दाल सरोवर, जम्मू-काश्मीरला इको-सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याचा निर्णय

Date : Nov 12, 2019 06:46 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
दाल सरोवर, जम्मू-काश्मीरला इको-सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याचा निर्णय
दाल सरोवर, जम्मू-काश्मीरला इको-सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याचा निर्णय

दाल सरोवर, जम्मू-काश्मीर इको-सेन्सिटिव्ह झोन

  • दाल सरोवर हा पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील विभाग म्हणून घोषित करण्याची तयारी

  • जम्मू आणि काश्मीर सरकारकडून १० सदस्यीय समितीचे गठन

  • DCI - Dredging Corporation of India ने बहुविध निकषांच्या आधारे केलेल्या अभ्यासाच्या धर्तीवर निर्णय

दाल सरोवर विषयी थोडक्यात 

  • काश्मीर खोऱ्यात श्रीनगरस्थित प्रसिद्ध सरोवर

  • प्रसिद्ध नावे: Lake of Flowers, Srinagar's Jewel / Jewel in the crown of Kashmir 

  • विस्तार: १८ किलोमीटर क्षेत्रात

  • तलावाच्या भोवती तीन दिशेने डोंगर

  • जम्मू-काश्मीर क्षेत्रातील दुसरे सर्वात मोठे तलाव

  • जलाशय: गगरीबल, लोकूट, बोड आणि नागिन

डीसीआय (DCI - Dredging Corporation of India) चे निष्कर्ष

  • प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे तलावाचे मूळ क्षेत्र २२ चौरस किलोमीटर वरून १० चौरस किलोमीटर

  • तलाव धारण क्षमता ४०% पर्यंत कमी

  • घनकचरा आणि सांडपाणी यांमुळे पाण्याची गुणवत्तेत घसरण

  • अभिसरण क्रियेवर विपरीत परिणाम

  • आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक गोष्टींची निर्मिती 

  • गाळ निष्कासन क्षेत्र अनुपलब्धतेमुळे तलावाची खोली अनेक ठिकाणी कमी

इको-सेन्सिटिव्ह झोन (Eco Sensitive Zone / ESZ )

  • ESZ (Eco Sensitive Zone) म्हणजेच Ecologically Fragile Areas

  • विशिष्ट प्रदेश ESZ म्हणून पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सूचित

  • सर्वसाधारणपणे असे प्रदेश हे संरक्षित क्षेत्रे, वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांच्या परिसरात स्थित

ईएसझेड (ESZ) चे कायदे

  • घटनेत ESZ विषयी भाष्य करणारी कोणतीही तरतूद नाही शिवाय ESZ बद्दल कोणतेही कायदे वक्तव्य करत नाहीत

  • १९८६ च्या पर्यावरण (संरक्षण) कायद्यामध्ये 'Eco Sensitive Zone' या शब्दाचा उल्लेख

  • कायद्यातील तरतुदींनुसार, भारत सरकार अशा क्षेत्रांना प्रतिबंधित करू शकते, जिथे औद्योगिक कामे केली जात नाहीत

  • पर्यावरण (संरक्षण) नियम, १९८६ नियम ५ (१) नुसार, असे नमूद आहे की भारत सरकार पुढील गोष्टींबाबत उद्योग आणि इतर कार्यांवर आधारित प्रतिबंध लादू शकते 

    • जैविक विविधतेबाबत विचार

    • प्रदूषकांच्या क्षेत्रीय केंद्रीकरणाबाबतची परवानगी मर्यादा ओलांडणे

    • पर्यावरणास प्रतिकूल जमीन वापर

    • संरक्षित क्षेत्र सान्निध्य 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.