अमेरिकेकडून WTO चे अपील न्यायालय बंद

Updated On : Dec 10, 2019 17:29 PM | Category : आर्थिकअमेरिकेकडून WTO चे अपील न्यायालय बंद
अमेरिकेकडून WTO चे अपील न्यायालय बंद

अमेरिकेकडून WTO चे अपील न्यायालय बंद

 • ९ डिसेंबर २०१९ रोजी जागतिक व्यापार संघटनेचे अपील न्यायालय अमेरिकेकडून बंद

WTO अपील न्यायालय

कार्य

 • व्यापार विवाद निकाल संस्थेच्या रूपात सदस्यांसाठी काम

सद्यस्थिती

 • ७ सदस्य असलेली संस्था २०१८ मध्ये ३ सदस्यीय

 • २०१९ मध्ये आता पूर्णतः बंद

 • युनायटेड स्टेट्स द्वारे पूर्णपणे अवरोधित

 • WTO च्या अपील संस्थेविना, वादाचा निपटारा पूर्वीच्या प्रशुल्क आणि व्यापार यासंबधी सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade - GATT) स्थितीत

वाद विवाद निराकरण

 • नोंदवलेल्या ५९२ प्रकरणांपैकी १२० निकालात

 • बरेच वाद WTO च्या बाहेरही सोडवले

 • अन्य देशांतील तज्ज्ञांचा विश्वास असा की तंटे मिटविण्याची WTO प्रणाली निराकरण करण्यास वेळखाऊ

राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली पदे

 • अपीलीय संस्था न्यायाधीश आणि त्यांची पदे यापूर्वी अमेरिकेच्या इतर राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली

 • जॉर्ज बुश, बराक ओबामा आणि ट्रम्प यांचा समावेश

गॅट (General Agreement on Tariffs and Trade - GATT) बद्दल थोडक्यात

 • अनेक देशांमध्ये अस्तित्वात एक कायदेशीर करार

 • १९४७ मध्ये २३ राष्ट्रांची स्वाक्षरी

 • १९९३ मध्ये GATT आणि युरोपियन समुदायाचे ७६ सदस्य एकत्र

 • जागतिक व्यापार संघटना (World Trade Organization - WTO) स्थापना प्रयोजनार्थ एकत्र

WTO विषयी थोडक्यात

स्थापना 

 • १ जानेवारी १९९५

सध्याचे Director General 

 • रॉबर्टो अझेवेदो (Roberto Azevedo)

मुख्यालय 

 •  जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

उद्देश

 • आयात कर कपात

 • व्यापार निर्बंध हटविणे

सदस्य 

 • १६४ सदस्य राष्ट्रे

संस्थेची रचना

विविध क्षेत्रांसाठीच्या परिषदा 

 • वस्तू व्यापार (Trade in Goods)

 • सेवा व्यापार (Trade in Services)

 • व्यापार वाटाघाटी समिती (Trade Negotiations Committee)

 • बौद्धिक संपदा हक्क व्यापार (Trade-Related Aspects of Intellectual Property Rights)

संस्थेची तत्वे

 • बंधनकारक आणि अंमलात आणण्यायोग्य वचनबद्धता

 • पारदर्शकता

 • सुरक्षा मूल्ये

 • परस्पर सहकार्य

 • भेदभावाचा अभाव

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)