भारत बायोटेक ‘कोरोफ्लू’ लस विकसित करण्यासाठी फ्लूजेनशी करारबद्ध
कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी कोरो-फ्लू नावाची लस तयार करण्यासाठी भारत-बायोटेक(Bharat Biotech अमेरिकन कंपनी फ्लूजेन(FluGen) आणि युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसन(University of Wisconsin Madison) यांच्याशी करारबद्ध झाली आहे
कोरोफ्लू एम २ एसआर(M2SR) म्हणून ओळखल्या जाणार्या फ्लूजेन फ्लूच्या आधारावर निर्मिती करण्याची तयारी आहे
हैदराबाद, तेलंगणा येथे भारत बायोटेकचे मुख्यालय स्थित आहे
कृष्णा एम. एला हे सध्या भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत
ही एक अग्रगण्य जैव तंत्रज्ञान(Biotechnology) कंपनी आहे जी जागतिक स्तरावरील संशोधन, विकास आणि उत्पादन क्षमतांसाठी ओळखली जाते
लोकांना रोगांवर विजय मिळविण्यास मदत करणारी, सुरक्षित आणि उच्च-गुणवत्तेची लस आणि जैव-उपचार पद्धती वितरित करणे हे कंपनीचे ध्येय आहे
उदयोन्मुख बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून रोगाविरूद्ध लढा देण्यासाठी व अग्रगण्य होण्यासाठी जैव तंत्रज्ञानात प्रगती करणे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.