झारखंड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती रवी रंजन

Date : Nov 16, 2019 12:07 PM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
झारखंड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती रवी रंजन
झारखंड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती रवी रंजन

झारखंड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश पदी न्यायमूर्ती रवी रंजन

  • न्यायमूर्ती रवी रंजन यांची भारत सरकार कडून झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती

  • कॉलेजियमने केलेल्या शिफारसीनंतर १५ ऑक्टोबर २०१९ रोजी मंजुरी

  • पदभार स्वीकार झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश हरीशचंद्र मिश्रा यांच्यानंतर 

  • मिश्रा यांच्याकडे कार्यवाहक सरन्यायाधीश प्रशांत कुमार यांच्या आकस्मिक निधनानंतर जबाबदारी

न्यायमूर्ती रवी रंजन यांचा अल्प परिचय

  • पाटणा उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून जुलै २००८ मध्ये नियुक्ती

  • कायम स्वरूपी न्यायाधीश म्हणून १६ जानेवारी २०१० रोजी नियुक्ती

  • अल्प काळासाठी पटना उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पदी २०१८ मध्ये काम

  • पाटणा उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमच्या शिफारशीनुसार २०१९ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली

उच्च न्यायालये

संविधानिक तरतूद

  • भारतीय राज्यघटनेच्या कलम २१४ नुसार, भारतातील प्रत्येक घटक राज्याला एक उच्च न्यायालय किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय

  • सध्या देशात २५ उच्च न्यायालये

महाराष्ट्र राज्य स्थिती 

१ उच्च न्यायालय (मुंबई) आणि ३ खंडपीठे (नागपूर, औरंगाबाद, पणजी)

उच्च न्यायालय रचना 

  • एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश

  • राज्यातील परिस्थितीनुसार संख्या लवचिक

न्यायाधीश नेमणूक

  • मुख्य न्यायाधीश नेमणूक अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना 

  • मुख्य न्यायाधीश नेमणूकीवेळी राष्ट्रपतींकडून सर न्यायाधीश आणि घटकराज्याच्या राज्यपालांचा सल्ला व मार्गदर्शन 

  • इतर न्यायाधीश नेमणूकीवेळी भारताच्या सर न्यायाधीशांकडून त्या राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला व मार्गदर्शन

न्यायाधीश पात्रता

  • भारताचा नागरिक

  • कमीत कमी दहा वर्षे कोणत्याही न्यायालयात न्यायाधीश पदाचा अनुभव

  • एक किंवा जास्त न्यायालयात कमीत कमी दहा वर्षापर्यंत वकिलीचा अनुभव

कार्यकाल

  • वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर

  • तत्पूर्वी स्वेच्छेने राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्ती शक्य

शपथविधी

  • संबंधित राज्याच्या राज्यपालांकडून

उच्च न्यायालय अधिकारक्षेत्र

  • प्रारंभिक

  • प्रादेशिक

  • पुनर्विलोकन

  • न्यायालयांवर देखरेख

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.