कोरोना विषाणूमुळे WHO कडून आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणीची घोषणा
चीनपासून इतर १८ देशांमध्ये आजाराचा उद्भव
संघटनेकडून आपत्कालीन परिस्थिती जाहीर
माणसांकडून माणसांकडे संपर्कातून रोग प्रसार
जगभरात ७७०० हून अधिक पुष्टी झालेली आणि सुमारे १२२०० संशयित प्रकरणे
रोग प्रसाराकडून WHO च्या PHEIC चे निकष पूर्ण
पुष्टीच्या कारणास्तव आणीबाणी जाहीर
PHEIC म्हणजेच Public Health Emergencies of International Concern
आंतरराष्ट्रीय चिंताजनक बाबींसंबंधी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी
आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आरोग्य धोका विस्तार
आंतरराष्ट्रीय कृती करणे आवश्यक असल्याची क्षमता
आत्तापर्यंत ५ आजार जाहीर
२००९: इन्फ्लूएन्झा (एच १ एन १)
२०१४: पोलिओ पुनरुत्थान
२०१४: इबोला रोग (पश्चिम आफ्रिका)
२०१६: झिका विषाणू प्रादुर्भाव
२०१९: इबोला उद्रेक (काँगो डेमोक्रॅटिक रिपब्लिक)
आवश्यक कार्यवाहीबद्दल सल्ला देण्यासाठी आपत्कालीन समिती गठित
भारतात केरळमध्ये कोरोना विषाणूची पहिली नोंद
२ उड्डाणांद्वारे भारतीय नागरिकांना देशात परत आणण्यासाठी चीनच्या परवानगीकरिता विनंती
WHO म्हणजेच World Health Organization
जागतिक आरोग्य संघटना
७ एप्रिल १९४८ (स्थापना दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा)
जिनीव्हा, स्वित्झर्लंड
टेड्रोस अधानोम (Tedros Adhanom)
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.