राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

जर A+ B म्हणजे, A भाऊ आहे B चा.
Ax B म्हणजे, A पती आहे B चा.
A ÷ B म्हणजे, A माता आहे B ची.
A - B म्हणजे, A बहिण आहे B ची.
तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की, T हा P चा पुत्र आहे ?

62.

खाली एक विधान व त्यावर आधारित दोन पूर्वधारणा दिलेल्या आहेत. कोणती/कोणत्या पूर्वधारणा दिलेल्या कथनात अंतर्निहित आहे/आहेत, याबाबत योग्य पर्याय निवडा.

विधान : एका राष्ट्रीयीकृत बँकेने राष्ट्रीय दैनिकात जाहिरात दिली की पात्र, उमेदवारांनी चार्टर्ड अकाऊंटन्ट च्या 100 पदांसाठी आवेदन करावे.

पूर्वधारणा :

(i) पात्र चार्टर्ड अकाऊंटन्ट या जाहिरातीला प्रतिसाद देतील,

(ii) राष्ट्रीयीकृत बँकेत नियुक्ती हवी असलेले पात्र चार्टर्ड अकाऊंटन्ट पर्याप्त संख्येत उपलब्ध आहेत.

पर्यायी उत्तरे :

63.

एका घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरूद्ध आहे. निळी बाजू, लाल आणि हिरवीच्या मध्ये आहे. पिवळी बाजू, नारिंगी बाजूच्या शेजारी आहे. पांढरी बाजू, पिवळीच्या शेजारी आहे. हिरवी बाजू तळाकडे आहे. तर पिवळ्या रंगाच्या शेजारचे चार रंग कोणते?

64.

एक अंक व्यवस्थापन यंत्र, संख्यांच्या इनपुट ला प्रत्येक चरणात विशिष्ट नियमानुसार पुनर्व्यवस्थापित करते. खाली इनपुट आणि पुनर्व्यवस्थापनाचे चरण यांचे एक उदाहरण दिलेले आहे : 

इनपुट - 38, 28, 3, 7, 30, 5

चरण । - 3, 38, 28, 7, 30, 5

चरण II- 3, 28, 36, 7, 30, 5

चरण III - 3, 28, 5, 38, 7, 30

चरण IV - 3, 28, 5, 30, 38, 7

चरण V - 3, 28, 5, 30, 7, 38

चरण V या इनपुटचा अंतीम चरण आहे. जर 11, 58, 45, 17, 20, 38 हा एखाद्या इनपुटाचा प्रथम चरण असेल तर, 11, 45, 38, 20, 58, 17 हा, त्या इनपुटाचा कोणता चरण असेल?

65.

खाली आकृत्यांची एक मालिका दिलेली आहे. त्यापैकी क्रमांक नसलेल्या आकृत्या बरोबर आहेत. क्रमांक असलेल्या आकृत्यांपैकी एक आकृती मालिकेसाठी उपयुक्त नाही. ती शोधा :

66.

एक जागा रिक्त असलेली आकृत्यांची मालिका दिलेली आहे. क्रमाने येणारी पुढील योग्य आकृती दिलेल्या पर्यायांमधून निवडा :

67.

खाली तीन विधाने आणि त्यावरून काढलेले चार निष्कर्ष दिलेले आहेत. सर्व विधाने सत्य मानून, त्यावरून तार्किकदृष्ट्या निघणाच्या निष्कर्षांबाबतचा योग्य पर्याय निवडा :

विधाने :

(a) काही दवाखाने जीम आहेत.

(b) काही शेती स्टेडियम आहे.

(c) कोणताही दवाखाना स्टेडियम नाही.

निष्कर्ष : (i) काही जीम स्टेडियम आहेत,

(ii) काही जीम स्टेडियम नाहीत.

(iii) काही शेती दवाखाना आहे.

(iv) काही शेती दवाखाना नाही. 

68.

आकृत्यांची एक मालिका दिलेली आहे मालिका पूर्ण करणारी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती दिलेल्या पर्यायांमधून निवडा :

69.

सात व्यक्ती A, B, C, D, E, F आणि G आपले व्यवसाय वेगवेगळ्या सात शहरात करतात. ती शहरे चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, जयपूर आणि भुवनेश्वर आहेत. परंतु याच क्रमाने असतील असे नाही. ते डॉक्टर, इंजिनियर, फार्मासिस्ट, वकील, काऊंसलर, प्रोफेसर आणि आर्टिस्ट आहेत. परंतु याच क्रमाने असतील असे नाही.

 

A फार्मासिस्ट आहे आणि भुवनेश्वरला पॅक्टीस करतो. D बंगलोर ला पॅक्टीस करतो परंतु तो डॉक्टर किंवा आर्टिस्ट नाही. हैदराबाद मध्ये मॅक्टीस करणारा प्रोफेसर आहे. G काऊंसलर आहे.आणि मुंबई किंवा चेन्नई ला प्रैक्टिस करीत नाही. E वकील आहे आणि अहमदाबाद मध्ये पॅक्टीस करतो. F चेन्नई मध्ये पॅक्टीस करतो. परंतु आर्टिस्ट नाही. C मुंबई ला पॅक्टीस करतो.

तर खालीलपैकी व्यवसाय आणि मॅक्टीस चे स्थान यांचे कोणते संयोजन बरोबर आहे ?

 

(a) फार्मासिस्ट - जयपूर

(b) इंजिनिअर - चेन्नई

(c) डॉक्टर - बंगलोर

(d) आर्टिस्ट - मुंबई

पर्यायी उत्तरे :

70.

प्रश्नार्थक चिन्हाने दर्शविलेली रिकामी जागा असणारी, आकृत्यांची मालिका खाली दिलेली आहे. रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा :


71.

बाहेरच्या बाजूला चार संख्या असलेली तीन वर्तुळे आहेत. त्यापैकी पहिल्या दोन वर्तुळात विशिष्ट नियमानुसार संख्या भरलेल्या आहेत. परंतु तिस-या वर्तुळात प्रश्नार्थक चिन्ह (?) आहे. दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या, त्या नियमानुसार त्या प्रश्नार्थक चिन्हा (?) ची जागा घेऊ शकते. ती संख्या शोधा :

72.

अमनने रु. 70,000 गुंतवून एक उद्योग सुरू केला. राखी या उद्योगामध्ये सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रु. 1,05,000 गुंतविले. सागरने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगामध्ये रु. 1.4 लाख गुंतविले व उद्योगामध्ये आला. जर तीन वर्षांनंतर या उद्योगामधील नफा अमन, राखी व सागर यांच्यामध्ये वाटावयाचा असेल तर तो कोणत्या प्रमाणात वाटावा?

73.

खाली एक संख्या मालिका दिलेली आहे. त्यापैकी एक पद चुकीचे आहे. चुकीचे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

3, 10, 29, 60, 127, 218, 345

74.

प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या असेल?

75.

आगगाडी A ची लांबी x मीटर्स आणि वेग u कि.मी./तास आहे. आगगाड़ी B ची लांबी y मीटर्स आहे, आणि वेग u कि.मी./तास आहे. जेंव्हा त्या दोन गाड्या उलट दिशेने समांतर धावतात तेंव्हा त्या परस्परांना t मिनीटात ओलांडतात. पण जेंव्हा त्या एकाच दिशेने समांतर धावतात तेंव्हा त्या 4t मिनीटात परस्परांना ओलांडतात. जर u = 50 कि.मी./तास, तर u ची किंमत किती?

राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०१४ प्र.क्र. ७६ ते ८० चे पर्यायनिहाय गुण

76.

चालण्याचा मार्गासह एक बाग तुमच्या भागात आहे. परंतु ती धुम्रपान व मद्यपान करणा-या लोकांनी व्यापलेली असते त्यामुळे मुलांना तेथे खेळणे जवळपास अशक्य असते. तुम्ही यावर :

77.

जिल्ह्यात ब-यापैकी क्षमता असलेली लघुसिंचन प्रकल्प विकसीत करण्यासाठी दोन स्थळे आहेत. सिंचन विभागाचे प्रमुख म्हणून शासनाने तुम्हास योग्य स्थळ सूचित करण्यास सांगितले, जेणेकरुन न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचे ध्येय साध्य करता येईल.

योजनेतील सिमीत आर्थिक स्त्रोत उपलब्धता पाहता केवळ एकच धरण तूर्त शक्य आहे. वरील परिस्थितीत खालीलपैकी कोणता पर्याय सर्वात योग्य म्हणून तुम्ही शासनास शिफारस करुन पाठवाल.

78.

शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची यादी तयार केली. अशा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना दरमहा रुपये 2 प्रति किलो या अनुदानित दराने 35 किलो अन्नधान्य उपलब्ध केले जाते. एका जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याचे निदर्शनास आले की, त्याचे जिल्ह्यातील जवळपास 20% कुटुंबे जी शासन निकषाप्रमाणे खरोखरच गरीब आहेत ती दारिद्र्य रेषेच्या यादीत नाहीत, तर मोठ्या संख्येने जी कुटुंबे खरोखरच गरीब नाहीत त्यांची नावे यादीत असून ती गैरफायदा घेत आहेत. शासनाने जिल्हाधिका-यांची ख्याखु-या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना यादीत अंतर्भूत करण्याची मागणी अमान्य केली, परंतु शासनाने असे निर्देश दिलेत की अवैध फायदा घेणाच्या कुटुंबाची नावे यादीतून वगळावी. वरील परिस्थितीत तुम्ही जिल्हाधिका-याचे जागी असता तर कोणता मार्ग चोखाळला असता?

79.

 तुमच्या विभागातील राजकीय नेत्यांपैकी एक नेता असंघटित मजुरांचे आंदोलन आयोजित करत आहे. तुमचा अनुभव असा आहे की अशा प्रकारच्या आंदोलनात लोक अदूरदर्शी लाभांसाठी सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचा विध्वंस करतात आणि विविध संस्थांनी अनेक वर्षे वाढवलेली झाडे जाळतात वा कापतात. या क्षेत्रातील एक नागरिक या नात्याने हा विध्वंस थांबवण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी काय कराल?

80.

अमेरीकेच्या राष्ट्रपतींनी पहिला मानव चंद्रावर नेणाच्या अपोलो मोहिमेच्या तयारीच्या स्थळाच्या अंतिम क्षणाची तयारी तपासण्यासाठी भेट दिली, राष्ट्रपतींनी त्यावेळी तेथील परिसराची सफाई करीत असलेल्या सफाई कर्मचा-याला, 'तू काय करतो आहेस'? सफाई कर्मचारी तात्काळ उत्तरला '' मी पहिला मानव चंद्रावर पाठविण्याच्या मोहिमेत योगदान करतो आहे."

तुम्ही त्याक्षणी राष्ट्रपतीच्या जागी असता तर तुम्ही सफाई कामगाराच्या उत्तराचे मुल्यांकन कसे केले असते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.