सद्यःस्थितीत दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरण अध्यक्षांच्या कार्यकालात ३ महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे
दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरणाचे (Telecom Disputes Settlement and Appellate Tribunal - TDSAT) अध्यक्ष म्हणून न्या. शिव किर्ती सिंग यांचा कार्यकाल वाढविण्यात आला आहे
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्यासह न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने कार्यकाल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत केंद्र सरकारला दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत
२००० साली दूरसंचार विवाद निराकरण व अपील न्यायाधिकरणाची स्थापना झाली
नवी दिल्ली येथे सदर न्यायाधिकरण स्थित आहे
न्यायमूर्ती शिव किर्ती सिंग हे न्यायाधिकरणाचे सध्याचे अध्यक्ष आहेत
दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम,१९९७ द्वारे न्यायाधिकरणाला अधिकृतता प्राप्त झाली आहे
सदर कायद्यात सन २००० मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती
न्यायाधिकरणातील न्यायाधीशांचा कार्यकाल हा ३ वर्षे इतका असतो
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.