राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

1919 च्या माँटेग्यू चेम्सफर्ड कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतूदी होत्या?

(a) भारतीय मंत्र्याचा पगार इंग्लडच्या तिजोरीतून दिला जावा.

(b) भारतीय उच्च आयुक्त हा भारताच्या व्हॉइसरॉयचा इंग्लडमधील प्रतिनिधी म्हणून काम पाहील.

(c) प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती निर्माण करावी.

(d) भारतीय मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा.

पर्यायी उत्तरे :

2.

भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी रुढ झाले. त्याबाबतीतील पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) हा दिनांक निवडण्यात आला कारण काँग्रेसने डिसेम्बर 1929 च्या लाहोरच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी मान्य केली व सर्व भारतीयांना आवाहन केले होते की हा दिवस प्रत्येक वर्षी स्वतंत्रता दिवस म्हणून पाळला जावा.

(b) संविधानाचे उगमस्थान अधिनियम 1935 मध्ये व अमेरिका, स्वित्झरलँड, आयरलँड, ब्रिटेन, फ्राँस व स्पेन यांच्या संविधानात आहे.

पर्यायी उत्तरे :

3.

पाँडिचेरी बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे नाही ?

(a) सन 1761 व 1816 मध्ये पाँडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटून पालटून वर्चस्व होते.

(b) फ्रान्सने अंतिमतः 26 सप्टेंबर 1816 रोजी पाँडिचेरीवर आपली सत्ता स्थापित केली जी 31 ऑक्टोबर 1954 पर्यंत चालली.

पर्यायी उत्तरे : 

4.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

(a) भारत व इंग्लंड मधील कितीतरी इंग्रजांना इंडियन असोशिएशन स्थापन झालेले आवडले नाही म्हणून त्यांना एक पर्याय हवा होता.

(b) सर ए.ओ. ह्यूम जो की एक निवृत्त नागरी अधिकारी होता त्याची अशी इच्छा होती की एक संस्था जी एक सेफ्टी व्हॉल्व म्हणून स्थापन व्हावी आणि काँग्रेसची स्थापना झाली. गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन ह्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता.

पर्यायी उत्तरे :

5.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

(a) स्वतंत्र भारताचे प्रथम सरकार जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली होते. सर्व मंत्री काँग्रेसचे सदस्य होते.

(b) अन्नधान्याची कमतरता सोव्हिएत युनियन व युनायटेड स्टेटसकडून आयात करून मिटवली गेली.

पर्यायी उत्तरे :

6.

पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?

7.

पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य 1917 च्या सँडलर आयोगात होते ?

(a) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

(b) दादाभाई नौरोजी

(c) आशुतोष मुखर्जी

(d) झियाउद्दीन अहमद

पर्यायी उत्तरे :

8.

जोड्या जुळवा :

9.

स्वराज पार्टीची स्थापना झाल्यावर, गांधीजींना हवे होते की काँग्रेसजनांनी ग्रामीण भागात विधायक कामे करावीत. त्यात काय सम्मिलित नव्हते?

10.

सर्फ-ए-खास म्हणजे काय?

11.

जोड्या जुळवा :

12.

भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतक-यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होती ?

(a) अवास्तव जमीन महसूल

(b) दुष्काळ

(c) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष

(d) विविध कर

पर्यायी उत्तरे :

13.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

(a) सोहन सिंग भाकना आणि त्यांच्या क्रांतिकारी मित्रांनी सन 1907 मध्ये कॅलिफोर्निया येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. लाला हरदयाल यांच्या येण्यानंतर 1911 मध्ये या संस्थेच्या कारवाया वाढल्या.

(b) तारकानाथ यांनी सन 1913 मध्ये सॅन फ्रैंसिस्को येथे गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी अमेरिकाभर फिरून तेथे राहणा-या भारतीयांमध्ये इंग्रजांविरूद्ध भावना जागृत केल्या.

पर्यायी उत्तरे :

14.

पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

15.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) साउथ इंडियन लिबरल फेडरेशन हे अॅन्टी होमरूल लीग या नावानेही ओळखले जात असे.

(b) साउथ इंडियन लिबरल फेडरेशन ने होमरूल सध्या लागू करू नये असा अहवाल माँटेग्यूला दिला. पर्यायी उत्तरे :

16.

1857 च्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी होते ? 

(a) सावंतवाडीचे रामजी शिरसाट

(b) झीनत महाल बेगम

(c) खान बहादूरखान रोहिला

(d) नसरत शाह

पर्यायी उत्तरे :

17.

• त्यांनी 1895 च्या पुण्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला.
• मुंबई व युरोपात वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या.

• कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली.

त्या कोण होत्या?

18.

पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

19.

खालीलपैकी बरोबर विधाने कोणती ?

(a) राष्ट्रकूट काळातील सर्वात श्रेष्ठ लेणे म्हणजे कैलास लेणे होय.

(b) वेरुळ येथील जैनांची लेणी दिगंबर पंथीयांची आहेत.

(c) चालुक्याच्या राजवटीत पट्टकदल, बदामी व तेर या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली.

(d) घारापुरी येथील लेण्यातील त्रिमुखी मूर्ती शिल्प प्रसिद्ध आहे.

पर्यायी उत्तरे :

20.

भारताचे रशियाच्या संदर्भात पुढील विधानांपैकी कोणते विधान खरे नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.