PSI Main 2014 - Paper 1

PSI Main 2014 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा.

42.

खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा : 

'तो इतका मोठ्याने बोलला, की त्याचा आवाज बसला

43.

शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक, हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

44.

 'घोडा' या शब्दाचे योग्य सामान्यरूपं कोणते ?

45.

खालील साधित शब्दाची प्रकार ओळखा :

‘प्रतिक्रिया'

46.

 'त्याची गोष्ट लिहून झाली' या विधानातील प्रयोग ओळखा :

47.

'हत्ती' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा :

48.

'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला?

49.

(i) पतंग झाडावर अडकला होता.

(ii) पतंग वर जात होता. 

(a) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.

(b) विधान नं. (i) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे. 

(c) विधान नं. (i) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे. 

(d) विधान नं. (ii) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे. 

पर्यायी उत्तरे : 

50.

पुढील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा - 

‘धडपड़'

51.

'त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला' या वाक्यातील उद्देश्य ओळखा : 

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 51 ते 55 ची उत्तरे द्या. 

              स्वररचना बांधणे हे जर काल्पनिक संर्जनाचे उदाहरण असेल, तर स्वररचना ही कल्पनाजन्य चीज ठरेल आणि हीच गोष्ट एखादी कविता, एखादे चित्र किंवा एखादी अन्य कलाकृती यांनाही लागू आहे. पण हा विरोधाभासच वाटतो. स्वररचना ही काल्पनिक चीज नसून खरीखुरी गोष्ट असते, तो एक खराखुरा नादसमूह असतो चित्र ख्याखु-या रंगांनी रंगविलेले आणि क्याख्या फलकावर रेखाटलेले असते, आणि याचप्रमाणे तत्सम इतर गोष्टी असतात, असे मानण्याकडे साहजिकच आपला कल होतो. आणि वाचक जर का थोडा धीर धरतील, तर येथे कसलाही विरोधाभास नाही, हे दाखवून देण्याची आशा मला आहे. कलाकृतीसंबंधी वास्तविक आपण जे काही म्हणत असतो, तेच या उभय विधानांतून व्यक्त होत असते आणि त्यांचा संबंध भिन्न वस्तूंशी असल्यामुळे ती परस्परविरोधी मुळीच ठरत नाहीत, हेही दाखवून देण्याचा माझा मानस आहे.

              आपण जेव्हा कलाकृतीसंबंधी (स्वररचना, चित्र इत्यादी) बोलत असतो, तेव्हा ती कला म्हणजे एक खास प्रकारची कारागिरी असा आपला अर्थ असतो. श्रोत्यांच्या मनात विशिष्ट भावनिक परिणाम उत्पन्न करण्यासाठी ती कारागिरी चेतक म्हणून सहेतुकपणे योजिलेली असते. 'कलाकृती' या संज्ञेने जिला आपण खरीखुरी वस्तू म्हणू, अशी गोष्टच निर्दिष्ट करण्याचा आपला नक्की हेतू असतो. कलावंत हा एखाद्या जादुगारासारखा किंवा करमणूक पुरविणत्या ठेकेदारासारखा अनिवार्यपणे कारागीर असतोच. तो कोणत्या तरी द्रव्यातून काही एका पूर्वयोजनेनुसार वस्तूंचीच निर्मिती करणारा एक कारागीर असतो. एखाद्या अभियंत्याच्या कृतींप्रमाणे त्याच्याही कृती खयाखु-या असतात आणि दोघांच्याही कृतींमागील कारणही एकच असते.
                परंतु खया कलावंताबाबत हेच लागू होते, असा निष्कर्ष यातून ओघाने मुळीच निघणार नाही. श्रोत्यांच्या मनावर भावनिक परिणाम घडवून आणणे, हेच त्यांचे कार्य नसते. उदाहरणार्थ, फक्त स्वररचनेची घडण करणे एवढेच त्याचे कार्य असते. सदर स्वररचनेचे अस्तित्व जेव्हा त्याच्या डोक्यात असते, तेव्हा अगोदरच म्हणजे काल्पनिक स्वरूपात ती स्वररचना परिपूर्ण आणि संपूर्ण सिद्ध झालेलीच असते. नंतर श्रोत्यांसमोर सादर करण्याची व्यवस्था तो कलावंत करील. आता एक नादसमूह हा एक खरीखुरी स्वररचना म्हणून अस्तित्वात आलेला असतो. पण या दोहोंपैकी प्रत्यक्ष कलाकृती कोणती? त्यांच्यापैकी संगीत नेमके कोणते? आपण जे आधीच सांगितले आहे, त्यात याचे उत्तर ध्वनित आहेच : कलाकृतिरूप संगीत म्हणजे तो नादसमूह नव्हे; तर रचनाकाराच्या डोक्यातील स्वररचना हेच खरे संगीत होय; सादरकर्त्यांकडून निर्माण होणारा आणि श्रोत्यांकडून ऐकला जाणारा ध्वनिसमूह मुळी संगीत नव्हेच. असे ध्वनिसमूह फक्त साधने होत. ते अक्कलहुशारीने (एरव्ही नव्हे) ऐकल्यासच रचनाकाराच्या डोक्यात असलेल्या काल्पनिक ध्वनिसमूहाची पुनर्रचना श्रोत्यांना करता येणे शक्य असते.

52.

‘खरे संगीत' कोणते ?

53.

रचनाकाराच्या डोक्यात असलेल्या काल्पनिक ध्वनिसमूहाची पुनर्रचना श्रोत्यांना करता येणे कसे शक्य असते?

54.

लेखकाच्या मते 'स्वररचना' म्हणजे काय?

55.

लेखकाच्या मते कारागीर आणि अभियंता यांच्या कृती कशा असतात ?

56.

या उता-याला योग्य शीर्षक द्या.

पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा.
           पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:च एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाने परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते.
         अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भांडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला.
           परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात, हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात.
            शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही.

          आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते.

57.

पुढीलपैकी कोणते कार्य कलावादी लोक करतात ?

58.

खालील विधाने वाचा व योग्य तो पर्याय निवडा. 

(a) परिवर्तनवादी लोक माणुसकीची वाट निर्माण करतात.   

(b) परिवर्तनवादी लोकांना स्वत:च परिवर्तन होऊन परिवर्तन जन्माला घालावे लागते.   

पर्यायी उत्तरे :

59.

खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. 

(a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशूवत असतात. . 

(b) पशूवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत.

पर्यायी उत्तरे : 

60.

परिवर्तनाने कोणाला डोळसपणा दिला?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2014 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.