राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ - GS-3


1. 

खालीलपैकी हे NCERT चे संविधानिक घटक नाही :

2. 

ग्रामीण भागात नागरी सुविधांची उपलब्धता (PURA) योजनेची खालीलपैकी प्रमुख उद्दिष्टे आहेत :

(a) ग्रामीण भागामध्ये नागरी सुविधा आणि जीवन जगण्यायोग्य संधीचा पुरवठा उपलब्ध करणे.

(b) नागरी व ग्रामीण विकासात निर्माण झालेला भेद दूर करणे व समन्वय प्रस्थापित करणे.

(c) ग्रामीण भागातून नागरी भागात होणा-या लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण कमी करणे.

(d) राजकीय नेतृत्वाचा विकास करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहे/आहेत?

3. 

देशात भूमी सुधार उपाय राबविण्यामागे दोन उद्दीष्टे होती, पहिले शेती उत्पादन वाढविणे तर दुसरे ___________.

4. 

भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

5. 

खालीलपैकी कोणती कारण/कारणे मानव संसाधने नियोजनाचे महत्त्व सांगतात ?

(a) अत्यंत प्रतिभावंत कर्मचारीवर्ग तयार करणे.

(b) आंतरराष्ट्रीय धोरणे.

(c) बदल आणि स्थानांतरित करण्यासाठी प्रतिरोध.

पर्यायी उत्तरे :

6. 

खालीलपैकी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेची उद्दिष्ट्ये कोणती आहेत ?
(a) आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.

(b) जल वापर कार्यक्षमतेत वाढ करणे.

(c) कृषी उत्पन्नात वाढ करणे.

(d) आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा विकास करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहे/आहेत? 

7. 

भारत सरकारने औपचारीक शिक्षणातील समस्या दूर करून सर्वांना शिक्षण घेता यावे यासाठी दुरस्थ शिक्षणाचे कार्य हाती घेतले. याला अनुसरून 1985 मध्ये कोणत्या मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली?

(a) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

(b) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

(c) लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

(d) केंद्रीय मुक्त विद्यापीठ

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत? 

8. 

2005 मध्ये सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाने कोणत्या प्रमुख निकषावर लक्ष केंद्रित केले?

(a) विना अनुदानित संस्थांना अनुदान मंजूर करणे.

(b) विज्ञान आणि औद्योगिकरणाच्या प्रयोगशाळांचा विकास करणे.

(c) बौद्धीक संपदेच्या संदर्भात जोडलेल्या संस्थात संघटनात्मक सुधारणा करणे.

(d) शेती आणि उद्योगांच्या विकासासाठी ज्ञानाचा वापर करणे.

(e) जनतेला अधिक लाभ पोहोचवण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

9. 

(I) 2017-18 मध्ये शेतीवृद्धीचे प्रमाण 2.1% इतके कमी झाले ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला समस्यांना सामोरे जावे लागले.

(II) 2017-18 मध्ये GDP वृद्धीचे प्रमाण 6.75% पर्यंत पोहचले.

वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?

10. 

"आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

11. 

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियम) सुधारीत अधिनियम 2016 अंतर्गत :
(a) 14 वर्षा खालील बालकांस सर्व उद्योग आणि प्रक्रिया केंद्रामध्ये कोणतेही काम करण्यास प्रतिबंध आहे.

(b) 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय आणि प्रणालीमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा.

(c) या गुन्ह्यासाठी मालकास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा है 20 ते 50 हजार इतका दंड किंवा दोन्हीही.

(d) गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान 1 ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल. वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ?

12. 

अनुसूचित जमातीच्या शेतक-यांसाठी सुरू केलेली कृषी स्वावलंबन योजना कोणत्या नावाने ओळखली जाते ?

13. 

विस्थापन संकल्पनेविषयी काही महत्वाचे मुद्दे :
(a) विकासासाठी विस्थापन केले जाते म्हणजे विकास हा विस्थापनास प्रेरित करतो.

(b) विस्थापनामुळे लोकांचे पूर्वीचे जीवन उद्धवस्त होते.

(c) शासकीय यंत्रणेद्वारे लोकांना पूर्वीच्या जागेवरून हटवले जाते.

(d) विस्थापीतांना नवीन सामाजिक जीवनासी व पर्यावरणासी समायोजन करावे लागते. वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा/चुकीचे आहे/आहेत ?

14. 

भारताच्या 2000 सालच्या लोकसंख्या विषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट कोणते ?
(a) गर्भनिरोधक उपायांच्या विस्तारासाठी स्वास्थ्य व मूलभूत संरचनांचा विकास करणे. (b) सन 2010 पर्यंत एकूण प्रजनन दर शून्यावर आणणे.

(c) सन 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्येच्या उद्देशाची प्राप्ती करणे.

(d) मुलींचे विवाहाचे वय 21 वर्षे करणे.

पर्यायी उत्तरे :

15. 

खालीलपैकी आरोग्याच्या क्षेत्रात काम करणा-या सेवाभावी संस्था कोणत्या आहेत ?
(a) भारतीय रेड क्रॉस संघटना 

(b) हिंद कुष्ठ निवारण संघ

(c) भारत सेवक समाज
(d) कस्तुरबा मेमोरिअल फंड

वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत 

16. 

उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी 1994 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली ?
(a) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

(b) राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद

(c) रूसा (RUSA) (d) उच्च शिक्षण संचालनालय

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत?

17. 

देशातील पहिले स्मार्ट डिजीटल व्हिलेज होण्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या गावाला मिळाला?

18. 

खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य नाही/त?
(a) ग्रामीण क्षेत्रासाठी विकास व संशोधन निधीची उभारणी करण्याचे कार्य नाबार्ड करते. (b) शेतक-यांना आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नाबार्ड मदत करते.

(c) सहकारी पतसंस्थांची योग्य पुनर्रचना करून कार्यक्षमता वाढविण्याचे कार्य नाबार्ड करते.

पर्यायी उत्तरे :

19. 

सन 2012-13 ते 2015-16 दरम्यान महाराष्ट्र शासनाने एका प्राइवेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीला महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत सबसीडी म्हणून किती कोटी रूपये रक्कम अदा केली?

20. 

अंगणवाडी योजनेच्या प्रशासकीय संरचनेत खालीलपैकी कोणती पदे समाविष्ट आहेत ? (a) अंगणवाडी कार्यकर्ती
(b) पर्यवेक्षीका

(c) बाल विकास प्रकल्प अधिकारी

(d) बाल आरोग्य अधिकारी

वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत ?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018