महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१४

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

‘ताईने मुलाला निजविले' या वाक्यातील 'निजविले' या क्रियापदास काय म्हणतात? 

(अ) प्रायोजक क्रियापद

(ब) शक्यार्थ क्रियापद

(क) गौण क्रियापद 

(ड) सहाय्यक क्रियापद

पर्यायी उत्तरे :

2.

'चंद्र' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

3.

साधित शब्द कशाला म्हणतात ?

4.

'मन्वंतर' या जोडशब्दाचे पोटशब्द ओळखा.

5.

'दिग्विजय' या शब्दातील संधी प्रकार कोणता ?

6.

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही व तृतीय पुरुषी एकवचनी असते, तेव्हा त्याला कोणता प्रयोग म्हणतात ?

(अ) भावे प्रयोग

(ब) कर्मणी प्रयोग

(क) कर्तरी प्रयोग

(ड) मिश्र प्रयोग 

पर्यायी उत्तरे :

7.

'गाड्यावर नाव आणि नावेवर गाडा' या म्हणीचा अर्थ खाली दिलेल्या अर्थातून शोधा.

(अ) गरिबाचा श्रीमंत होतो आणि श्रीमंताचा गरीब होतो.

(ब) देवाचा दानव होतो आणि दानवाचा देव होतो.

(क) दोन वस्तुपैकी एकीची जी स्थिती असते तीच दुसरीलाही प्राप्त होते.

(ड) दोन वस्तुचे स्वरूप एक असले तरी स्थिती एकच असते. 

पर्यायी उत्तरे :

8.

खालीलपैकी कोणता गट अव्ययीभाव समासाचा आहे?

(अ) वडिलोपार्जित, शास्त्रपंडित, ईश्वरनिर्मित

(ब) मृगनयना, सिंहकटि, हरिणाक्षी

(क) शेजारी-पाजारी, भिकारी टाकारी, ओळख पाळख

(ड) यथाशक्ती, आमरण, प्रतिदिन

पर्यायी उत्तरे :

9.

हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार इ. भावना व्यक्त करण्यासाठी जे अविकारी शब्द वापरतात, त्यांना कोणती अव्यये म्हणतात?

10.

'अगाई' हा शब्द केवलप्रयोगी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 11 ते 15 ची उत्तरे लिहा :

घरे 
               उंच-उंच कमानींचा वेध घेण्याची क्षमता तुमच्या मनामध्ये आहे याचं तुम्हाला कधीतरी स्मरण झाल आहे का? लाकडांमधून सुंदर शिल्प घडवता येतं, तसच खडकामधून शिल्प घडवता येतं ते तुमच्या अंत:करणाला पवित्र पर्वत शिखराचा मार्ग दाखवू शकतं अशा सौंदर्याची, अनुभूतीची प्रचिती तुम्ही कधी घेतली आहे काय? तुमच ज्या घरात वास्तव्ये आहे त्या घरामध्ये मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं सापडतील का?
               तुमच्या घरामध्ये फक्त शारीरिक सुखाचा अनुभव येतो, या शारीरिक सुखांमुळ वासना चाळवल्या जातात, त्या प्रथम तुमच्या पाहुणचारासाठी घरात प्रवेश करतात पण हळूहळू त्या तुमच्यावर सत्ता गाजवतात आणि तुम्ही तर त्या वासनांच्या आहारी जाऊन त्यांचे गुलाम बनता. हे खरं ना?
या वासना अखेरीस पशूना चाबकाच्या फटकाच्यानं वठणीवर आणणाच्या रिंगमास्टराप्रमाणं तुम्हाला फटकारून नमवतात आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षांचे त्यांच्या हातातील बाहुलं बनवतात. त्या रिंगमास्टरचे हात कदाचित रेशमाप्रमाणे मृदु भासतील पण त्यांच हृदय मात्र लोहाप्रमाणं कठोर आणि निर्दयी असत. तुमच्या बिछान्या शेजारी उभा राहून त्या वासना तुम्हाला झोपवतात आणि तुमच्या शरीराच्या प्रतिष्ठेबद्दल तुम्हाला वाटणा-या अभिमानाची त्या यथेच्छ टिंगल करतात,
                 तुमच्या इंद्रियांवर तुमचा विश्वास असतो. पण त्या वासना त्यांची टर उडवतात. भुरभुरणा-या म्हातारीच्या केसांची गुंडाळी करावी त्याप्रमाणं त्या इंद्रियांना वासना नाजुक भांड्यात झाकून ठेवतात. अशी वासनांच्या सुखामागं तुम्ही धावता तेव्हा तुमच्या आत्म्याचं पावित्र्य आणि शक्ती या नष्ट होतात. तुमच्या उभ्या वासनामय जीवनाकडे छद्मीपणानं हसत त्या तुमच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रेमध्ये सहभागी होतात.
               अखेरीस जिब्रान या समुदायाला उद्देशून बोलताना त्यांचे भवितव्य वेगळं असल्याचं आश्वासन देतो. प्रेमान जिब्रान त्यांचं ‘तुम्ही मुलं' असा उल्लेख करतो. तुम्ही शांत असतानाही तुमचं मन अस्वस्थ असत. त्यामुळे तुम्ही वासनांच्या मोहजालामध्ये कधीही फसणार नाही किंवा वासना तुमच्या मनावर कधीही वर्चस्व गाजवू शकणार नाहीत. तुमचं घर हे किना-यावर नांगर टाकून थांबणाच्या बोटीच्या नांगराप्रमाणे कधीही असणार नाही. तुमचं घर जहाजाच्या शिडाप्रमाणं असेल.
                 तुमच घर जखमेवरील चमकणा-या मलमपट्टीप्रमाण असणार नाही. ते डोळ्यांचे रक्षण करणाया पापणीप्रमाणे असेल. घरातील दारामधून प्रवेश करताना तुम्ही तुमचे पंख मिटून घ्यायचे नाहीत. छताला तुमचं डोकं थडकेल म्हणून तुम्ही कधीही मान तुकवणार नाही. श्वासोच्छ्वास करताना तुम्ही त्यामुळे भिंतींना तडे पडतील आणि त्या कोसळतील अशा भीतीनं तुम्ही कधीही श्वास घेणार नाही. मृत माणसांनी जिवंत माणसांना राहण्यासाठी बांधलेल्या घरांमध्ये तुम्ही राहायचे नाही. तुमचं घर कितीही भव्य, अलिशान असलं तरी त्या घरात गुप्तता पाळली जाणार नाही किंवा तुमच्या तीव्र इच्छा आकांक्षांना ते आसरा देणार नाही.

11.

सौंदर्याची प्रचिती केव्हा येऊ शकते ?

(अ) लाकूड आणि खडक यांची तोडफोड करता येत नाही तेव्हा.

(ब) लाकूड आणि खडक यातून शिल्प घडवता येत नाही तेव्हा.

(क) लाकूड आणि खडक यातून घडलेले शिल्प अंत: करणाला पवित्र पर्वत शिखराचा मार्ग दाखवते तेव्हा.

पर्यायी उत्तरे :

12.

सदर परिच्छेदातील 'त्यांचे भवितव्य वेगळं' असण्याचे आश्वासन कोणतं ?

(अ) तुमचं घर जहाजाच्या शिडाप्रमाणे असेल.

(ब) वासना तुमच्यावर वर्चस्व गाजवतील.

(क) तुम्ही स्वस्थ असाल.

(ड) वासनांच्या मोहजालात फसाल.

पर्यायी उत्तरे :

13.

वासनेला लेखकाने कशाची उपमा दिलेली आहे ?

(अ) रिंगमास्टर आणि पशू 

(ब) चाबूक आणि बाहुलं 

(क) रिंगमास्टर आणि चाबूक 

(ड) रिंगमास्टर 

पर्यायी उत्तरे :

14.

खालील जिब्रानचे 'घराविषयीचे विचार कोणाला उद्देशून आहेत ? 

(अ) वासनाग्रस्त लोकांना

(ब) विद्वान व लहान मुलांना 

(क) समुदायाला

(ड) जखमी व आजारी असलेल्यांना

पर्यायी उत्तरे :

15.

आत्म्याचं पावित्र्य आणि शक्ति नष्ट करणारी गोष्ट कोणती ?

(अ) वासनांना नाजुक भांड्यात झाकून ठेवल्याने 

(ब) इंद्रियांना नाजुक भांड्यात झाकून ठेवल्याने 

(क) वासनांच्या सुखात आनंद न मानल्याने 

(ड) इंद्रियांना वासनांनी नाजुक भांड्यात झाकून ठेवल्याने. 

पर्यायी उत्तरे :

16.

The news tickled him to death.

The underlined phrase means :

17.

Locate the grammatically correct sentence/s : 

(I) The uniquest feature of this vehicle is its gearbox.  

(II) The most unique feature of this vehicle is its gearbox.

(III) The unique feature of this vehicle is its gearbox.

Answer Options :

18.

The doctor gave him medicine.

In the passive form, the sentence will be :

(I) He has been given medicine by the doctor.

(II) Medicine was given to him.

(III) He was given medicine.

(IV) Medicine has been given to him by the doctor.

Answer Options :

19.

Which of the following sentences are grammatically correct ?

(I) The doctor meets his patients between 6.00 p.m. to 9.00 p.m.

(II) Unless you don't work hard, you will not succeed.

(III) The teacher advised me to work harder.

(IV) He has been running his business for 40 years now. 

Answer Options : 

20.

He is one of the tallest boys in class.

The above sentence has been re-written below, changing the degree of the underlined adjective. Choose the grammatically correct option: 

(I) He is taller than all other boys in class.

(II) He is taller than any other boy in class.

(III) He is taller than most other boys in class.

(IV) No one is as tall in class as he is. 

Answer Options :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.