सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल: सरन्यायाधीश माहिती अधिकार कक्षेत

Date : Nov 14, 2019 05:22 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल: सरन्यायाधीश माहिती अधिकार कक्षेत
सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल: सरन्यायाधीश माहिती अधिकार कक्षेत

सरन्यायाधीश माहिती अधिकार कक्षेत

  • सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली उच्च न्यायालयाच्या २०१० च्या निर्णयाला मान्यता

  • आरटीआय (माहिती अधिकार) (RTI - Right To Information) कायदा सी.जे.आय (CJI) - भारतीय सरन्यायाधीश कार्यालयावरही लागू

निकालातील महत्वाचे निष्कर्ष

  • सी.जे.आय (CJI) कार्यालय आणि SC ही दोन भिन्न अधिकृत सार्वजनिक प्राधिकरणे नाहीत

  • संविधानाच्या कलम १२४ नुसार SC मध्ये CJI आणि इतर न्यायाधीश कार्यालये समाविष्ट

  • RTI कायद्यानुसार, सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO) यांच्याकडे विवेकबुद्धी आहे

  • न्यायालयीन स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व सुनिश्चिती हे सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याचे कार्य

  • न्यायिक प्रशासनाच्या काही बाबींमध्ये SC ने गोपनीयता राखणे महत्त्वाचे

पार्श्वभूमी

  • २०१० मध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून (CIC - Central Information Commission), SC CPIOs (Central Public Information Officers) ना SC न्यायाधीशांकडे असलेल्या खाजगी मालमत्तेची माहिती प्रदान करण्याचे आदेश

  • या आदेशावर दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान

  • यामध्ये असा निर्णय देण्यात आला होता की SC आणि प्रशासनाचे कार्य तसेच तिच्या कारभाराविषयी माहिती देणे हे वैधानिक कर्तव्य

  • दिल्ली हायकोर्टात यावर याचिका दाखल

  • २०१० मध्ये याचिका दाखल झाली तरी त्यावर फक्त २०१६ साली सुनावणी होऊन घटनेच्या खंडपीठाकडे पाठवणी आणि सध्या हा निकाल सुनावण्यात आला

माहिती अधिकार कायदा - २००५ आढावा (Download PDF माहिती अधिकार अधिनियम - २००५

  • अंमल: १२ ऑक्टोबर, २००५ रोजी (१५ जुन, २००५ रोजी तयार )

  • काही तरतूदी ताबडतोब अंमलात

    • सार्वजनिक प्राधिकरणांच्या जबाबदाऱ्या

    • मुख्य व सहाय्यक जनमाहिती अधिकारी पदे

    • केंद्रिय माहिती आयोग स्थापना

    • राज्य माहिती आयोग स्थापना

    • गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळणे

    • तरतूदी अंमलात आणण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार

'माहिती' संकल्पना अर्थ

  • कोणत्याही स्वरूपातील साहित्य

  • दस्तऐवज, अभिलेख

  • ई-मेल, ज्ञापने

  • सूचना, अभिप्राय

  • परिपत्रके, प्रसिद्धीपत्रके

  • रोजवह्या, आदेश

  • अहवाल, संविधा

  • नमुने, कागदपत्रे

  • प्रतिमाने (मॉडेल)

  • इलेक्ट्रॉनिक स्वरूप सामग्री

  • मंत्री अथवा अधिकाऱ्यांचे फायलींवरचे अभिप्राय

  • अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याधारे सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळविण्याचे प्रयोजन

RTI कायदा इतिहास

  • सर्वप्रथम स्वीडन मधे १७६६ ला लागू

  • भारतात लागू: १२ ऑक्टोबर २००५

  • अशा प्रकारचा कायदा करणारा भारत ५४ वा देश

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.