रघुराम राजन यांचे नाव IMF प्रमुखांकडून बाह्य सल्लागार गटामध्ये सामील
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund - IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी आपला नवीन बाह्य सल्लागार गट निर्माण केला आहे
सदर गटाचे काम सक्षमपणे पार पडण्यासाठी जगभरातील नामांकित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि इतर मान्यवर नव्या बाह्य सल्लागार गटामध्ये समाविष्ट आहेत
रघुराम राजन ३ वर्षे RBI गव्हर्नर पदावर कार्यरत होते
सध्या ते शिकागोच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत
IMF चे विस्तारित रूप International Monetary Fund असे आहे
आंतरराष्ट्रीय नाणे निधी
२७ डिसेंबर १९४५ रोजी आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना झाली
वॉशिंग्टन डी. सी. येथे IMF चे मुख्यालय स्थित आहे
क्रिस्टलिना जॉर्जिवा या सध्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत
गीता गोपीनाथ या मुख्य अर्थशास्त्रज्ञ पदाची धुरा सांभाळत आहेत
इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय नाणे निधीची अधिकृत भाषा आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.