चीन करणार आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन

Updated On : Apr 07, 2020 13:25 PM | Category : क्रीडाचीन करणार आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन
चीन करणार आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन Img Src (India Post)

चीन करणार आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन

 • आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन करणार चीन

घोषणा

 • आशियाई ऑलिम्पिक परिषदने (Olympic Council of Asia - OCA) ने १ एप्रिल २०२० रोजी ही घोषणा केली

वेचक मुद्दे

 • आशियाई युवा क्रीडा ( Asian Youth Games - AYG) ची तिसरी आवृत्ती २०१७ मध्ये होणार होती परंतु आशियाई ऑलिम्पिक परिषदने ती २०२१ पर्यंत पुढे ढकलली

ठळक बाबी

 • चीन नोव्हेंबर २०२१ मध्ये शांतो येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीचे आयोजन करणार आहे

'आशियाई ऑलिम्पिक परिषद (Olympic Council of Asia)'बाबत थोडक्यात

स्थापना

 • १६ नोव्हेंबर १९८२

मुख्यालय

 • कुवैत शहर, कुवैत

अध्यक्ष

 • अहमद अल-फहाद अल-अहमद अल-सबा

सदस्यत्व

 • ४५ राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या

अधिकृत भाषा

 • इंग्रजी

'आशियाई युवा खेळां'बाबत थोडक्यात

आयोजन कालावधी

 • संपूर्ण आशिया खंडातील खेळाडूंमध्ये दर ४ वर्षांनी आयोजित करण्यात येते

आयोजक

 • आशियाई ऑलिम्पिक परिषदेमार्फत याचे आयोजन करण्यात येते

स्पर्धा आयोजन: ऐतिहासिक पार्श्वभूमी

प्रथम आवृत्ती

 • २००९ मध्ये या खेळाची पहिली आवृत्ती सिंगापूर येथे संपन्न झाली होती

व्दितीय आवृत्ती

 • २०१३ मध्ये व्दितीय आवृत्ती चीनच्या नानजिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)