'विशेष हिवाळी ग्रेड इंधन' लडाख प्रदेशासाठी सुरू

Date : Nov 18, 2019 10:45 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
'विशेष हिवाळी ग्रेड इंधन' लडाख प्रदेशासाठी सुरू
'विशेष हिवाळी ग्रेड इंधन' लडाख प्रदेशासाठी सुरू

'विशेष हिवाळी ग्रेड इंधन' लडाख प्रदेशासाठी सुरू

 • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून (Indian Oil Corporation Limited - IOCL) लडाखच्या अत्त्युच्च प्रदेशांसाठी विशेष हिवाळी ग्रेड डिझेल निर्मिती सुरुवात

 • -३३ अंश सेल्सिअस तापमानात देखील द्रव अवस्थेत 

 • सतत आणि वर्षभर बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये प्रवेश प्रदान करण्यात मदत

उदघाटक 

 • श्री. अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री)

डिझेल इंधनाबाबत वेचक मुद्दे

 • BS-VI श्रेणीचे बीआयएस (Bureau of Indian Standards - BIS) तपशील पूर्ण करते

 • उत्पादित आणि प्रमाणित पानिपत रिफायनरी येथून

 • जालंदर (पंजाब) मधून डिझेलचा पुरवठा

इंधन उपलब्धतेचे महत्व

 • प्रदेशात अखंड रस्ते जोडणी राखण्यात मदत

 • काझा, कारगिल, लडाख आणि केलॉंग भागात फायदेशीर

 • वाहनचालकांना भेडसावणाऱ्या, हिवाळ्यातील तापमान -३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास डिझेल अतिशीत होण्याच्या समस्येच्या निराकरणात मदत

 • सरकारच्या ५०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या शिक्षण, पर्यटन, वीज आणि सौर क्षेत्रातील योजनांना चालना

हिवाळी-ग्रेड डिझेल विषयी थोडक्यात

 • थंड हवामानात डिझेल गोठण्याची शक्यता

 • त्याच्या क्लाउड पॉईंटच्या खाली, डिझेलचे मेणाच्या कण निर्मितीस सुरवात

 • ज्या तपमानापेक्षा खाली इंधनाचे कण एकत्र येऊन घनरूप मेण तयार करतात त्या संदर्भात क्लाउड पॉइंट(Cloud Point) ही संकल्पना

 • डिझेलची निर्मिती लो-डाऊन पॉईंटसह

 • हिवाळ्याच्या परिस्थितीतही त्याचे द्रवण क्षमता अबाधित

 • स्थानिक अर्थव्यवस्था बळकटीकरण आणि प्रदेशातील पर्यटन सुलभीकरण हेतू अपेक्षित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.