'ग्लोबल बायो - इंडिया' समिटः भारताची पहिली सर्वात मोठी जैव तंत्रज्ञान परिषद

Date : Nov 25, 2019 05:46 AM | Category : परिषदा
'ग्लोबल बायो - इंडिया' समिटः भारताची पहिली सर्वात मोठी जैव तंत्रज्ञान परिषद
'ग्लोबल बायो - इंडिया' समिटः भारताची पहिली सर्वात मोठी जैव तंत्रज्ञान परिषद

'ग्लोबल बायो - इंडिया' समिटः भारताची पहिली सर्वात मोठी जैव तंत्रज्ञान परिषद

कालावधी

  • २१ ते २३ नोव्हेंबर, २०१९

ठिकाण

  • नवी दिल्ली

आयोजक

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत जैव तंत्रज्ञान विभागाकडून आयोजन

  • जैव तंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (Biotechnology Industry Research Assistance Council - BIRAC) आणि भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industry - CII) यांच्यासमवेत

वेचक मुद्दे

  • देशातील जैव तंत्रज्ञान प्रगती दर्शविण्याची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संधी उपलब्ध

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मंत्र्यांकडून शिखर परिषदेत 'जैव तंत्रज्ञानातील खासगी गुंतवणूक' विषयी एक अहवाल जाहीर

अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

  • जैव तंत्रज्ञान संशोधनात अपुरी खासगी गुंतवणूक असण्याची कारणे सरकारने शोधण्याची गरज अहवालात नमूद

  • जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील मंजुरीसाठी एकल खिडकी प्रणाली बसविण्याची सूचना यात समाविष्ट

सरकारची उद्दिष्ट्ये

  • जैव तंत्रज्ञान क्षेत्राला १०० अब्ज डॉलर्सचा उद्योग बनविण्यास प्राधान्यक्रम

  • उद्दिष्ट साध्य करण्यास सरकारने उद्योग-शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन देण्याबाबतचा मुद्दा अहवालात नमूद

भूमिका

  • जैव तंत्रज्ञान क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे उर्जितावस्थतेतील क्षेत्र

  • भारतातील तज्ज्ञांचा विश्वास आहे की ही देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख चालक आणि २०२५ पर्यंत भारताचे ५ ट्रिलियन डॉलर्सचे उद्दीष्ट साध्य करण्यात मोठी भूमिका बजावेल

  • २०२५ पर्यंत या क्षेत्राला भारतीय व्यापारात १२ अब्ज डॉलर्सच्या २२% योगदान देण्याची क्षमता

महत्व

  • शिखर परिषदेकडून या क्षेत्रातील भारताची क्षमता दर्शविण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम

  • जैव - कृषी, जैव - औषधी, जैव - औद्योगिक, जैव - सेवा आणि जैव - ऊर्जा या क्षेत्रातील प्रमुख आव्हाने ओळखण्यास मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.