LANCET अहवाल, २०१९: आरोग्य आणि हवामान बदल

Date : Nov 15, 2019 10:03 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
LANCET अहवाल, २०१९: आरोग्य आणि हवामान बदल
LANCET अहवाल, २०१९: आरोग्य आणि हवामान बदल

LANCET अहवाल: २०१९

  • LANCET जर्नलकडून १३ नोव्हेंबर २०१९ रोजी 'आरोग्य आणि हवामान बदल:२०१९' वर अहवाल प्रकाशित

  • आरोग्य आणि हवामान बदलांचा आढावा घेण्यासाठी  LANCET Countdown हे एक बृहद वार्षिक विश्लेषण

  • ४१ निर्देशांकांच्या आधारे प्रगतीचा आढावा

  • WHO (World Health Organization) आणि जागतिक बँके World Bank सोबतच जगातील प्रमुख नामांकित संस्थांमधील अव्वल दर्जाच्या १२० तज्ञांच्या सहकार्याने कार्यरत

LANCET अहवाल: भारत वेचक मुद्दे

  • अतिसार (Diarrheal Infection) लागण मुलांच्या मृत्यूचे मुख्य कारण

  • देशात १९६० च्या दशकापासून प्रभावी मका आणि भात उत्पादनाच्या सरासरीत २% ने घट

  • हिवाळी उत्पादीत प्रभावी गहू आणि सोयाबीन यांच्या सरासरी उत्पादन क्षमतेत १% ने घट

  • सागर पातळी वाढीमुळे कॉलरा (Cholera), गॅस्ट्रोएन्टिटायटीस (Gastroentitis) इ. च्या संसर्गांमध्ये वाढीची शक्यता

  • हवामान अनुकूलतेमुळे कॉलरा रोगास कारणीभूत असलेल्या Vibro जीवाणूमुळे आजारात १९८० सालच्या तुलनेत ३% वाढीची शक्यता

  • पाच वर्षांखालील एकूण मृत्यूंपैकी दोन तृतीयांश मृत्यू निव्वळ कुपोषणामुळे 

LANCET अहवाल: जग वेचक मुद्दे

मच्छीमार आणि जलचरांना हवामान बदलाचा धोका खालील मुद्द्यांआधारे स्पष्ट 

  • सागर आम्लीकरण (Ocean Acidification)

  • हवामानातील तीव्र आणि वारंवार घटना (Intense and frequent extreme weather events)

  • सागर-पातळी वाढ (Rise in sea-level )

  • डेंग्यूमुळे मृत्यूदरात जागतिक स्तरावर वाढ (Global increase in Dengue mortality)

  • सागर पृष्ठ तापमानात वाढ (Temperature rise in sea surface )

WBGT (Wet Bulb Globe Temperature) मोजमाप निरीक्षणे 

  • WBGT मोजमाप: उष्णतेच्या तणावाचे एक मापक जे आर्द्रता, ढग आच्छादन, वाऱ्याचा वेग, तापमान आणि सूर्याचा कोन विचारात घेते

  • WBGT अहवाल इशारा: अत्यंतिक  उष्णतेमुळे २२ अब्ज अतिरिक्त कामाचे तास गमावले जाण्याची शक्यता

  • तापमानातील वाढ उत्पादकता ०.८ ते ५% पर्यंत कमी करेल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.