ब्राउन ते ग्रीन रिपोर्ट, २०१९: जी - २० देशांची हवामान बदलावरील कामगिरी

Date : Nov 12, 2019 09:04 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
ब्राउन ते ग्रीन रिपोर्ट, २०१९: जी - २० देशांची हवामान बदलावरील कामगिरी
ब्राउन ते ग्रीन रिपोर्ट, २०१९: जी - २० देशांची हवामान बदलावरील कामगिरी

ब्राउन ते ग्रीन रिपोर्ट

  • जी - २० राष्ट्रांच्या हवामान क्रियांचा सर्वात व्यापक पुनरावलोकन अहवाल

  • ८० निर्देशांकांचा समावेश

  • १४ संशोधन संस्थांच्या तज्ञांकडून निर्मिती

 अहवालातील महत्वाचे मुद्दे 

  • जागतिक ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनासाठी जी - २० देश ८०% जबाबदार

  • १९९८ ते २०१७ दरम्यान दरवर्षी जी - २० देशांचे हवामानाच्या अत्यंतिक तीव्र घटनांमुळे सरासरी १४८ अब्ज डॉलर्सचे नुकसान

  • सध्या जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की जो १.५ अंश सेल्सियसने तापमान वाढण्याच्या खूप नजीक

  • पॅरिस करारामध्ये मांडल्या गेलेल्या जागतिक परिस्थितीवरून त्याचे विनाशकारी पडसाद उमटण्याची चिन्हे

  • महत्वाकांक्षी NDCs ची ध्येये भारताने योजिली आहेत

  • भारताकडून दीर्घकालीन उद्दीष्टांबाबत जास्त गुंतवणूकीची योजना आखणी

  • भारत, इटली, जर्मनी, रशिया आणि फ्रान्स ही हवामानातील बदलांमुळे उद्भवलेल्या घटनांमुळे सर्वाधिक आर्थिक नुकसानीला सामोरे जाणारे देश

  • अग्रक्रम निश्चितीसाठी सुमारे १८१ देशांची निवड

  • दीर्घकालीन लक्ष्यांनी युक्त असे दोनच देश: ब्राझील आणि जर्मनी

  • चीन, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, तुर्की, रशिया आणि इंडोनेशिया सारख्या इतर देशांमध्ये पॅरिस कराराद्वारे आवश्यक असणाऱ्या NDCs लक्ष्यांची उणीव

  • ऑस्ट्रेलिया हा हवामानाच्या प्रतिक्रियेच्या बाबतीत कामगिरी करणारा सर्वात वाईट देश

जी - २० गटाविषयी थोडक्यात  

  • स्थापना: २६ सप्टेंबर १९९९

  • सध्याचे चेअरमन: शिंजो अबे

  • सदस्य: भारतासह सुमारे २० देश 

  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक स्थिरतेसंबंधी धोरणांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने गटाची स्थापना

  • कायमस्वरूपी सचिवालय किंवा सदस्य मंडळ नाही

  • जागतिक लोकसंख्येत दोन तृतीयांश (२/३) वाटा 

  • जागतिक जीडीपी (GDP) मध्ये ९०% वाटा

  • जागतिक व्यापारामध्ये ८०% वाटा

जी - २० सदस्य राष्ट्रे 

  • भारत

  • इंडोनेशिया

  • युनायटेड किंगडम

  • युनायटेड स्टेट्स 

  • इटली

  • जपान

  • मेक्सिको

  • रशिया

  • अर्जेंटिना

  • ऑस्ट्रेलिया

  • ब्राझील

  • सौदी अरेबिया

  • दक्षिण आफ्रिका

  • दक्षिण कोरिया

  • कॅनडा

  • चीन

  • युरोपियन युनियन

  • फ्रांस

  • जर्मनी

  • टर्की

शिखर परिषदा

  • २०१९: १४ वी: जी - २० ओसाका (जपान) शिखर परिषद

  • २०२० (नियोजित): १५ वी : सौदी अरेबिया 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.