२०२१ पर्यंत युरोपियन गुंतवणूक बँक जीवाश्म इंधन निधी थांबवणार

Updated On : Nov 16, 2019 12:48 PM | Category : आर्थिक२०२१ पर्यंत युरोपियन गुंतवणूक बँक जीवाश्म इंधन निधी थांबवणार
२०२१ पर्यंत युरोपियन गुंतवणूक बँक जीवाश्म इंधन निधी थांबवणार

युरोपियन गुंतवणूक बँक जीवाश्म इंधन निधी थांबवणार

 • २०२१ च्या अखेरीस युरोपियन गुंतवणूक बँक तेल आणि कोळसा प्रकल्पांना वित्तपुरवठा थांबवणार

 • युरोपियन युनियनकडून २०१३ पासून जीवाश्म इंधन प्रकल्पांना बॅंकेच्या माध्यमातून १३.४ अब्ज युरोचा निधी

 • २०१८ मध्ये निधी २ अब्ज युरोंवर 

 • जीवाश्म इंधन प्रकल्पांना दिलेला निधी कमी करण्यावर भर

 • २०२१ पर्यंत निधी पूर्णतः बंद करण्याचे प्रयोजन

निधीसंदर्भात महत्वाचे मुद्दे

 • EIB (European Investment Bank) चे निधीसंदर्भात नवीन धोरण 

 • निधीसाठी अर्ज करणा ऊर्जा प्रकल्पांना काही अटींची पूर्तता करणे आवश्यक

 • १ किलोवॅट/तास ऊर्जा तयार करण्यासाठी २५० ग्रॅमपेक्षाही कमी कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन करणे शक्य असल्याचे सिद्ध करणे आवश्यक

 • नवीन नियम गॅस-आधारित ऊर्जा प्रकल्पांना लागू नाहीत

 • मात्र, गॅस प्रकल्प बँकेने ठरवलेल्या 'नवीन तंत्रज्ञान' सदराखालील निकषांवर आधारित असणे आवश्यक

 • नवीन तंत्रज्ञान मध्ये समाविष्ट गोष्टी पुढीलप्रमाणे

  • उष्णता आणि उर्जा यांचे एकत्रित उत्पादन (combining heat and power generation)

  • जीवाश्म इंधनांसह अक्षय्य वायूंचे मिश्रण (mixing renewable gases with fossil fuels)

  • कार्बन कॅप्चर(carbon capture)

 • युरोपियन युनियन सदस्य देशांना गॅस प्रकल्पांवरील सूट अत्यंत सामान्य

 • येत्या ५ वर्षांच्या नियोजित कार्यक्रमात युरोपियन युनियनकडे २०० अब्ज डॉलर्स किमतीचे प्रकल्प

 • २०५० पर्यंत प्रथम कार्बन-तटस्थ खंड बनण्याचे युरोपियन युनियनचे उद्दीष्ट

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)