राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

प्रश्न क्रमांक 21 ते 23 :
           सध्या बाजारात जननिक अभियांत्रिकेची अनेक उत्पादने आढळून येतात. उदा. इंटरफेरॉन, मानवाचे वृद्धीसंप्रेरक आणि मानवीय इन्स्युलिन. सन 1982 साली पुन : संयोजी जिवाणूने बनविलेले मानवीय इन्स्युलिन बाजारात विक्रीस आले. पूर्वी ही सर्व प्रथिने प्राण्यांच्या पेशीपासून शुद्ध केली जात होती. परंतु मानवावरील ही स्वरूपे त्यावेळी फार कमी प्रमाणात उपलब्ध होती.
          1982 च्या पूर्वी मधुमेहात उपयोगात येणारी सर्व इन्स्युलिन केवळ गुरांच्या बोव्हीन व डुकरांच्या स्वादूपिंडापासून शुद्ध केली जात होती. ही सर्व इन्स्युलिन् उत्पादके मास कारखान्यात सह उत्पादन म्हणून तयार व्हावयाची. इन्स्युलिनचा पुरवठा हा मास कारखान्यातील पुरवठा व गरजेवर अवलंबून होता. पुनः संयोजी इ.कोलाय पेशीने व्यापारी तत्वावर तयार केलेले मानवीय इनस्युलिन मुळे ते तयार करण्यात भविष्यात कमतरता राहण्याबाबत चिंता राहीलेली नाही.
           याशिवाय ज्यांना मधूमेह झाला आहे व ज्यांना बोव्हीन अथवा पोरसीन चे वावडे आहे त्यांच्याकरिता मानवीय इनस्युलिन अत्यंत उपयुक्त ठरेल.
           पुन:संयोजी डी.एन्.ए. चे तंत्र जीन थेरपीमध्ये महत्वाची भूमिका बजावते ज्यात ते प्रत्यक्षात सहभागी होऊन जीन साहित्यात फेरफार देखिल करते.

21.

परिच्छेदास योग्य ते नाव सुचवा :

22.

पुढील दोन विधानांचा विचार करा :
(a) मानवीय इन्स्युलिन 1982 पावेतो उपलब्ध नव्हते.

(b) तोपर्यंत इन्स्युलिन मांस कारखान्यातून मुख्य उत्पादन म्हणून उपलब्ध व्हावयाचे. वरील कोणते विधान योग्य आहे? 

23.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) मांस कारखान्यातून प्राप्त होणारे इन्स्युलिन कधीही कमी पडणे शक्य नव्हते.

(b) इ.कोलाय पेशींपासून मिळणारे मानवीय इन्स्युलिन चे महत्व केवळ विशिष्ट प्रकारच्या डायबेटिक करता आहे.

प्रश्न क्रमांक 24 ते 27 :
रसायनशास्त्र आपल्या सभोवताली सर्वत्र आढळते. आपण घेतलेला प्रत्येक श्वास, आपण ज्या अन्नाचा आस्वाद घेतो, ज्या कपड्यांना परीधान करतो, जीवनाच्या प्रत्येक पैलूत रसायनशास्त्र शिरलेले आहे. इतर कोणत्याही विज्ञानाच्या शाखेपेक्षा अधिक रसायनशास्त्राने ज्या जगात आपण राहातो ते बदलले आहे. आपल्याला मुबलक खाद्य उपलब्ध करून दिलेले आहे. उत्तम आरोग्य दिलेले आहे, ताकदवर वस्तू, मुलायम कपडा, अधिक उज्वल रंग, अधिक स्वच्छ घरे, सुरक्षित वाहतुक, अधिक ऊर्जा, कार्यक्षमता वाढविली आहे इत्यादि. आपले शरीर क्लिष्ट रसायनांनी मिळून तयार झालेले आहे. (65% भार पाणी या रसायनानेचा आहे.) आपल्या शरीरातील पेअंतर्गत होणा-या रसायनिक प्रक्रियेमुळे आपण जीवित असतो. एवढेच नव्हे आपण आजारी पडलो, तरी औषध म्हणून रसायनाचा वापर करतो. कधी नैसर्गिक तर कधी मानव निर्मित औषध उपचारासाठी वापरले जाते. रसायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरातील ऊब आपण कामथ ठेऊ शकतो; अन्न शिजवू शकतो, आणि वाहतुक गतीमान करू शकतो, इत्यादी. रसायनशास्त्राच्या वरदाना बरोबरच, या शास्त्राची एक अंधारी बाजू देखील आहे. या शास्त्राच्या प्रगत संशोधनामुळे काही रसायनांचा शोध लागलेला आहे, जी समाजाला व मावनजातीला अत्यंत घातक आहेत. जैविक आतंकवाद व रासायनिक शस्त्रे हे विज्ञानाचे शाप आहेत. टॉक्सीकॉलॉजी या शास्त्राद्वारे अशा घातक रसायनांचा अभ्यास केला जातो, जे मानवी जीवीताला धोका निर्माण करतात. सध्या कुठलेही विधातक रसायन हे सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणे शक्य नाही तसेच एखाद्या गुन्हेगाराने गूढ पद्धतीने जर या रसायनांचा वापर गुन्हा करण्यासाठी केला तरी तो सापळ्यात अडकण्यापासून सुटणे जवळपास अशक्य. विषारी द्रव्ये हे असेच एक दुधारी शस्त्र आहे. गुन्हेगार याचा बेमालुमपणे वापर करुन निरपराध लोकांचा बळी, त्यांच्या नकळत घेऊ शकतो. कधी-कधी असे मृत्यू नैसर्गिक मृत्यु असल्याचे सुद्धा भासविले जाते.

24.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) रसायनशास्त्र सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे.

(b) रसायनशास्त्राशिवाय जीवन अशक्य

25.

पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
(a) मरण्याने मानवी शरीरातील रासायनिक प्रक्रिया संपुष्टात येते.

(b) रसायनशास्त्राने जैविक आतंकवादावर औषध शोधावयास हवे.

26.

पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) मानव निर्मित औषधी नैसर्गिक औषधांपेक्षा/उपायांपेक्षा अधिक उपयुक्त असते.

(b) रसायनशास्त्राच्या घातक परिणामांना चांगली रसायने आवर घालतात.

27.

टॉक्सीकॉलॉजी या शास्त्राची मध्यवर्ती कल्पना काय ?

प्रश्न क्रमांक 28 ते 32 :
             राष्ट्र निर्माण प्रक्रिया व भारतीय राज्यघटनेविषयीच्या अभ्यासात पुन्हा पुन्हा एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे विविधताविषयक धोरणात एक पायाभूत तत्व राहीले आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांना व भाषिक समूहांना आपल्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा अधिकार असेल, हे ते तत्व होय. आपले एकूण समाजजीवन घडवणाच्या अनेकविध संस्कृर्तीचा वेगळेपणा हरवू न देता एकात्म समाजजीवन जगण्याचा आपण संकल्प केला होता. भारतीय राष्ट्रवादाने एकात्मता व विविधता यामध्ये समन्वय घडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्राचा अर्थ असा नव्हे की, प्रादेशिक अस्मिता नाकारली जाईल. या अर्थाने भारताचा दृष्टीकोन युरोपातील काही देशांमध्ये वेगळा होता. त्या देशांमध्ये सांस्कृतिक विविधतेकडे 'राष्ट्रीय एकात्मतेला धोका' म्हणून पाहण्यात आले.
              भारताने विविधतेच्या प्रश्नावर लोकशाहीवादी दृष्टीकोन स्विकारला. लोकशाहीमध्ये प्रादेशिक आकांक्षांच्या अभिव्यक्तीस मान्यता आहे व प्रादेशिकतेस लोकशाही विरोधी किंवा राष्ट्रविरोधी मानले जात नाही. या व्यतिरिक्त लोकशाही राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष व समूह प्रादेशिक ओळख, अपेक्षा किंवा कोणत्यातरी विशेष प्रादेशिक समस्येला साधार व लोकांच्या भावनेचे प्रतिनिधीत्व करू शकतात, त्यामुळे लोकशाही राजकीय प्रक्रियेमध्ये प्रादेशिक अपेक्षा अधिक तीव्र होतात. त्याचबरोबर लोकशाही राजकारणाचा एकू अर्थ असा आहे की, प्रादेशिक मुद्दे व समस्यांवर धोरण निर्माण प्रक्रियेमध्ये योग्य लक्ष दिले जाईल व त्यांना योग्य प्राधान्य दिले जाईल.
या प्रकारच्या व्यवस्थेत कधी-कधी तणाव निर्माण होऊ शकतात. कधी-कधी असे होऊ शकते की, राष्ट्रीय एकात्मतेखातर प्रादेशिक अपेक्षा व गरजांकडे दुर्लक्ष होईल. कधी असेही घडू शकेल की, प्रादेशिक मुद्दयांखातर राष्ट्राच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या गरजांकडे डोळेझाक केली जाईल. ज्या देशांमध्ये एकात्मता करण्यावरच अधिक भर दिला जातो अशा देशांमध्ये प्रदेशांचे अधिकार, हक्क आणि प्रदेशांचे भिन्न अस्तित्व या मुद्द्यावरून राजकीय वाद विवाद होणे ही बाब नित्याचीच आहे.

            स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाला विभाजन, स्थलांतर, संस्थानांचे विलीनीकरण व राज्यांच्या सीमांची पुर्नआखणी या सारख्या कित्येक भीषण प्रश्नांला तोंड द्यावे लागले. देश-विदेशातील अनेक निरिक्षकांचा अंदाज होता की भारत एक राष्ट्र म्हणून फार काळ टिकू शकणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर जम्मू-काश्मिरचा प्रश्न समोर आला, हा केवळ भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेल्या संघर्षाचा मुद्दा नव्हता, काश्मिर खोयातील लोकांच्या राजकीय अपेक्षांचा प्रश्न देखील याच्याशी जोडला गेला होता. याच प्रकारे ईशान्येकडील काही भागांमध्ये भारताचा भाग असण्याच्या मुद्याशी सहमती नव्हती. सुरूवातीस नागालँडमध्ये आणि नंतर मिझोराममध्ये भारतापासून वेगळे होण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलने झाली. दक्षिण भारतात चाललेल्या द्रविड आंदोलनाशी संबंधित काही गटांनी एका टप्प्यावर वेगळ्या राष्ट्राची मागणी केली होती.

           या घडामोडींपाठोपाठ देशात ब-याच भागात भाषेच्या आधारावर वेगळ्या राज्यांच्या मागणीकरता जन आंदोलन करण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेली आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात ही राज्ये असलेल्या प्रदेशांमध्ये अशा प्रकारची आंदोलने झाली. दक्षिण भारतातील काही भागात विशेष करून तामिळनाडूमध्ये हिंदीला राज्यभाषा करण्याच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. उत्तरेत हिंदी त्वरित राष्ट्रीय भाषा करण्याच्या बाजूने उग्र आंदोलने झाली. 1950 च्या दशकातील उत्तरार्धात पंजाबी भाषिक लोकांनी वेगळ्या राज्याच्या मागणी करता आवाज उठविण्यास सुरूवात केली. अखेर त्यांची मागणीमान्य झाली आणि 1966 मध्ये पंजाब व हरीयाणा ही राज्ये स्थापन केली गेली. त्यानंतर छत्तीसगड, झारखंड व उत्तरांचल (आता उत्तराखंड) यांची स्थापना झाली. अशा प्रकारे देशांतर्गत प्रदेशांच्या सीमांची फेरआखणी करून विविधतेच्या आव्हानांचा सामना करण्यात आला.

28.

स्वातंत्र्यानंतर राज्यांची पुनर्रचना प्रामुख्याने कोणत्या बाबीवर केली गेली ?

29.

खालील विधानांतील कोणते विधान योग्य आहे?
(a) सर्व निरीक्षकांना असे वाटत होते की भारत एकसंघ राहू शकणार नाही.

(b) जम्मू व काश्मीर मध्ये पाकिस्तान भारत संघर्षापेक्षा त्या राज्यातील राजकीय अपेक्षांचा प्रश्न मोठा होता.

30.

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
(a) भारतात वेगवेगळी ज्ये आपली संस्कृती जपू शकतात.

(b) भारतात प्रादेषिक राष्ट्रीयवाद नाकारला जातो. 

31.

भारताने विविधतेच्या प्रश्नाचा सामना कसा केला?

32.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?

(a) भारतात एकात्मतेला प्राधान्य आहे परंतु प्रादेशिक विविधतेकडे दुर्लक्ष नाही.

(b) इतर देशात सांस्कृतिक विविधता एकात्मतेस धोका समजली जाते. 

प्रश्न क्रमांक 33 ते 37 :
            अंधश्रद्धेचे मूळ अज्ञानात असते. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना दोष देऊन, त्यांचा उपहास करून, त्यांना अडाणी ठरवून अंधश्रद्धेचे निर्मूलन होणार नाही त्याने ते नाउमेद होतील. सर्वसामान्य माणसात अंधश्रद्धा कशी निर्माण होते, कोणत्या मन:स्थितीत ती वाढते, तिचे दुष्परिणाम कसे भोगावे लागतात आणि अशी अंधश्रद्धा वेळीच बाजूला सारली नाहीतर पुढे किती दुर्दशा होऊ शकते, अनर्थ घडू शकतात, हे सर्व समंजसपणाने संयमित युक्तिवादाने पटवून दिले पाहिजे. अंधश्रद्धेवरील विश्वास डळमळीत होऊन प्रयत्नवादाचा आत्मविश्वासी पर्याय पटेपर्यंत हे काम चिकाटीने, व्रतस्थपणाने, अविरतपणे करण्याची गरज आहे. प्रत्यक्ष व्यवहारोपयोगी विचार रुजवून, भौतिक चिकित्सा करून अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकते. त्याला कायद्याची जोड मिळाली, तर अर्थातच अधिक बळकटी येईल. सरकारने त्याचा अध्यादेश काढला आहे; आगामी अधिवेशनात तो मंजूर करून घ्यावा ही अपेक्षा आहे.
                   आपण वैज्ञानिक युगात वावरतो. प्रगत साधने वापरतो, आयटी युगाची चर्चा करतो; पण व्यक्तिगत जीवनात विवेकवादी बनत नाही. सर्वसामान्य आजारांपासून ते अवकाळी पावसापर्यंतच्या प्रत्येक घटना-घडामोडींची वैज्ञानिक कारणे स्पष्ट होत असतानाही, त्यापासून संकटमुक्त होण्याचे अशास्त्रीय मार्ग चोखाळले जातात. म्हणूनच समाज भौतिकदृष्ट्या प्रगत होताना दिसला तरी मानसिकदृष्ट्या त्याची प्रगती समांतर होऊ शकलेली नाही. पंचमहाभूतांपासून निसर्गाची, सृष्टीची निर्मिती झाली, हे वैज्ञानिक सत्य आहे. तरीही सृष्टीनिर्मितीच्या अनेक कथा रचल्या गेल्या, कर्मकांडे सांगितली गेली. विज्ञानाने, तंत्रज्ञानाने तयार केलेल्या साधनांचा उपयोग अंधश्रद्धा, कर्मकांडे यांची वाढ करण्यासाठी बेलाशक व बेमालूमपणे होऊ लागला. संगणकावरून भविष्य सांगितले जाऊ लागले. तार, टेलिफोन, फॅक्स, ई-मेल यांसारखी आधुनिक वैज्ञानिक साधने नसती तर जगभरचा गणपती एकाच दिवशी दूध पिऊ शकला असता काय? हा महत्त्वाचा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे, ज्यांचे आत्मतेज, आत्मशक्ती इतकी प्रखर आहे की, ते साक्षात परमेश्वराशी संवाद साधू शकतात ( अर्थात असा त्यांचाच दावा असतो) त्या मंडळींना मोबाईलपासून इंटरनेटपर्यंतची मिथ्या साधने कशाला लागतात कुणास ठाऊक!

33.

कर्मकांड व विवेकवाद यामध्ये माणसाने योग्य निवड केल्यास -
(a) त्याला विज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करता येईल.

(b) त्याला त्याची मानसिक प्रगती साधता येईल.

(c) परिस्थितीबद्दल त्याला योग्य आकलन होईल.

(d) त्याला जीवन संकट मुक्त करता येईल. 

34.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम कठीण आहे कारण :
(a) लोक त्याच्या आहारी गेलेले आहेत आणि ते अडाणी आहेत.

(b) लोकांचा त्यावर विश्वास आहे व त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यास ते नाउमेद होतील.

(c) त्याची मुळे सामान्य माणसाच्या जीवनात खोल रूजलेली आहेत.

(d) श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा फार बारीक आहे.

35.

अंधश्रद्धेमुळे अनर्थ केंव्हा घडू शकतात ?
(a) अडाणी व अज्ञानी लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याने.

(b) लोकांचा त्यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढत गेल्याने.

(c) प्रगत साधने अस्तित्वात आल्यावरही अंधश्रद्धा जोपासल्याने. 

(d) वैज्ञानिक कारणे उपलब्ध असतांनाही अंधश्रद्धेवर विसंबून राहील्याने.

36.

मानसिकदृष्ट्या आपली प्रगती झालेली नाही. आपण :

(a) अंधश्रद्धा गाडल्या पाहिजेत.

(b) विज्ञान लोकाभिमुख केले पाहिजे.

(c) शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे.

(d) वरील एकही नाही.

37.

संकटातून बाहेर पडण्यासाठी समाज अजूनही अशास्त्रीय मार्ग चोखाळतो कारण -
(a) वैज्ञानिक ज्ञान अजून पुरेसे प्रगत झालेले नाही.

(b) दुस-या कोणत्याही मार्गाने त्याला उत्तर मिळत नाहीत व कर्मकांडामध्ये त्याची उत्तरे आहेत.

(c) माणसाच्या मनाची अद्याप तेव्हढी तयारी झालेली नाही.

(d) माणसांची चिकित्सक वृत्ती अपरिपक्व आहे.

प्रश्न क्रमांक 38 ते 42 :
माणूस हा इतर प्राण्यापेक्षा वेगळा प्राणी आहे. हे त्याचे वेगळेपण केवळ दिसण्यापुरते आहे, असे नाही; तर त्याच्या या वेगळेपणाचे नाते थेट त्याच्या असण्याशी आहे. विशेषत: आकलन शक्तीशी आहे. मेंदूशी आहे. त्याच्या विचार करण्याच्या शक्तीशी आहे. माणसाला विचार करता येतो. त्याला चांगले-वाईट कळते. आणि ही गोष्ट माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र त्याचबरोबर माणसाचे माणूस असणे ही बाबही जाणीवपूर्वक लक्षात घेण्यासारखी आहे. हे माणूस असणे फारच विचित्र आहे. काम, क्रोध, मोह, लोभ, मद व मत्सर हे सगळे विकार माणसांत आहेत. सगळीच माणसे या विकारांसह जगतात. फार तर तीव्रता कमी जास्त असते. मोह, प्रेम, क्षुधा, पिपासा, ... या माणसांच्या ऊर्मी आहेत; हे कसं विसरता येईल? माणूस सहजप्रेरणांच्या प्रभावातून मुक्त होत नाही. माणसांनी काम, क्रोध, मोह, लोभ, मद व मत्सर हे मनुष्याचे दुर्गुण मानले; पण खरे तर ही माणूस असण्याची लक्षणे, तेव्हा त्यास केवळ दुर्गुण ठरवून मोकळे कसे होता येईल? हा प्रश्नच. माणूस या लक्षणांसह जन्मतो, जगतो आणि मरतो, सत्य, परोपकार, अनालस्य, अनसूया, क्षमा आणि धैर्य हे माणुसकीचे गुण मानले जात असले; तरी वस्तुस्थिती अशी की, या गुणांचा माणसांत अभावचे जास्तीचा आढळतो. माणसे वरील विकाराचे बळी ठरतात. हे बळी ठरणे सहज मानता येईल; मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गत: माणसात जसे विविध विकार आहेत, तसा प्रत्येक माणसाला एक मेंदू आहे. निसर्गाने माणसाला विचार करण्याची स्वतंत्र क्षमता दिली आहे, तरीही माणसे विचार न करता इतरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात, आपल्या विचार करण्याच्या क्षमतेचा वापर करत नाहीत. बौद्धिक मानसिकदृष्ट्या गुलाम होतात. माणसाला लाभलेले शरीर आणि इंद्रिये लक्षात घेता माणसाने अशाप्रकारे इतरांचे गुलाम व्हावे, असा निसर्गाचा हेतू असण्याची बिलकुल शक्यता नाही. माणसाने तर्कनिष्ठ विचार करावा, आपल्या आणि इतरांच्या हिताचा विचार करावा, जाणीवपूर्वक विकारांवर नियंत्रण ठेवावे; असा निसर्गाचा हेतू नसेल का?
              माणसाला विकारमुक्त करण्याचे स्वप्न पाहणे, म्हणे केवळ स्वप्नच होय. सामान्यत: माणूस विकारवश आहे. तो त्याच्या प्रेरणा-प्रवृत्तींसह जगत आला आहे, आणि जगताहे; हे नाकारता येणार नाही. सध्या माणसे आपली स्वत:ची ओळख कोणत्या ना कोणत्या धर्म, जाती, पंथ, संघटना इत्यादीच्या आधाराने करून देताहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण माणसांनी हे विसरून चालणार नाही की, मानवी संस्कृतीचे अस्तित्व त्याच्या विकारवश जगण्यावर अवलंबून नाही तर त्या विकारांवर नियंत्रण ठेवण्यावर अवलंबून आहे. तेव्हा माणसांनी जाणीवपूर्वक विकारांवर नियंत्रण ठेवणे आणि नाती, नीती पाळणेही
आवश्यक आहे. अर्थात हे आपोआप घडणार नाही, पूर्वीही कधी घडले नाही. मानवी जीवनाच्या इतिहासात माणसांवर नियंत्रण ठेवणारी कोणती ना कोणती व्यवस्था होतीच, हे विसरता येणार नाही.

38.

खालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) इतक्यात माणूस स्वत:ला कुठल्यातरी घटकांचा समजतो.

(b) विकारांवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य आहे.

39.

मानवी संस्कृतीचे अस्तित्व कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे.

(a) विकारांसह जगण्यात
(b) नाती-नीती न पाळण्यावर

(c) आपल्या विकारांवर नियंत्रण ठेवण्यावर

(d) अनोळखी जीवन जगण्यावर

40.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
(a) माणसात गुणांपेक्षा दुर्गुण अधिक नसतात.

(b) माणसाने कधीही कोणाचाही गुलाम होऊ नये,

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१४ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.