३९ वा मेळा आयोजन
ठिकाण: नवी दिल्ली
सुरुवात: १४ नोव्हेंबर २०१९
'व्यवसाय सुलभता' (Ease of Doing Business)
ही थीम भारताच्या जागतिक बँकेच्या (World Bank) ईझ ऑफ डूइंग बिझिनेस (Ease of Doing Business) मधील ६३ व्या क्रमांकापासून प्रेरित
उद्दिष्ट: या मेळ्याच्या निमित्ताने शासकीय, अशासकीय संस्था आणि खासगी क्षेत्रातील उपक्रम यांचे केंद्रीकरण करणे
सहभागी देश: थायलंड, नेपाळ, म्यानमार, व्हिएतनाम, ब्रिटन, तुर्की, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, ट्युनिशिया, इराण, इंडोनेशिया, हाँगकाँग, इजिप्त, चीन, भूतान, आणि बहरीन या देशांचा
राज्य प्राधान्यक्रम: बिहार आणि झारखंड
मोठ्या कंपन्या, एमएसएमई (MSME), बचतगट आणि कारागीरांना उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी समान संधीची उपलब्धता
भारतातील स्टार्टअप्सचा वाढता कल लक्षात घेता त्यांना केंद्रस्थानी ठेऊन अधिकाधिक प्रगत करण्यास संधीची उपलब्धता
अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती मिळण्यास पोषक मंच
सरकारच्या अशा धोरणांमुळे त्याच्या एकंदरीत कारभारामध्ये स्टार्टअपला दिले जाणारे महत्त्व निदर्शनास येते
आयएमएफ (IMF), वर्ल्ड बँक (World Bank), जी - २० (G - २०) यांसारख्या संघटनांकडून २०२०-२१ मध्ये देशातील आर्थिक स्थितीबाबतचे संकेत सकारात्मक असण्याची लक्षणे
कारागीरांना आणि एमएसएमई (MSME) ना मोठ्या कंपन्यांसारखे महत्त्व प्राप्त करून दिल्यास विशेषत: हस्तकला क्षेत्रात निर्यात वाढ आणि आयात कमी या उद्दिष्ट पूर्तीसाठी सरकारच्या योजनांना चालना मिळण्यास मदत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.