ग्रामीण आणि कृषी वित्ताधारित ६ वी जागतिक काँग्रेस आयोजन

Updated On : Nov 13, 2019 17:01 PM | Category : आर्थिकग्रामीण आणि कृषी वित्ताधारित ६ वी जागतिक काँग्रेस आयोजन
ग्रामीण आणि कृषी वित्ताधारित ६ वी जागतिक काँग्रेस आयोजन

जागतिक काँग्रेस आयोजन (World Congress on Rural and Agricultural Finance / WCRAF)

 • सुरुवात: १२ नोव्हेंबर, २०१९

 • ठिकाण: नवी दिल्ली

 • उद्दिष्ट: जगभरातील ग्रामीण आणि कृषी वित्त भागधारकांना एकत्रित करणे

 • काँग्रेस ही व्यावसायिक संबंध मजबूत करण्याची आणि उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देण्याची एक सुवर्णसंधी

 • भागीदार संस्था: नाबार्ड (NABARD - National Bank for Agriculture and Rural Development), Asia Pacific Rural and Agricultural Credit Association आणि Ministry of Agriculture and Farmers Welfare (MoAFW)

२०१९ सालासाठी थीम

 • Rural and Agricultural Finance: Critical Input to achieve Inclusive and Sustainable Development (ग्रामीण आणि कृषी वित्त: शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी अत्यावश्यक इनपुट)

उद्दीष्ट्ये

 • जागतिक मूल्य साखळ्यांना प्रोत्साहन

 • अन्न सुरक्षा सोडविण्यासाठी मदत

 • शेतीबाबतची शाश्वतता, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि सामाजिक समतेची बांधणी

 • उद्दिष्टपूर्तीसाठी वित्तीय संस्थांनी ग्रामीण संस्थांना स्थिर आर्थिक सेवा देण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण कार्ये करणे

पार्श्वभूमी

 • दर ३ वर्षांनी आयोजन 

 • प्रथम कॉंग्रेस: २००५ - अदिस अबाबा (इथिओपिया)

 • दुसरी कॉंग्रेस: २००७ - बँकॉक

 • तिसरी कॉंग्रेस: २०१० - मराकेश (मोरोक्को)

 • चौथी कॉंग्रेस: २०१३ - पॅरिस

 • पाचवी कॉंग्रेस: २०१६ - डकार (सेनेगल)

काँग्रेस आयोजन महत्व

 • शेती व ग्रामीण वित्तपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांना महत्त्व प्रदान 

 • सामाजिक आणि पर्यावरणीय संतुलनात मदत 

काँग्रेस एसडीजी (SDG) साध्य उद्दीष्ट

 • एसडीजी - १: २०३० पर्यंत होणारी सर्वसमावेशक आर्थिक प्रगती ही शाश्वत विकास प्रदान करणारी आणि दारिद्र्य समाप्त करून समानतेला चालना देणारी असावी

 • एसडीजी - २: शेतीत गुंतवणूकीस चालना देणे जेणेकरून शेतीची टिकाऊ उत्पादकता आणि शाश्वत अन्न उत्पादन वाढ होईल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)