WHO कडून कोरोना विषाणूला जागतिक स्तरावर विस्तारलेला (Pandemic) म्हणून घोषित
Updated On : Mar 13, 2020 16:50 PM | Category : आंतरराष्ट्रीय

WHO कडून कोरोना विषाणूला जागतिक स्तरावर विस्तारलेला (Pandemic) म्हणून घोषित
-
कोरोना विषाणूला जागतिक स्तरावर विस्तारलेला (Pandemic) म्हणून WHO कडून घोषित करण्यात आले
वेचक मुद्दे
-
११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना विषाणू जागतिक स्तरावर विस्तारलेला (Pandemic) म्हणून घोषित करण्यात आले
-
जगभरात या विषाणूचा खूप वेगाने प्रसार होत आहे
-
सध्याच्या घडीला कोविड -१९ विषाणूची लागण सुमारे १,२६,४०० हून अधिक लोकांना झाली आहे
-
विषाणू प्रादुर्भावामुळे आजपर्यंत सुमारे ४७०० लोक दगावले आहेत
'जागतिक स्तरावर विस्तारलेला (Pandemic)'बाबत थोडक्यात
व्याख्या जाहीर
-
संयुक्त राष्ट्रे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (United States Centre for Disease Control and Prevention) व्याख्या जाहीर करण्यात आली आहे
ठळक बाबी
-
खूप साऱ्या देशांमध्ये किंवा खंडांमध्ये असलेला असा प्रसार होणारा विषाणू या प्रकारात मोडतो
साथीचे रोग: इतिहास
-
साथीच्या आजारांबाबत संपूर्ण इतिहासात ब्लॅक डेथ (Black Death) हा सर्वात प्राणघातक गणला जातो
-
१४ व्या शतकात त्यामुळे साधारणतः ७५ ते २०० दशलक्षांहून अधिक लोक दगावले गेले होते
-
अलीकडे उद्भवलेल्या साथीच्या रोगांमध्ये २००९ मधील फ्लू (H१N१) चा समावेश होतो
WHO बद्दल थोडक्यात
विस्तारित रूप
-
WHO म्हणजेच World Health Organization
-
जागतिक आरोग्य संघटना
स्थापना
-
७ एप्रिल १९४८ (स्थापना दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा)
मुख्यालय
-
जिनीव्हा, स्वित्झर्लंड
मुख्य अधिकारी
-
टेड्रोस अधानोम (Tedros Adhanom)
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |