राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

2.

अॅन्थनी गिडन्स यांच्या मते आधुनिक या संकल्पनेत कशाचा समावेश होत नाही ?

3.

खालील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा.

अ. गौतम बुद्ध कालीन साहित्यातील काही विचार आधुनिकतेशी सुसंगत होते.

ब. वसाहतवादामुळे अफ्रो-आशियाई देशांना आधुनिकतेचा परिचय झाला,

4.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. धार्मिक रूढी आधुनिक मानल्या जात नाहीत.

ब. परकीय सत्तेमुळे भारत आधुनिक झाला नाही, असे नाही.

5.

खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

परिच्छेद (प्रश्न क्रमांक 6 ते 10) :
              जागतिक नेत्यांनी अलीकडेच 17 शाश्वत उद्दिष्टे आणि 169 सहयोगी लक्ष्य जाहीर केली आहेत. उद्दिष्टे आणि लक्ष्य हे एकात्मिक आणि अविभाज्य स्वरुपाची आहेत. जागतिक नेत्यांनी एवढ्या व्यापक आणि वैश्विक धोरण कार्यसूची साठी समान कृती आणि प्रयत्नांची प्रतिज्ञा केली आहे. सर्वांच्या पूर्ण फायद्यासाठी त्यांनी ह्या कार्यसूचीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवी हक्कांचा जाहीरनामा आणि इतर आंतरराष्ट्रीय कायदे यांचे महत्त्व जगाने पुन्हा अनुमोदित केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सनदेस अनुसरून वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय व इतर मते, राष्ट्रीय किंवा सामाजिक उगम, मत्ता, जन्म, अक्षमता, इ. बाबतित कोणताही भेद न करता मानवी हक्कांचा आदर, संरक्षण आणि संवर्धन करणे तसेच सर्वांसाठी मुलभूत स्वातंत्र्य सुनिश्चित करणे याबाबत सर्व राज्यांच्या जबाबदारीवर भर देण्यात आला आहे.
            नवीन उद्दिष्टे आणि लक्ष्य जानेवारी 1, 2016 पासून अमलात आली आहेत आणि पुढील पंधरा वर्षे निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतील. विशेषत: आफ्रिका आणि आशिया मधील विकसनशील देशातील सर्वसमावेशी आणि शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी राष्ट्रीय धोरण क्षेत्राचा आदर करणे आवश्यक आहे. जे लोक असुरक्षित आहेत त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. या विकासकार्य सूचित ज्यांच्या गरजा प्रतिबिंबित होतात त्यात सर्व मुले, युवक, अक्षम व्यक्ति, एच.आय.व्ही./एड्स बाधित लोक, वयस्क, देशी किंवा खेड्यात राहणारे लोक, अंतर्गत निर्वासित, विस्थापित आणि स्थलांतरितांचा समावेश होतो. 2030 पर्यंत सर्व प्रकारचे आणि विविध परिमाण असणा-या दारिद्र्याचे निर्मुलन करण्याची - बांधिलकी यात दर्शवली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे मुलभुत राहणीमान, उपासमारीचा अंत, अन्न सुरक्षा साध्य करणे, यास उच्चतम प्राधान्य देवून सर्व प्रकारचे कुपोषण नाहीसे करणे इ. आश्वस्त करतात.
                शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि निरोगीपणा प्रवर्तित करण्यासाठी आणि सर्वांचे आयुर्मान उंचावण्यासाठी आपण वैश्विक आरोग्य विस्तार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसुविधा यांची उपलब्धता केली पाहिजे. 2030 पर्यंत अर्भकमृत्यू, बालमृत्यू आणि मातामृत्यू यांचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. लैंगिक आणि पुनुरुत्पादन संबंधित आरोग्य सेवा सुविधा ज्यात कुटुंब नियोजन, माहिती आणि शिक्षण यांचा समावेश आहे अशांची विश्वव्यापी उपलब्धता यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे वचनबद्ध आहेत. मलेरिया, एच.आय.व्ही./एड्स, टीबी, हेपटायटीस, एबोला आणि अन्य संसर्गजन्य आजार व साथी यांच्याशी लढण्यात जी प्रगती सध्या केली आहे तिचा वेग वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
                  सर्व देशांची बळकट आर्थिक पायाभरणी व्हावी असा शाश्वत विकास उद्दिष्टांचा उद्देश आहे. समृद्धीसाठी सर्वसमावेशी आणि शाश्वत आर्थिक विकास आवश्यक आहे. जर संपत्तीचे सम वितरण झाले व उत्पन्न विषमतेची समस्या सोडवली तर हे अधिक सोपे होईल. बहुआयामी, शाश्वत, नवनिर्माणशील व जनकेन्द्रित अर्थव्यवस्थांची निर्मिती ज्यात तरुणांना रोजगार आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यावर भर दिला असेल यासाठी देशांनी काम केले पाहिजे. निरोगी आणि सुशिक्षित श्रमबळ असेल तर सर्व देशांना फायदाच होईल. शाश्वत विकास उद्दिष्टांची व्यापक कार्यसूची ही येणा-या दीड दशकातील मानवी प्रगतीची दिशा निश्चितपणे दर्शविते. यातील बहुतेक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि मानवी जीवनाचा दर्जा सर्वत्र सुधारण्यासाठी जगातील सर्व देशांनी अथकपणे प्रयत्न केले पाहिजेत.

6.

यापैकी काय सत्य नाही ?

अ. शाश्वत विकास उद्दीष्टे ही फक्त विकसनशील राष्ट्रांना लागू आहेत.

ब. शाश्वत विकास उद्दीष्टांतील उद्दीष्ट्ये आंतरसंबंधित आहेत. 

7.

पुढील विधाने लक्षात घेवून योग्य पर्याय निवडा :

अ. सर्वसमावेशी वृद्धी ही आर्थिक वृद्धीची पूर्वअट आहे.

ब. आर्थिक समृद्धी ही सर्वसमावेशी वृद्धीची पूर्वअट आहे.

8.

अ. दर्जेदार आरोग्यसुविधांमुळे आयुर्मान सुधारते.

ब. दर्जेदार आरोग्यसुविधांमुळे बालमृत्यूचे प्रमाण घटते.

क. शाश्वत विकास उद्दीष्टये आरोग्यसेवांसाठी वचनबद्ध आहेत.

ड. शाश्वत विकास उद्दीष्टये दारिद्रय घटवण्याचा हेतू बाळगतात.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

9.

पुढील विधाने लक्षात घेवून योग्य पर्याय निवडा :

अ. मानवी हक्क आणि आंतरराष्ट्रीय कायदे हे शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे आहेत.

ब. मानवी हक्कांचे प्रवर्तन आणि स्वातंत्र्य ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे.

10.

खालीलपैकी कोणती जोडी उपरोक्त परिच्छेदाचा भाग नाहीत ?

परिच्छेद (प्रश्न क्रमांक 11 ते 15) :
            मानवाचा भाषा अध्ययनासाठी तसेच अमूर्त विचार व विवेकाविचाराची क्षमता असणारा मेंदू असामान्यरीत्या मोठा होण्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याबाबत अभ्यासक बराच काळ युक्तिवाद करत आहेत. वैज्ञानिकांनी पूर्व आफ्रिकेच्या रिफ्ट व्हॅलीतील अत्यंत ओल्या व अतिकोरड्या कालखंडांची सांगड मानवंशीय पूर्वजांच्या उत्क्रांतीने अचानकपणे घेतलेल्या उसळ्यांशी घातली. ज्यामुळे आधुनिक मानवाच्या मेंदूची उत्क्रांती झाली.
             अगदी अलीकडची उत्पत्ती सुचवते की आदीमानवाच्या स्वत:च्या स्थानिक पर्यावरणातील नाट्यपूर्ण बदलांशी अनुकूलता साधण्याच्या गरजेपोटी मेंदूचा आकार वाढला. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मधील प्राध्यापक मार्क मास्लिन म्हणतात, “असं दिसतंय की मानव हवामानाच्या बदलातून जन्माला आले असावेत कारण त्यांना दुष्काळाकडून सुकाळ आणि उलट होणाच्या वेगवान बदलांना तोंड द्यावे लागत होते. या बदलाने मोठे मेंदू असलेली नवी प्रजाती अस्तित्वात आली तसेच त्यांना पूर्व आफ्रिकेतून युरेशियात व दक्षिण आफ्रिकेत जावे लागले”.
             रिफ्ट व्हॅली हा पर्वत, सरोवरे व सुपीक दया असलेला विस्तृत भूस्तरीय विभंग आहे. आदिमानवाचे अत्यंत महत्त्वाचे असे अनेक अश्मिभूत अवशेष या भागाच्या उत्खननात मिळाले आहेत व माणसाच्या उत्पत्तीचे हे सर्वात महत्त्वाचे आदिम स्थान असावे असे ते सूचित करतात.
            या अभ्यासात गेल्या 5 दशलक्षवर्षातील हवामानातील बदलांचा आढावा घेतला गेला. वैज्ञानिकांना आढळले की 2 लक्ष वर्षांच्या त्या मानाने छोट्या कालखंडात, पृथ्वीच्या सूर्याभोवती चे प्रदक्षिणेतील चक्रीय बदल - ही मिलान्कोव्हिच चक्रे म्हणून ओळखली जातात - होत असताना, पूर्व आफ्रिका अतिशय संवेदनशील होती. या चक्रामुळे हिमयुगांसारखे जागतिक पातळीचे हवामान बदल घडून आले.
          प्राध्यापक मास्लिन म्हणतात, “या प्रदक्षिणेतील बदलांमुळे पूर्व आफ्रिकेतील हवामान गोड्या पाण्याच्या, समृद्ध व बहरलेल्या वनांनी वेढलेल्या खोल सरोवरापासून ते आजच्यासारखी वाळूच्या टेकड्यांची अतिशुष्क परिस्थितीतील रिफ्ट व्हॅलीतील जमीन, अशा दोन टोकाच्या प्रचंड हेलकाव्यात राहिले असावे. या बदलांच्या परिणामी मोठे मेंदू असलेल्या नव्या प्रजातीची उत्क्रांती झाली तसेच आदिमानवाला पूर्व आफ्रिकेबाहेर विखुरणे भाग पाडले.”
            मानवी उत्क्रांतीतील महत्त्वाच्या पाय-यांशी जुळणारे अशा प्रकारचे हवामानातील बदलांचे विशेषत: तीन कालखंड अभ्यासात आढळलेले आहेत. यातील पहिला साधारणपणे 2-6 दशलक्ष वर्षांपूर्वी घडला जेव्हा रिफ्ट व्हॅलीतील रहिवासी • दक्षिण आफ्रिकेत ढकलले गेले, व होमो हॅबिलीस ही नवी प्रजाती उदयाला आली. दुसरा साधारणपणे 19 दशलक्ष वर्षांपूर्वी घडला जेव्हा होमो इरेक्टस ही महत्त्वाची प्रजाती आफ्रिकेत उदयाला आली व तिने आशियाच्या मोठ्या भागात वसाहती केल्या. तिसरा बदल साधारणपणे 1 दशलक्ष वर्षांपूर्वी घडला जेव्हा होमो हायडेलबर्गेन्सिस उदयाला आली.
              प्राध्यापक मास्लिन म्हणाले की जेव्हा होमो सेपिएन्सची प्रथम उत्क्रांती झाली त्या गत 150 हजार वर्षांतील आढावा घेण्यासाठी हे तंत्र पुरेसे अचूक नाही. तथापि ते मोठा मेंदूधारी, ख-या अर्थाने मानव-सदृश सांगाडा असलेल्या, पौगंडावस्थेतील वाढीव वैशिष्ट्यपूर्ण उसळी दाखवणाच्या पहिल्या मानववंशीयांना होमो इरेक्ट्सकडे नेणारे आधीचे उत्क्रांतीयुक्त परिवर्तन दर्शविते.

11.

दिलेल्या परिच्छेदाच्या संदर्भातील सर्वात तर्कसंगत भाष्य निवडा.

12.

वरील परिच्छेदात उल्लेखिलेल्या मानववंश प्रजातींचा आदिम ते आधुनिक अशी मांडणी केलेला उचित संच निवडा.

13.

जलवायूमानातील बदल हे मेंदूच्या असामान्य वाढीला जोर देणारे कारण म्हणून विचारात घेण्यासाठी वैज्ञानिकांनी पुरवलेला प्रमुख पुरावा निवडा.

14.

अ व ब यांच्या सहसंबंधाचे तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा.

अ. 2,00,000 वर्षांच्या कालखंडादरम्यान मिलान्कोविच चक्रांनी रिफ्ट व्हॅलीतील जलवायूमानाला ओल्या व कोरड्या परिस्थितींच्या अतिटोकांच्या आंदोलनांतून जाणे भाग पाडले.

ब. फक्त मोठ्या मेंदूधारी मानवंशीय पूर्वजांना टोकाच्या जलवायूमान बदलांतटिकाव धरणे शक्य झाले आणि म्हणून ते नव्या प्रजाती म्हणून उदयाला आले.

15.

प्राध्यापक मास्लिन यांच्या म्हणण्यानुसार आधुनिक मानव जलवायूमान बदलातून जन्माला आले असावेत कारण त्यांना दुष्काळाकडून सुकाळ आणि त्याच्या उलट होणाच्या वेगवान बदलांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे मोठे मेंदू असलेल्या नव्या प्रजाती अस्तिवात आल्या :

प्राध्यापक मास्लिन यांच्या वरील म्हणण्याला पाठबळ देणारे/री पुढीलपैकी निरीक्षण/णे निवडा.

अ. सध्या अस्तित्वात असलेल्या मानवंशीय सदस्यांचे त्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठ्या आकाराचे मेंदू आहेत.

ब. डायनोसॉरस सारख्या अनेक प्राणी प्रजाती नष्ट झाल्या आहेत त्यांचे मेंदू तुलनेने लहान होते. 

परिच्छेद (प्रश्न क्रमांक 16 ते 20) :

           या पूर्वी फार कमी लोकांनी अर्थविज्ञानात नोबल पारितोषिक मिळवले आहे हे सर्वांना माहीत असलेले तथ्य आहे. जग बदलवणारे असे स्वत:चे निष्कर्ष मिळवण्यासाठी त्या सर्वांनी दीर्घकाळ काम केले या वर्षीचे नोबल पारितोषिक जिंकणारे अँगस डीटन हे वेगळीच गोष्ट सांगतात व स्वत:च्या यशाबाबत नशिबाला महत्त्वाचा घटक मानतात. त्यांच्या मते त्यांचे वडील दुस-या जागतिक युद्धात मरण पावले नाहीत कारण सुदैवाने त्यांना क्षयाची लागण झाली. स्कॉटलंडमध्ये कोळसा खाणकामगार असलेल्या त्यांच्या वडिलांना, युद्धानंतर सहज उपलब्ध असलेल्या श्रमबाजारात मुलकी अभियंता व्यवसाय पेढीत काम मिळाले. आपल्या इतर कुटुंबीयांच्या सल्ल्याविरोधात जाऊन त्यांनी छोट्या डीटनला पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुस्तकांच्या वाचनाने डीटनमध्ये लोकांच्या जीवनात नशिबाने वटविलेल्या भूमिकेबाबत तीव्र जाणीव निर्माण झाली. ते म्हणतात, “जर तुम्ही जगाचीपुन्हा मांडणी केली तर त्यात अगदी वेगळ्याच प्रकारचा खांदेपालट होईल.” आयुष्यभराच्या आपल्या नोबेल पारिताषिक प्राप्त कामात त्यांनी आपला हा दृष्टिकोन मिसळून टाकला आहे. ते लिहितात, “जगातील गरिबी आणि अनारोग्य कमी करणे हे योग्य देशात जन्माला येऊन पुरेसे नशीबवान ठरलेल्या आपल्यासारख्या लोकांचे नैतिक कर्तव्य आहे.”
            लोक कशाप्रकारे चीजवस्तूंचा व सेवांचा उपभोग घेतात याचे आकलन करून घेण्यावर डीटन यांची जीविका केंद्रित झाली आहे. सुधारित आरोग्य व स्वास्थ्य निर्माण करणे, गरिबी व विषमता कमी करणे यासारख्या सामाजिक ध्येयांच्या प्राप्तीसाठी ही महत्त्वाची पायरी आहे. प्रत्येक व्यक्ती करत असलेल्या निवडी का करतात याचे आकलन प्राप्त करणे हा त्यांचा हेतू आहे. या लक्ष्यासह डीटन हे गरिबी व विषमता यांच्या कारणांना परिणामांच्या गुंत्यातून मोकळे करण्यात विशेष - कुशल राहिले आहेत. उदाहरणार्थ, भारताबाबत त्यांनी दाखवून दिले की, कुपोषण हे कमी उत्पन्नामुळे घडते-काहींना जसे वाटते तसे ते कमी उत्पन्नाला कारणीभूत ठरत नाही. त्यांनी दाखवून दिले की लोकांच्या उत्पन्नात केलेल्या वाढीने गरीब लोकांना उच्च उष्मांक खाण्याकडे प्रवृत्त केले. हे शिकण्यासाठी डीटन यांनी फक्त गरीब असलेल्या व्यक्तिंच्या वर्तनांची पाहणी केली. त्यांनी उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना समाविष्ट करणारी आणि परिणाम सपाट करणारी एकत्रित माहिती वापरली नाही.
               नोबेल पारितोषिक समितीने लिहिले की; 1980 च्या कालखंडातील संशोधन विकास हा बहुतकरून पोथीनिष्ठ होता जेथे हा अनुभवावर आधारित होता, तेथे तो राष्ट्रीय वृत्तांतातील एकत्रित आकडेवारीवर विसंबून होता. हे आता बदलले आहे. प्रत्येक कुटुंबीयांकडून गोळा केलेल्या माहितीच्या प्रगत विश्लेषणावर आधारित प्रगत (विकास) अर्थशास्त्र आता भरभराटीला आले आहे. डीटन यांचे संशोधन हे या परिवर्तनाला पुढे न्यायचे महत्त्वाचे कार्य करते.

16.

विधानांच्या आधारे सर्वात जास्त व्यावहारिक सत्य म्हणता येईल अशा निष्कर्षाची निवड करा :

जग बदलायला लावणारे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सर्व नोबेल जिंकणारे दीर्घकाळ काम करतात. या वर्षीचा नोबेल पारितोषिक जिंकणारे अँगस डीटन स्वत:च्या यशप्राप्तीच्या संदर्भात त्याच्या नशिबाला महत्त्व देत वेगळीच गोष्ट सांगतात.

17.

ज्यासाठी डीटन स्वत:ला नशीबवान समजतात त्याचे दिलेल्या पर्यायांतून सर्वात समर्पक कारण निवडा.

18.

ज्यामुळे जगाची विकास अर्थशास्त्राची दृष्टी प्रत्यक्षपणे बदलली अशी/अशा अँगस डीटन यांची/यांच्या कृती निवडा :

अ. पुस्तके वाचणे व स्वत:ला नशिबवान समजणे.

ब. गरीब लोकांच्या घरगुती महितीचे प्रगत तंत्र वापरून विश्लेषण करणे.

क. गरीब व्यक्तिंच्या निवडीशी संबंधित अशा वर्तनांचे निरीक्षण करणे.

ड. विषमता व अनारोग्य कमी करण्यासाठी काम करणे.

19.

डीटन यांच्या कारणांचा परिणामांपासूनचा गुंता सोडवण्याच्या कौशल्याच्या भूमिकेची सामाजिक समस्यांच्या संदर्भात निवड करा. 

अ. लोकांच्या जीवनातील नशिबाच्या भूमिकेसंबंधाने जाणीव जागृत व्हायला मदत त्यांना मिळाली.

ब. गरीब लोक करत असलेल्या निवडींचे आकलन करून घेणे त्यांना शक्य झाले.

क. कुपोषण हा निम्न उत्पन्नाचा परिणाम असतो हे तथ्य प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले.

ड. कुपोषण कमी करणा-या उपक्रमांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले.

20.

जगातील गरीबी व अनारोग्य कमी करण्याची स्वत:ची नैतिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी डीटन ने केलेल्या कामाची निवड करा.

अ. गरीब व्यक्तिंच्या त्यांच्या निवडींशी संबंधित वर्तनाचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केले.

ब. लोकांचे नशीब त्यांच्या निवडींवर कसा परिणाम करतात याचा अभ्यास करण्याला महत्व दिले.

क. विकास अर्थविज्ञानाचा आधार उभा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या निवडींचे त्यांनी निरीक्षण केले. 

ड. समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित माहितीचे विश्लेषण करण्याऐवजी व्यक्तिगत माहितीचे विश्लेषण करणे प्रस्थापित केले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.