मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी 'समाधान' आव्हान सुरू
मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवीकरण सेलने (Ministry of Human Resource Development - MHRD) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (All India Council for Technical Education - AICTE) कडून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी 'समाधान' नावाचे ऑनलाइन आव्हान सुरू करण्यात आले आहे
कोरोना विषाणू साथीच्या आजारावर आणि अशा प्रकारच्या आपत्तींवर त्वरित निराकरण करणे हा या आव्हानाचा उद्देश आहे
सदर आव्हानामध्ये भाग घेणारे विद्यार्थी सरकारी संस्था, आरोग्य सेवा, रुग्णालये आणि इतर सेवा उपलब्ध करुन देऊ शकतील अशा उपायांचा शोध घेतील आणि विकसित करतील
AICTE चे विस्तारित रूप All India Council for Technical Education आहे
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद
AICTE ची स्थापना नोव्हेंबर १९४५ रोजी झाली होती
अनिल सहस्रबुद्धे हे AICTE चे सध्याचे अध्यक्ष आहेत
AICTE चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे
आलोक प्रकाश मित्तल हे AICTE चे सदस्य सचिव पदावर विराजमान आहेत
उच्च शिक्षण विभाग
मानव संसाधन विकास मंत्रालय
रमेश पोखरियाल ‘निशंक’ सध्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.