तपशीलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 7वा अवयव असल्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्परपूरक ठरतात. 

60.

कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिका-यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत आणि अठ्ठावन कनिष्ठ अधिका-यांपैकी फक्त स्त्रिया आहेत.

आरोपांच्या विरोधात स्वत:चा बचाव करण्यासाठी कंपनीने ____________ हे दाखवून देणे सर्वात उत्तम ठरेल.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.