भारत सरकारने 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरण कोणत्या हेतूने स्विकारले ?
अ. तोटयात आलेल्या उद्योगांचे खाजगीक्षेत्राकडे हस्तांतरण.
ब. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस चालना देणे.
क. सार्वजनिक क्षेत्राची गुणवत्ता वाढविणे.
ड. परवाना पद्धतीवर नियंत्रण ठेवणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
जागतिकीकरणाच्या काळात भारताची रोजगाराची स्थिती कशामुळे वाईट झाली आहे ?
अ. रोजगार वृद्धीदरात घट होत आहे.
ब. कृषी क्षेत्रातील नकारात्मक रोजगार वृद्धीदर.
क. सार्वजनिक क्षेत्रातील नकारात्मक रोजगार वृद्धीदर.
ड. सहकार क्षेत्रातील रोजगार वृद्धीदर कमी होणे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
1998 चा विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा या हेतूने करण्यात आला
अ. फेरा (FERA) कायद्यात बदल करणे.
ब. परकीय विनिमय व्यवस्थापन आणि विनिमय सुरक्षितता यावर भर देणे.
क. भारतीय अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे.
ड. भारतातील परकीय विनिमय बाजाराची देखभाल करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
भारत सरकारने ग्रामीण विद्युतीकरणाचे धोरण 2006 मध्ये या उद्देशाने जाहीर केले
अ. सर्व कुटुंबधारकांना विजेचा पुरवठा करणे.
ब. दर्जेदार आणि विश्वसनीय वीजपुरवठा किफायतशीर दराने उपलब्ध करणे.
क. वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे.
ड. विजेचा किमान वापर करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
सरकारने सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण, या हेतूने स्वीकारले आहे
अ. सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत सेवासुविधा उभारणी साठी खाजगीभांडवल आकर्षित करणे.
ब. सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहक उपयुक्त सेवाची कार्यक्षमता सुधारणे.
क. सार्वजनिक क्षेत्राद्वारे अधिक नफा मिळविणे.
ड. सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधा साठी सहकार सहभागास उद्युक्त करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
No More Results. Thank You !..
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.