सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे 'मिशन सौर चरखा'

Updated On : Mar 18, 2020 17:04 PM | Category : योजना आणि प्रकल्पसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे 'मिशन सौर चरखा'
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे 'मिशन सौर चरखा' Img Src (Inkhabar)

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे 'मिशन सौर चरखा'

 • 'मिशन सौर चरखा' सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची योजना

जबाबदार मंत्रालय

 •  सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (Ministry of Micro, Small & Medium Enterprises - MSME)

योजना अंमल

 • खादी व ग्रामोद्योग आयोग

लक्ष

 • देशभरात ५० सौर क्लस्टर्सचे आच्छादन करणे हे मिशनचे लक्ष आहे

वेचक मुद्दे

 • अंदाजे १ लाख लाभार्थ्यांना योजनेंतर्गत संरक्षण देण्यात येणार आहे

 • ग्रामीण अर्थव्यवस्थेला ही योजना चालना देईल आणि ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर रोखण्यास मदत करेल

 • कमी किमतीचे, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उदरनिर्वाहासाठीच्या प्रक्रियांचा देखील लाभ घेण्यास सहाय्य करते

उद्दिष्ट

 • रोजगार निर्मितीद्वारे विशेषत: महिला आणि तरूणांसाठी आणि ग्रामीण भागातील सौर चरखा समूहांच्या माध्यमातून शाश्वत विकास ही सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे

 • जवळपास १ लाख लोकांना थेट रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट योजनेत समाविष्ट आहे

प्रकल्प मान्यता

 • 'मिशन सौर चरखा'अंतर्गत आतापर्यंत १० प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे

अनुदान

 • सौर चरखाच्या एका क्लस्टरसाठी जास्तीत जास्त ९.६ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची सुविधा आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)