भारतीय बॉक्सर सरिता देवी: AIBA च्या प्रथम अ‍ॅथलीट्स कमिशनपदी निवड

Date : Nov 19, 2019 10:43 AM | Category : क्रीडा
भारतीय बॉक्सर सरिता देवी: AIBA च्या प्रथम अ‍ॅथलीट्स कमिशनपदी निवड
भारतीय बॉक्सर सरिता देवी: AIBA च्या प्रथम अ‍ॅथलीट्स कमिशनपदी निवड

सरिता देवी: AIBA च्या प्रथम अ‍ॅथलीट्स कमिशनपदी निवड

  • आंतरराष्ट्रीय मुष्ठियुद्धा एल सरिता देवी यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या (International Boxing Association’s - AIBA) पहिल्या अ‍ॅथलीट्स कमिशनमध्ये बिनविरोध निवड

  • कमिशनचे सदस्य म्हणून निवडल्या गेलेल्या ५ खंडातील ६ मुष्ठीयोध्यांपैकी एक

  • या कमिशनमध्ये त्यांच्याकडून एशियन ब्लॉकचे प्रतिनिधित्व

निवडणूक प्रक्रिया आयोजन

  • रशियामध्ये आयोजित AIBA पुरुष आणि महिला बॉक्सिंग चँपियनशिप २०१९ दरम्यान

  • या पदासाठी सरिता देवी आशियाई प्रदेशातून एकमेव उमेदवार

लैश्राम सरिता देवीबद्दल थोडक्यात

जन्म

  • मणिपूर, १ मार्च १९८२

कारकीर्द

  • २००० मध्ये व्यावसायिक बॉक्सर

  • ८ वेळा आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेती - त्यापैकी ५ सुवर्ण

  • भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (Boxing Federation of India - BFI) च्या कार्यकारी समितीत प्रतिनिधी म्हणून काम

  • ज्यांच्याकडून तिला जागतिक संघटना पदासाठी नामांकन

  • २००९: अर्जुन पुरस्काराने गौरव

  • मणिपूर पोलिसात DSP पदावर

AIBA अ‍ॅथलीट्स कमिशन बद्दल

स्थापना 

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (International Olympic Committee - IOC) AIBA साठी शिफारस केलेल्या सुधारणांच्या भागाच्या रूपात

पार्श्वभूमी

  • मे २०१२: IOC कडून AIBA च्या २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग करण्याच्या अधिकाराची हकालपट्टी

  • आर्थिक, नीतिशास्त्र आणि प्रशासकीय गैरव्यवस्था आणि अनियमिततेमुळे केल्याची सबब पुढे

आयोगाचे सदस्य

  • आशिया, आफ्रिका, ओशिनिया, युरोप आणि अमेरिका या पाच प्रादेशिक संघटनांमधील

  • प्रत्येकी एक पुरुष आणि एक महिला बॉक्सर

सदस्यांची कार्यप्रणाली

  • AIBA  आणि बॉक्सर यांच्यात खेळासाठी नियम व प्रकल्प तयार करताना अधिक पारदर्शकता व समन्वय राखण्यासाठी दुवा म्हणून काम करणे

  • अ‍ॅथलीट्स कमिशनमध्ये बॉक्सरचे प्रतिनिधित्व होईल याची खात्री करण्यासाठी त्यांनी IOC बरोबर काम करण्याचीही अपेक्षा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.