२६ नोव्हेंबर: राष्ट्रीय दुग्ध दिन

Date : Nov 27, 2019 05:54 AM | Category : आजचे दिनविशेष
२६ नोव्हेंबर: राष्ट्रीय दुग्ध दिन
२६ नोव्हेंबर: राष्ट्रीय दुग्ध दिन

२६ नोव्हेंबर: राष्ट्रीय दुग्ध दिन

  • भारतीय श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्मदिन राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा

  • संयुक्त राष्ट्र संघाकडून दरवर्षी १ जून रोजी जागतिक दुग्ध दिन साजरा

  • यावर्षी वर्गीस कुरियन यांची ९८ वी जयंती साजरी

  • २६ नोव्हेंबर २०१४: इंडियन डेअरी असोसिएशनने (Indian Dairy Association - IDA) पुढाकार घेतल्यानंतर रोजी पहिला राष्ट्रीय दूध दिन साजरा

  • पहिल्या राष्ट्रीय दूध दिनी २२ राज्यातील विविध दूध उत्पादकांनी भाग

उद्देश आणि महत्व

  • दूध व दुग्ध उद्योगांसंदर्भात होणाऱ्या फायद्याला प्रोत्साहन देणे

  • उत्पादनांच्या महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे

डॉ वर्गीस कुरियन बद्दल

  • जन्म: २६ नोव्हेंबर १९२१, कोझिकोडे (केरळ)

  • भारतात 'श्वेत क्रांतीचे जनक' म्हणून ओळख

  • प्रख्यात भारतीय सामाजिक उद्योजक

  • त्यांचा 'ऑपरेशन फ्लड (Operation Flood)' हा जगातील सर्वात मोठा कृषी विकास कार्यक्रम अजूनही प्रसिद्ध

  • त्यांनी ३० संस्था स्थापन केल्या असून त्या विविध शेतकरी व कामगारांद्वारे चालवल्या जातात

  • अमूल ब्रँडच्या स्थापनेत व यशस्वी होण्यासाठी महत्वाची भूमिका

पुरस्कार

  • रेमन मॅग्सेसे पुरस्कार (१९६३)

  • पद्मश्री (१९६५)

  • पद्मभूषण (१९६६)

  • जागतिक अन्न पुरस्कार (१९८९)

  • पद्म विभूषण (१९९९)

भारतातील दुग्ध क्षेत्र

  • डॉ. कुरियन यांच्या प्रयत्नांमुळे स्वातंत्र्यानंतर देशात संघटित दूध क्षेत्राची भरभराट

  • सध्या, जगातील दुग्ध उत्पादनात भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक देश

  • दरवर्षी १८७.७ दशलक्ष टन (एमटी) दुग्ध उत्पादनासह जगातील सुमारे २२% दुध उत्पादनात योगदान

  • भारतातील दुधाचे उत्पादन युरोपियन युनियन (European Union - EU) देशांच्या तुलनेत मागे

  • त्यानंतर युनाइटेड स्टेट्स, चीन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.