पहिल्या 'मेड इन इंडिया' कोविड -१९ टेस्ट किटला CDSCO कडून व्यावसायिक मान्यता

Updated On : Mar 26, 2020 17:45 PM | Category : राष्ट्रीयपहिल्या 'मेड इन इंडिया' कोविड -१९ टेस्ट किटला CDSCO कडून व्यावसायिक मान्यता
पहिल्या 'मेड इन इंडिया' कोविड -१९ टेस्ट किटला CDSCO कडून व्यावसायिक मान्यता Img Src (BioTecNika)

पहिल्या 'मेड इन इंडिया' कोविड -१९ टेस्ट किटला CDSCO कडून व्यावसायिक मान्यता

 • CDSCO कडून पहिल्या 'मेड इन इंडिया' कोविड -१९ टेस्ट किटला व्यावसायिक मान्यता

वेचक मुद्दे

 • कोविड -१९ टेस्टिंग किटच्या विक्रीसाठी CDSCO कडून व्यावसायिक मान्यता प्राप्त झाली आहे

 • पुणे आधारित चाचणी सेवा मायलॅब (MyLab) ही अशा प्रकारची मान्यता मिळविणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे

किट बद्दल थोडक्यात

 • सदर किट मायलॅब (MyLab) कडून विकसित करण्यात आले आहे

 • सध्या प्रयोगशाळेच्या चाचणी सेवांमध्ये कोविड -१९ चा चाचणीसाठीचा वेळ ४ तासांचा आहे

वेचक मुद्दे

 • मायलॅबचा (MyLab) चाचणीसाठीचा वेळ २.५ तास आहे

 • प्रयोगशाळा प्रत्येक किट १२०० ते १५०० रुपयांना एक याप्रमाणे विकणार आहे

 • सध्या भारत सरकारने कोविड -१९ ची कॅप किंमत ४५०० रुपये इतकी निश्चित केली आहे

ठळक बाबी

 • कोविड -१९ ची चाचणी घेण्यासाठी भारतातील कोणतीही प्रयोगशाळा या निश्चित रकमेपेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाही

 • भारत सरकारने खाजगी संस्थांना या विषाणूची चाचणी घेण्यास परवानगी दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे

 • एक किट १००० नमुन्यांचा नीट अभ्यास करू शकते

चाचणी मान्यता

 • सध्या स्वीकारल्या गेलेल्या चाचणी पध्दतीला राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून (National Institute of Virology - NIV) मान्यता प्राप्त झाली आहे

कार्यप्रणाली तत्व

 • किटची कार्यप्रणाली रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनवर (Reverse Transcription Polymerase Chain Reaction) आधारित आहे

महत्व

 • कोविड -१९ विषाणूच्या चाचणीत सध्या भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे

 • सध्या भारत १० लाख लोकांमागे केवळ १५ जणांची चाचणी घेण्यास सक्षम आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)