'दिशा विधेयक' आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाकडून मंजूर

Date : Dec 14, 2019 05:30 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'दिशा विधेयक' आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाकडून मंजूर
'दिशा विधेयक' आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाकडून मंजूर

'दिशा विधेयक' आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाकडून मंजूर

  • ११ डिसेंबर २०१९ रोजी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाची 'दिशा विधेयका'स मंजूरी

वेचक मुद्दे

  • महिलांवरील अत्याचारासाठी कठोर शिक्षा प्रस्ताव

  • आंध्र प्रदेश फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक म्हणूनही ओळख

उद्देश

  • राज्यातील महिला व बालकांचे संरक्षण

  • महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांच्या तपासणी प्रक्रियेला वेगवान करणे

तरतूदी

  • महिलांविरूद्ध भयंकर गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा

  • महिला व मुले अधिनियम, २०१९ नुसार महिला व मुलांविरूद्धच्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालये स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता

  • या न्यायालयांकडून लैंगिक गुन्ह्याविरूद्ध मुलांचे संरक्षण (Protection of Children against Sexual Offence - POCSO, २०१२) कायद्यांतर्गत गुन्हे देखील हाताळणी

निकाल कालावधी

  • २१ दिवस (पूर्वी ४ महिने)

विशेष लक्ष

  • बलात्कार प्रकरणे

  • अ‍ॅसिड हल्ले

शिक्षा तरतूदी

  • भारतीय दंड संहितेच्या भाग ३५४ अन्वये खटला

  • शिक्षा वाढ आमलात

  • मुलांवरील लैंगिक हल्ल्याच्या सिद्ध आरोपांसह आरोपींना १० ते १४ वर्षे तुरूंगवास

  • सोशल मीडियावर महिलांविरूद्ध अपमानास्पद पोस्ट अपलोड करणार्‍या व्यक्तींविरूद्ध कठोर कारवाई

    • पहिल्या वेळेस २ वर्षे तुरूंगवास

    • दुसर्‍या वेळेस ४ वर्षे तुरुंगवास

  • महिलांवरील भयंकर गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेचा प्रस्ताव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.