२७ डिसेंबर २०१९ रोजी लोसार महोत्सव साजरा करून लडाखी नववर्ष साजरे
केंद्रशासित प्रदेश लडाख येथे लडाखी किंवा तिबेटी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोसार महोत्सव साजरा
२०१८ पर्यंत होणाऱ्या मेळाव्यामध्ये नवीन वर्षासाठीचा ठराव म्हणून 'लडाखसाठी यूटी स्टेटस (UT Status for Ladakh)' चा समावेश असायचा
यावर्षी नव्याने निर्माण झालेल्या केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लोसर उत्सवाचा आनंदोत्सव
लोसार उत्सव मूळ १५ व्या शतकातील
देशातील सर्व हिमालयी राज्यांमध्ये पण वेगवेगळ्या काळात साजरा
लडाख प्रदेशातील विविध भागातील लोकांकडून साजरा
तिबेटी दिनदर्शिकेच्या अकराव्या महिन्याच्या १ तारखेला महोत्सव साजरा
दरवर्षी ग्रेगोरियन कॅलेंडरमधील तारखेला ही तारीख जुळते
लडाखच्या वेगवेगळ्या भागात उत्सव ३ ते ९ दिवस चालू
लडाखचा सर्वात महत्वाचा सामाजिक-धार्मिक कार्यक्रम
हिवाळ्याच्या हंगामात पर्यटकांच्या दृष्टीने देखील मुख्य आकर्षण
अनेक धार्मिक विधी आणि पारंपारिक कार्यक्रमांची मेजवानी
प्रतीकात्मक जेवण बनवणे
देव आणि देवीला अर्पण करणे
समृद्ध नवीन वर्षासाठी आणि पिकांच्या भरभराटीसाठी घरे शुभेच्छा चिन्हांनी सुशोभित
शुभ शकुनासाठी स्वयंपाक घरातील कपाटांमध्ये सूर्य, चंद्र, शेळ्या, मेंढी, मोठे बोकड आणि काळवीटांचे कणकेचे नमुने ठेवणे
नव वर्षाच्या सुरूवातीस केंद्रशासित प्रदेशातील महत्वाच्या धार्मिक ठिकाणी प्रार्थना ध्वज फडकावणे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.