पोषण अभियानाचा दुसरा वर्धापन दिन साजरा

Date : Mar 11, 2020 12:12 PM | Category : योजना आणि प्रकल्प
पोषण अभियानाचा दुसरा वर्धापन दिन साजरा
पोषण अभियानाचा दुसरा वर्धापन दिन साजरा Img Src (News On AIR)

पोषण अभियानाचा दुसरा वर्धापन दिन साजरा

  • राष्ट्रीय स्तरावर दुसरा वर्धापन दिन साजरा करणारे ठरले पोषण अभियान

वेचक मुद्दे

  • राष्ट्रीय स्तरावरील पोषण अभियानाचा ८ मार्च २०२० रोजी दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला

लक्ष केंद्रित

  • पोषणाकरिता पुरुष लोक (Men for Nutrition)

ध्येय

  • पोषण अभियानात पुरुषांचा सहभाग वाढविणे हे अभियानाचे ध्येय आहे

उद्दिष्ट

  • पौष्टिकता निर्देशक सुधारणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे


नीती आयोग: निरीक्षणे आणि क्रमवारी

  • पोषण अभियानाच्या संपूर्ण अंमलबजावणीमध्ये आंध्र प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे

प्रशिक्षण कार्यक्रम

  • राज्यामार्फत सर्व अंगणवाडी कामगारांना वाढीव शिक्षण पध्दतीच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देणे

  • जीवन चक्र पध्दतीवर आधारित घटकांवर प्रशिक्षण देण्याचे प्रयोजन

कार्यक्रम सहभाग संख्या: क्रमवारी

  • या विभागात तमिळनाडू राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे

इतर बाबी

  • केंद्राच्या पोषण अभियानामुळे एकात्मिक बालविकास योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे

  • देशभरातील मुले आणि मातांपर्यंत पोहोचून देशाचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य कार्यक्रमाद्वारे होत आहे

'पोषण (POSHAN) अभियान'बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • POSHAN म्हणजेच Prime Minister's Overarching Scheme for Holistic Nutrition (POSHAN) Abhiyaan

सुरुवात

  • ८ मार्च २०१८ रोजी पंतप्रधानांकडून सुरुवात

  • महिला दिनाचे औचित्य साधून अभियानाला यशस्वी सुरुवात

उद्देश

  • मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता यांच्या पौष्टिक परिणामांमध्ये सुधारणा आणण्याचे कार्य करणे

  • टप्प्याटप्प्याने देशातील कुपोषण कमी करण्याचे कार्य करणे

  • कुपोषणाच्या समस्येवर लक्ष देणे

  • ० ते ६ वर्षे वयोगटातील मुले, पौगंडावस्थेतील मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणार्‍या मातांची वेळोवेळी पोषण स्थिती सुधारणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.