पटना उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजय करोल यांचा शपथविधी

Date : Nov 12, 2019 10:38 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
पटना उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजय करोल यांचा शपथविधी
पटना उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजय करोल यांचा शपथविधी

पटना उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजय करोल

  • पटना उच्च न्यायालयाच्या ४३ व्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजय करोल यांचा शपथविधी

  • पटनातील राजभवनात बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांच्या उपस्थितीत पद आणि गोपनीयतेची शपथ

  • मावळते न्या. अमरेश्वर प्रताप साही यांच्यानंतर कार्यभाराची जबाबदारी

  • न्या. अमरेश्वर प्रताप साही यांची मद्रास उच्च न्यायालय (चेन्नई) मुख्य न्यायाधीश पदी बदली

  • शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, राज्यमंत्री तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती

न्यायमूर्ती संजय करोल यांचा अल्प परिचय 

  • जन्म: हिमाचल प्रदेश

  • ८ मार्च २००७ रोजी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक

  • हिमाचल प्रदेशचे महाधिवक्ता म्हणून ५ वर्षे कार्यभार

  • त्रिपुरा उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदावर ९ नोव्हेंबर २०१८ रोजी नियुक्त होण्यापूर्वी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वरिष्ठ समितीमध्ये कामाचा अनुभव

पार्श्वभूमी

  • १७ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून केंद्र सरकारला जस्टिस करोल यांच्या पटना उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी बदलीविषयी शिफारस

  • पूर्ववर्ती मुख्य न्यायाधीश अमरेश्वर प्रताप साही यांची मद्रास उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी बदली करण्याची शिफारस

  • ३० ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडून कॉलेजियमच्या शिफारशीनुसार न्यायाधीशांच्या बदलीसंदर्भात अधिसूचना जारी

  • १३ नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित पदाचा कार्यभार स्वीकारतील अशी अटदर्शक अपेक्षा

उच्च न्यायालये

संविधानिक तरतूद

  • भारतीय राज्यघटनेच्या कलम २१४ नुसार, भारतातील प्रत्येक घटक राज्याला एक उच्च न्यायालय किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय

  • सध्या देशात २५ उच्च न्यायालये

महाराष्ट्र राज्य स्थिती 

१ उच्च न्यायालय (मुंबई) आणि ३ खंडपीठे (नागपूर, औरंगाबाद, पणजी)

उच्च न्यायालय रचना 

  • एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश

  • राज्यातील परिस्थितीनुसार संख्या लवचिक

न्यायाधीश नेमणूक

  • मुख्य न्यायाधीश नेमणूक अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना 

  • मुख्य न्यायाधीश नेमणूकीवेळी राष्ट्रपतींकडून सर न्यायाधीश आणि घटकराज्याच्या राज्यपालांचा सल्ला व मार्गदर्शन 

  • इतर न्यायाधीश नेमणूकीवेळी भारताच्या सर न्यायाधीशांकडून त्या राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला व मार्गदर्शन

न्यायाधीश पात्रता

  • भारताचा नागरिक

  • कमीत कमी दहा वर्षे कोणत्याही न्यायालयात न्यायाधीश पदाचा अनुभव

  • एक किंवा जास्त न्यायालयात कमीत कमी दहा वर्षापर्यंत वकिलीचा अनुभव

कार्यकाल

  • वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर

  • तत्पूर्वी स्वेच्छेने राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्ती शक्य

शपथविधी

  • संबंधित राज्याच्या राज्यपालांकडून

उच्च न्यायालय अधिकारक्षेत्र

  • प्रारंभिक

  • प्रादेशिक

  • पुनर्विलोकन

  • न्यायालयांवर देखरेख

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.