'राष्ट्रीय रचना संस्था (दुरुस्ती) विधेयक' संसदेत मंजूर

Date : Nov 28, 2019 06:07 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
'राष्ट्रीय रचना संस्था (दुरुस्ती) विधेयक' संसदेत मंजूर
'राष्ट्रीय रचना संस्था (दुरुस्ती) विधेयक' संसदेत मंजूर

'राष्ट्रीय रचना संस्था (दुरुस्ती) विधेयक' संसदेत मंजूर

घडामोडी

  • संसदेकडून राष्ट्रीय रचना संस्था (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला मंजूरी

  • लोकसभेची २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मंजूरी

  • राज्यसभेची ६ ऑगस्ट २०१९ रोजी याआधीच विधेयकास मंजूरी

  • विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल

  • त्यानंतर कायदा स्वरूप प्राप्त

विधेयक: प्रमुख तरतुदी

  • राष्ट्रीय रचना संस्था कायदा (National Institute of Design Act), २०१४ मध्ये सुधारणा करण्याचा विचार

  • आधुनिक भारताच्या आकांक्षा पूर्तीसाठी विधेयकाची मदत

महत्वपूर्ण घोषणा निर्णय

  • राष्ट्रीय रचना संस्था, अहमदाबाद ला राष्ट्रीय महत्त्व देणारी संस्था म्हणून घोषित

  • राष्ट्रीय रचना संस्थांना (National Institutes of Design - NIDs) राष्ट्रीय महत्त्व असणाऱ्या संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय रचना संस्था (National Institutes of Design) स्थान

  • कुरुक्षेत्र (हरियाणा)

  • अमरावती (आंध्र प्रदेश)

  • भोपाळ (मध्य प्रदेश)

  • जोरहाट (आसाम)

महत्वाचे मुद्दे

  • चारही संस्थांना अहमदाबादमधील संस्थेच्या बरोबरीची मानके

  • डिझाइन क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणे प्रयोजित 

  • सोसायटी नोंदणी अधिनियम (Societies Registration Act), १८६० अंतर्गत सध्या या संस्था सोसायटी म्हणून नोंदणीकृत

  • पदवी / पदविका प्रदान करण्याच्या अधिकारांपासून सध्या अलिप्त

  • 'राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्था' म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्याचे अधिकार प्राप्त 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.