३ महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती ७ किलो धान्य पुरवठा अनुदानित अन्नधान्यावर सरकार करणार
ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (Ministry of Consumer Affairs, Food, and Public Distribution) २६ मार्च रोजी ही घोषणा केली
अन्न मंत्रालयाकडून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे
गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो दराने देण्यात येईल
अन्न मंत्रालयाकडून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नोंदणीकृत ८० कोटी लोकांना जादाचे २ किलो अनुदानित अन्नधान्य पुरवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे
भारत सरकारमार्फत येत्या ३ महिन्यांत सार्वजनिक वितरण प्रणाली (Public Distribution System - PDS) अंतर्गत २ किलो अतिरिक्त अनुदानित धान्य पुरवठा करण्यात येणार आहे
प्रतिव्यक्ती एकूण ७ किलो कोटा देण्यात येईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबीसंबंधीच्या मंत्रिमंडळाच्या समितीने (Cabinet Committee on Economic Affairs - CCEA) यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली आहे
कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेली ही बाब आहे
सर्व रेशनकार्डधारकांना पुढील ३ महिन्यांचे अनुदान देण्यात येईल
यापूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (National Food Security Act - NFSA) अंतर्गत सरकार ८० कोटी लोकांना दरमहा ५ किलो अन्नधान्य पुरवठा करीत होते
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.