माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन काळाच्या पडद्याआड

Date : Nov 11, 2019 11:57 AM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन काळाच्या पडद्याआड
माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन काळाच्या पडद्याआड

टी. एन. शेषन काळाच्या पडद्याआड

  • भारतातील प्रतिभावान व्यक्तिमत्वांपैकी एक असे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तिरुनेलई नारायण अय्यर शेषन यांचे नुकतेच निधन

  • हृदयविकाराच्या झटक्यामुळे काळाच्या पडद्याआड

  • ते ८७ वर्षांचे होते

  • गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत नव्हती

  • अनेक निवडणूक सुधारणांमागे त्यांच्या अमूल्य कार्याचा ठसा उमटलेला दिसून येतो

  • त्यांनी दहाव्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांचा कार्यकाल १९९० ते १९९६ इतका होता.

टी. एन. शेषन यांचा अल्प परिचय

  • जन्म: केरळमधील पलक्कड जिल्ह्यात

  • १९५५ बॅचचे तमिळनाडू केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी

  • मुख्य निवडणूक आयुक्त पदावर रुजू होण्यापूर्वी सुमारे १८ कॅबिनेट सचिव पदांची सेवा

  • १९८६ मध्ये त्यांना त्यांच्या विशेष सेवांकरिता आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणाऱ्या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते

  • १९९७ मध्ये त्यांनी के. आर. नारायणन यांच्याविरूद्ध राष्ट्रपती पदासाठी लढलेली निवडणूक अयशस्वी ठरली.

टीएन शेषन यांनी केलेल्या निवडणूक सुधारणांविषयी

  • राजकारण्यांच्या सत्ता वापरावर निर्बंध लादणाऱ्या निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांची ओळख

  • कार्यकाळात केंद्राकडून दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नेमणूक

  • मुख्य निवडणूक आयोगाकडून त्यांच्या कार्यकाळात पुढील गोष्टींबाबत कारवाई

    • मतदारांना लाच देणे

    • निवडणुकी दरम्यान दारू वाटप 

    • मतदारांशी जात किंवा समुदाय आधारावर आवाहन करण्यासाठी संपर्क

    • प्रचारासाठी अनधिकृत यंत्रणेचा वापर

    • प्रचारासाठी पूजा स्थळांचा वापर

    • लाऊड स्पीकर्स आणि उच्च- ध्वनी संगीताचा वापर

  • त्यांच्या कार्यकाळात खालील कायदे लागू करण्यात आले

    • कठोर आचारसंहिता लागू करणे

    • उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर मर्यादा

    • मतदारांना ओळखपत्र पुरवणे 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.