जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक (दुरुस्ती) विधेयक, २०१९ संसदेत मंजूर

Date : Nov 21, 2019 04:53 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक (दुरुस्ती) विधेयक, २०१९ संसदेत मंजूर
जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक (दुरुस्ती) विधेयक, २०१९ संसदेत मंजूर

जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक (दुरुस्ती) विधेयक, २०१९ संसदेत मंजूर

  • राज्यसभेच्या मंजुरी नंतर संसदेत जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक (दुरुस्ती) विधेयक मंजूर

  • स्मारकाच्या विश्वस्तांची रचना आणि विश्वस्त पदाची समाप्ती संबंधी तरतुदी बदलण्यासाठी विधेयकात बदल करण्याचा विचार

  • जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम, १९५१ मध्ये बदल प्रयोजन

  • ऑगस्ट २०१९ मध्ये लोकसभेत मंजूर

विधेयकाची वैशिष्ट्ये

  • कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष ट्रस्टचे कायमस्वरुपी सदस्य म्हणून असलेले कलम काढून जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक राजकीय हस्तक्षेपरहित ठेवण्याचा प्रयत्न

  • लोकसभतील मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेते आणि ज्या ठिकाणी विरोधी पक्षनेते नाहीत, त्या सभागृहातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता विश्वस्त सभासद म्हणून समाविष्ट करण्याच्या तरतुदीत सुधारणा

  • नामनिर्देशित विश्वस्तांच्या पदच्युतीबद्दल सुधारणा 

  • कोणतेही कारण न देता कारकीर्दीची ५ वर्षे संपण्याआधीच पदच्युत करण्याबाबतच्या तरतुदींमध्ये बदल

जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक कायदा, १९५१

  • १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे हत्याकांड

  • मरण पावलेल्या किंवा जखमी झालेल्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय स्मारक उभारणी

  • व्यवस्थापन तरतूद करण्यासाठी संसदेकडून कायदा

  • स्मारक उभारणी आणि व्यवस्थापनासाठी ट्रस्टची तरतूद

  • आयुष्यभर काही विश्वस्तांसह ट्रस्टची रचना देखील प्रदान

जालियनवाला बाग हत्याकांड विषयी थोडक्यात

ठिकाण

  • अमृतसर

दिनांक

  • १३ एप्रिल १९१९, बैसाखी सण

पार्श्वभूमी आणि महत्वाच्या घटना

  • सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ सभा आयोजन

  • सभेसाठी विविध जाती धर्माचे जवळपास १५००० लोक जमा 

  • जनरल डायर कडे कार्यभार

  • नवीन नियमांचे उल्लंघन या सबबीखाली जमावावर बेछूट गोळीबार

  • १९१९ ला प्रकरणाच्या चौकशीसाठी हंटर आयोगाची स्थापना

  • १९४० मध्ये ले. गव्ह. मायकल ओडवायर याची उधमसिंग कडून हत्या  

वेचक मुद्दे

  • रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून इंग्रजांकडून मिळालेल्या 'सर' पदवीचा त्याग

  • १९२० मध्ये असहकार चळवळ प्रारंभ

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.