DRDO चे चेअरमन जी सतीश रेड्डी यांना रॉयल एरोनॉटिकल सोसायटी ऑफ युके कडून मानद फेलोशिप

Date : Nov 27, 2019 11:44 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
DRDO चे चेअरमन जी सतीश रेड्डी यांना रॉयल एरोनॉटिकल सोसायटी ऑफ युके कडून मानद फेलोशिप
DRDO चे चेअरमन जी सतीश रेड्डी यांना रॉयल एरोनॉटिकल सोसायटी ऑफ युके कडून मानद फेलोशिप

DRDO चे चेअरमन जी सतीश रेड्डी: मानद फेलोशिप (रॉयल एरोनॉटिकल सोसायटी ऑफ युके)

  • संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे ( Defence Research and Development Organisation - DRDO) चे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांना युनायटेड किंगडमच्या रॉयल एरोनॉटिकल सोसायटीकडून (Royal Aeronautical Society - RAeS) फेलोशिप प्रदान

  • १०० पेक्षा जास्त वर्षांमध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय

पुरस्कार पार्श्वभूमी

  • गेल्या तीन दशकांत भारतातील स्वदेशी डिझाईन, विविध प्रकारची क्षेपणास्त्र यंत्रणा, मार्गदर्शित शस्त्रे, एरोस्पेस वाहने तसेच एव्हीनिक्स तंत्रज्ञानाच्या विकास आणि तैनातीसाठी रेड्डी यांच्या योगदानाबद्दल सर्वोच्च पुरस्कार

  • त्यांच्या अग्रगण्य तंत्रज्ञानाच्या योगदानामुळे देशाला फ्रंटलाइन सैन्य प्रणाली आणि जागतिक दर्जाच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानांची जाणीव

योगदान

क्षेपणास्त्र विभाग कार्य

  • मिशन शक्तीचे नेतृत्व (भारताची पहिली अँटी-सॅटेलाइट क्षेपणास्त्र चाचणी (Anti-Satellite Missile Test - ASAT)

  • यामुळे तंत्रज्ञानाची अत्यंत उच्च दर्जाची आणि तंतोतंत प्रात्यक्षिके दर्शन, ज्यामुळे भारत अशा क्षमता असलेल्या ४ निवडक देशांच्या गटात सामील

  • बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण (Ballistic Missile Defence - BMD) प्रोग्रामला बळकट करून खूप उंचीवर क्षेपणास्त्र गत्यवरोध क्षमता यशस्वीरीत्या दर्शविली

नेतृत्व

  • प्रगत एव्हिओनिक्स, देशी रचना, अत्याधुनिक मिशन क्रिटिकल एरोस्पेस तंत्रज्ञान आणि प्रगत क्षेपणास्त्र यंत्रणेची तैनाती तसेच लांब पल्ल्याच्या अग्नि ५ च्या ट्रॅटेजिक मिसाईलची यशस्वी मोहीम साध्य करण्यासाठी नेतृत्व

राष्ट्रीयदृष्ट्या महत्व

  • त्यांच्या संशोधन आणि विकास योगदानामुळे क्षेपणास्त्र आणि एव्हिओनिक्स तंत्रज्ञानात देश स्वावलंबी

  • हे अत्याधुनिक तंत्रज्ञान मुख्य धोरणात्मक कार्यक्रम आणि भारतातील इतर संरक्षण अनुप्रयोगांसाठी कणा

ओळख / उपाधी

  • 'ज्युनियर कलाम (Junior Kalam)'

  • 'नेक्स्ट जनरेशन मिसाईल मॅन(Next Generation Missile Man)'

पुरस्कार

  • नॅशनल सिस्टम्स गोल्ड मेडल

  • AIAA मिसाईल सिस्टम्स अवॉर्ड

  • नॅशनल डिझाईन अवॉर्ड

  • नॅशनल एरोनॉटिकल प्राइज

  • होमी जे भाभा गोल्ड मेडल

  • टेक्नॉलॉजी लीडरशिप अवॉर्ड

  • IEI-IEEE (USA) पुरस्कार

रॉयल एरोनॉटिकल सोसायटीच्या मानद फेलोशिप विषयी

  • एरोस्पेस व्यवसायातील केवळ सर्वात अपवादात्मक योगदानासाठी पुरस्कारित असलेल्या एरोस्पेस उपलब्धीसाठी जगातील एक सर्वोच्च श्रेणी

  • एरोस्पेस डोमेनमधील नोबेल पुरस्काराच्या बरोबरीचे

  • प्रथम मानद फेलोशिप सन १९१७ मध्ये प्रदान

  • पुरस्कार प्राप्त प्रख्यात व्यक्तींमध्ये ऑर्व्हिल राइट (विमान संशोधक)सारख्या महान व्यक्तीचा समावेश

DRDO बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • DRDO म्हणजेच Defence Research Development Organization

स्थापना

  • १९५८

मुख्यालय 

  • नवी दिल्ली

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. सतीश रेड्डी

बोधवाक्य

  • बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)

जबाबदार मंत्रालय

  • संरक्षण मंत्रालय, भारत सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.