आरोग्य मंत्रालयाने लॉंच केले 'SAANS' अभियान

Date : Nov 18, 2019 09:22 AM | Category : योजना आणि प्रकल्प
आरोग्य मंत्रालयाने लॉंच केले 'SAANS' अभियान
आरोग्य मंत्रालयाने लॉंच केले 'SAANS' अभियान

आरोग्य मंत्रालयाचे 'SAANS' अभियान

 • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून (Ministry for Health and Family Welfare - MoHFW) सुरू

 • SAANS म्हणजेच ‘Social Awareness and Action to Neutralise Pneumonia Successfully’ 

 • न्यूमोनियामुळे निर्मित बालमृत्यू दर कमी करण्याकरिता मोहीम

 • ६ व्या राष्ट्रीय शिखर परिषद उद्घाटन प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडून मोहिमेची घोषणा

SAANS अभियानाबद्दल थोडक्यात

उद्देश

 • न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करणे

 • न्यूमोनियापासून मुलांचा बचाव करण्यासाठी लोकांना एकत्रित करणे

 • इतर भागधारक आणि आरोग्य नियंत्रक यांना रोग नियंत्रणासाठी उपचार पुरवण्यास प्रशिक्षण

काही महत्वाचे मुद्दे

 • अँटी-बायोटिक अ‍ॅमोक्सिसिलिनचा पूर्व-रेफरल डोस आशा म्हणजेच Accredited Social Health Activist (ASHA) सेविकांद्वारे

 • आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रांकडून पल्स ऑक्सिमीटर साधनाचा वापर - मुलाच्या रक्तात स्थित कमी ऑक्सिजन पातळी ओळखण्यास 

 • आवश्यक भासल्यास ऑक्सिजन सिलिंडरच्या सहाय्याने उपचार

 • दरवर्षी न्यूमोनियामुळे पाच वर्षांखालील मृत्यूंमध्ये सुमारे १५% मृत्यू

न्यूमोनियावरील आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली

 • HMIS म्हणजेच Health Management Information System च्या आकडेवारीनुसार

  • भारतातील ५ व त्याखालील मृत्यू प्रमाण दर १००० जीवंत जन्मामागे ३७

  • त्यापैकी ५.३ मृत्यू न्यूमोनियामुळे

  • उद्दिष्ट: २०२५ पर्यंत मुलांमध्ये न्यूमोनियामुळे मृत्यू प्रत्येकी १,००० जन्मांमागे ३ पेक्षा कमी करण्याचे

HMIS मृत्यू दर (२०१८-१९) अग्रक्रमित राज्ये

 • मध्य प्रदेश 

 • गुजरात

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.