भारतात प्रथमच मिथॅनोट्रॉफिक जीवाणू संवर्धन
पुण्याच्या आगरकर संशोधन संस्थेमध्ये मिथॅनोट्रॉफिक जीवाणूचे ४५ प्रकार विलग करण्यात आले आहेत
तांदूळ वनस्पतींमध्ये मिथेन उत्सर्जन कमी करण्यास हे जीवाणू सक्षम आहेत
प्रकार वेगळे करण्याव्यतिरिक्त शास्त्रज्ञांकडून मिथॅनोट्रॉफिक संवर्धनदेखील तयार करण्यात आले आहे
विलग केलेले जीवाणू दक्षिण आणि पश्चिम भारतातील आहेत
मिथॅनोट्रॉफिक पर्यावरणीय जीव आहेत ज्यांचे मिथेन चक्र चालविण्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे
वातावरणात त्यांच्यामार्फत मिथेनचे ऑक्सीडीकरण केले जाते
विनॉक्सि चयापचयाद्वारे मिथॅनोट्रॉफिक जीवाणू मिथेनचे ऑक्सीडीकरण करते
मिथॅनोट्रॉफिक बायो-इनोक्युलंट्स म्हणून वापरले जातात
बायो-इनोक्युलंट्स हे जीवाणू, एकपेशीय वनस्पती किंवा बुरशीचे प्रकार आहेत
वातावरणातून नायट्रोजन घेऊन वनस्पतींसाठी आवश्यक नायट्रेट्स तयार करतात
खतांचा वापर त्याद्वारे कमी होतो
वनस्पतींसाठी जस्त आणि फॉस्फरस उपलब्धता देखील वाढवण्याचे कार्य करतात
कार्बन-डाय ऑक्साईड नंतर मिथेनचा हरित गृह वायूमध्ये सर्वात मोठा वाटा आहे
शेतीत मिथॅनोट्रॉफिक जीवाणू वापरल्यामुळे मिथेनचे उत्सर्जन प्रमाण कमी होण्यास मदत होईल
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.