शैक्षणिक वार्षिक स्थिती अहवाल २०१९ जाहीर

Date : Jan 15, 2020 11:14 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
शैक्षणिक वार्षिक स्थिती अहवाल २०१९ जाहीर
शैक्षणिक वार्षिक स्थिती अहवाल २०१९ जाहीर Img Src (ASER Centre)

शैक्षणिक वार्षिक स्थिती अहवाल २०१९ जाहीर 

 • २०१९ चा शैक्षणिक वार्षिक स्थिती अहवाल जाहीर

वेचक मुद्दे

 • 'प्रथम' या ना-नफा स्वयंसेवी संस्थेकडून आपला वार्षिक अहवाल सादर

अहवाल नामकरण

 • शैक्षणिक वार्षिक स्थिती अहवाल (Annual Status of Education Report - ASER), २०१९

सर्वेक्षण

 • ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश

 • २६ जिल्ह्यांमधील ३६,००० मुले समाविष्ट

अहवाल: मुख्य निष्कर्ष

 • सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त

 • खासगी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त

 • सुमारे ५०.४% मुले आणि ५६.८% मुली सरकारी शाळांमध्ये दाखल

 • ६ ते ८ वयोगटातील ५२.१% मुले आणि ६१.१% मुली सरकारी संस्थांमध्ये दाखल

शिक्षण हक्क कायदा आणि अहवाल

 • शिक्षण हक्क कायदा (Right to Education act), २००९ नुसार मुलांनी वयाच्या ६ व्या वर्षी पहिल्या इयत्तेत प्रवेश करणे आवश्यक

 • मात्र अहवालानुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक १० मुलांपैकी ४ मुले ५ वर्षांपेक्षा कमी वयाची

अहवाल: सूचना

 • अंगणवाडी केंद्रांचे विद्यमान जाळे बळकट व विस्तारीत करणे आवश्यक

 • भाषा ज्ञान, संख्या ज्ञान, सामाजिक आणि भावनिक शिक्षण मुलांच्या वयाशी संबंधित

 • मुलांचा योग्य वयात प्राथमिक इयत्तेमध्ये प्रवेश होणे बंधनकारक

 • ४ ते ८ वर्षांच्या मुलांचे वयोगट 'निरंतर प्रगतीशील टप्प्या'सारखे मानले जातात

 • या टप्प्यांकरिता अभ्यासक्रम तयार करण्यात कटाक्ष पाळणे अत्यंत महत्वाचे

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.