अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराबद्दल राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे
सरकारने रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी ५० अब्ज डॉलर्सचे वाटप केले आहे
देशात आणीबाणीचा असा प्रकार दुर्मिळ स्वरूपाचा आहे
राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडून याआधी वेस्ट नाईल विषाणूच्या व्यापक प्रसाराबद्दल या प्रकारच्या आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती
अमेरिकेत लागू करण्यात येणारी आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी कायद्यांतर्गत घोषित केली जाते
देशात आजतागायत ६१ वेळा राष्ट्रीय आपत्कालीन घोषणा करण्यात आल्या आहेत
प्रदेशात १३६ वैधानिक परिस्थिती अस्तित्वात आहेत ज्या अंतर्गत अमेरिकन उपखंडात आणीबाणी जाहीर करण्यात येईल
भारतात कलम ३५२ अंतर्गत आणीबाणीची घोषणा करण्यात येते
राष्ट्रपतींच्या समाधानानंतरच त्याची घोषणा करण्यात येते
ज्यावेळी देशाला किंवा देशाच्या एखाद्या क्षेत्राला सुरक्षेबाबत धोका निर्माण होईल तेव्हाच या कलमानुसार आपत्कालीन परिस्थितीस परवानगी देता येते
पंतप्रधानांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाकडून तसे करण्याचा सल्ला दिल्यास राष्ट्रपती आपत्कालीन घोषणा करतात
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.