कोविड -१९ पासून बचावासाठी लसीची पहिली मानवी चाचणी अमेरिकेत सुरू
Updated On : Mar 18, 2020 11:19 AM | Category : आंतरराष्ट्रीय

कोविड -१९ पासून बचावासाठी लसीची पहिली मानवी चाचणी अमेरिकेत सुरू
-
अमेरिकेत कोविड -१९ पासून बचावासाठी लसीची पहिली मानवी चाचणी सुरू
ठिकाण
-
कैसर परमानेंट वॉशिंग्टन आरोग्य संशोधन संस्था (सिएटल, अमेरिका)
निर्मिती
-
NIAID वैज्ञानिक आणि त्यांच्या सहयोगींनी मॅसेच्युसेट्सच्या केंब्रिज येथील मोडेर्ना या जैव तंत्रज्ञान कंपनीत विकसित केले आहे
वेचक मुद्दे
-
लसीमध्ये रोगास कारणीभूत असलेल्या विषाणूपासून कॉपी करण्यात आलेला एक निरुपद्रवी अनुवांशिक कोड आहे
-
या गुणधर्मांमुळे कोविड -१९ होऊ शकत नाही असा अभ्यास आहे
कोविड -१९ लस चाचणीबाबत थोडक्यात
-
सदर लसीला mRNA-१२७३ म्हटले जाते
-
लसीद्वारे प्राण्यांच्या नमुन्यांमध्ये खात्रीशीरता निर्माण झाली आहे
ठळक बाबी
-
सिएटलमधील ४३ वर्षीय महिलेला प्रथम डोस मिळाला
घडामोडी
-
साधारणतः ६ आठवड्यांत सुमारे ४५ निरोगी प्रौढ स्वयंसेवक समाविष्ट करण्यात आले आहेत
-
चाचणी प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांना जवळपास २८ दिवसांच्या कालावधीत शरीराच्या अंतर्भागात इंट्रामस्क्युलर इंजेक्शनद्वारे लसीचे २ डोस देण्यात येतील
-
लसी दरम्यानच्या पाठपुरावा भेटीसाठी आणि दुसर्या शॉटनंतर १ वर्षाच्या अतिरिक्त भेटींसाठी सहभागी क्लिनीकमध्ये परत जाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे
-
एक सुरक्षा देखरेख समिती नियमितपणे चाचणी माहितीचे पुनरावलोकन करेल आणि NIAID ला सल्ला देण्याचे कार्य करेल
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |